Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘हा तोच देश आहे जिथे लादेन… ‘, Operation Sindoor चा ब्रिटिश संसदेत बोलबाला, भारताचा पाकविरुद्ध मोठा संदेश

British MP Priti Patel : ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पीओकेमधील 9 दहशतवादी तळांवर अचूक हल्ले करत त्यांचा बीमोड केला. या पार्श्वभूमीवर ब्रिटिश संसदेमध्ये माजी गृहसचिव आणि प्रभावशाली खासदार प्रीती पटेल यांनी जोरदार भाष्य केले.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: May 08, 2025 | 11:09 AM
British MP Priti Patel condemned the Pahalgam attack and backed India’s anti-terror stance

British MP Priti Patel condemned the Pahalgam attack and backed India’s anti-terror stance

Follow Us
Close
Follow Us:

Global condemnation of Pahalgam attack : भारतातील जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या क्रूर दहशतवादी हल्ल्याचा प्रतिध्वनी केवळ उपखंडातच नाही तर ब्रिटनच्या संसदेतही उमटला आहे. या हल्ल्यानंतर भारताने ६-७ मे रोजी ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पीओकेमधील ९ दहशतवादी तळांवर अचूक हल्ले करत त्यांचा बीमोड केला. या पार्श्वभूमीवर ब्रिटिश संसदेमध्ये माजी गृहसचिव आणि प्रभावशाली खासदार प्रीती पटेल यांनी जोरदार भाष्य करत भारताच्या दहशतवादविरोधी कारवायांना ठाम पाठिंबा दर्शवला.

“हा तोच देश आहे जिथे लादेन लपला होता”  पाकिस्तानवर थेट प्रहार

प्रीती पटेल यांनी आपल्या भाषणात पाकिस्तानातील दहशतवादी गटांचे उघड उघड समर्थन करणाऱ्या धोरणांवर कठोर टीका केली. त्यांनी ठामपणे सांगितले,

“हा तोच देश आहे जिथे ओसामा बिन लादेन लपला होता. आजही त्या देशात दहशतवादी नेटवर्क वाढत आहेत, हा केवळ योगायोग नाही.”

त्यांनी स्पष्टपणे म्हटले की, पाकिस्तानमध्ये कार्यरत असलेले दहशतवादी गट केवळ भारतासाठीच नव्हे, तर ब्रिटनसह संपूर्ण पाश्चिमात्य जगासाठी धोका बनले आहेत. त्यामुळे ब्रिटिश सरकारने या गटांविरोधात कठोर भूमिका घ्यावी आणि त्यांची ओळख पटवून ठोस पावले उचलावीत, अशी जोरदार मागणी त्यांनी संसदेत केली.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : काय सत्य अन् काय तथ्य! ‘Operation Sindoor’नंतर पाकिस्ताननेही भारताचे पाच फायटर जेट पाडले…; पाक लष्करी प्रवक्त्यांचा दावा

‘ऑपरेशन सिंदूर’चा जागतिक स्तरावर प्रभाव

भारतीय लष्कराच्या ‘ऑपरेशन सिंदूर’ मोहिमेमुळे पाकिस्तानप्रेरित दहशतवादी संघटनांना मोठा झटका बसला आहे. ९ दहशतवादी अड्ड्यांवर यशस्वीपणे हल्ले करून भारताने पुन्हा एकदा दहशतवाद्यांना कुठेही सुरक्षित आश्रय मिळू शकत नाही, हे दाखवून दिले.

प्रीती पटेल यांनी भारताच्या या कारवाईचे कौतुक करताना म्हटले की,

“स्वतःचे रक्षण करण्यासाठी आणि त्या घृणास्पद दहशतवादी संरचना नष्ट करण्यासाठी भारताने घेतलेली कारवाई योग्य आणि प्रमाणबद्ध आहे.”
Today in the House of Commons I reiterated my condolences for those impacted by the atrocity that took place in Pahalgam. We must stand with those affected by terrorism. The UK must work with our friends in India to tackle terrorist threats and engage with India, Pakistan and key… pic.twitter.com/8RXezaJHx0 — Priti Patel MP (@pritipatel) May 7, 2025

credit : social media

ब्रिटनने भारतासोबत उभे राहावे – स्पष्ट मागणी

आपल्या भाषणादरम्यान, प्रीती पटेल यांनी ब्रिटिश सरकारकडे थेट विचारणा केली. “आपल्या गुप्तचर संस्था भारताच्या संपर्कात आहेत का? पहलगाम हल्ल्याच्या तपासात आपण सहकार्य करत आहोत का?” त्यांनी स्पष्टपणे मागणी केली की ब्रिटनने भारताला फक्त नैतिक नाही, तर थेट आणि सक्रिय पाठिंबा द्यावा, ज्यामुळे जागतिक स्तरावरील दहशतवादविरोधी लढा अधिक प्रभावी होईल.

लष्कर-ए-तोयबाचे घातक रूप

हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर प्रीती पटेल यांनी लष्कर-ए-तोयबा या संघटनेच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यांनी विचारले की, ब्रिटिश सरकार या हल्ल्यामागे लष्कर-ए-तोयबाचा हात असल्याचे मान्य करते का? तसेच, या संघटनेचे हमासशी असलेले कथित संबंध ब्रिटन सरकारच्या माहितीत आहेत का, याचीही चौकशी केली. त्यांच्या मते, दहशतवादाविरोधातील लढाई केवळ राजनैतिक नाही, तर लोकशाही मूल्यांचे रक्षण करण्याचा लढा आहे, आणि यामध्ये पश्चिमी राष्ट्रांनी भारतासोबत खांद्याला खांदा लावून उभे राहणे आवश्यक आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : भारत-पाकिस्तान संघर्षामुळे जागतिक स्तरावर संभ्रम; आरोप प्रत्यारोपात कोण बरोबर कोण चूक?

 भारताची दहशतवादविरोधी भूमिका जागतिक स्तरावर सन्मानित

भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे की, दहशतवाद्यांविरुद्ध कारवाईसाठी तो कोणत्याही टप्प्यावर माघार घेणार नाही. ब्रिटिश संसदेमध्ये प्रीती पटेल यांच्यासारख्या प्रभावी नेत्यांनी या कारवाईला पाठिंबा देऊन भारताच्या भूमिकेला आंतरराष्ट्रीय मान्यता मिळवून दिली आहे. पाकिस्तानातील दहशतवादी अड्ड्यांविरुद्ध कठोर भूमिका घेण्याची आता वेळ आली आहे, हा स्पष्ट संदेश लंडनपासून इस्लामाबादपर्यंत झणझणीतपणे पोहोचलेला दिसतो.

Web Title: British mp priti patel condemned the pahalgam attack and backed indias anti terror stance

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 08, 2025 | 11:09 AM

Topics:  

  • britain
  • india pakistan war
  • international news
  • Operation Sindoor

संबंधित बातम्या

Maharashtra Breaking News Updates Today:  नीट पेपरफुटी प्रकरण: ‘RCC’चे संचालक शिवराज मोटेगावकर सीबीआयच्या ताब्यात
1

Maharashtra Breaking News Updates Today: नीट पेपरफुटी प्रकरण: ‘RCC’चे संचालक शिवराज मोटेगावकर सीबीआयच्या ताब्यात

Top Marathi News Today Live : कोकणातल्या काजू आंबा उत्पादक आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं, मुंबईत घमासान
2

Top Marathi News Today Live : कोकणातल्या काजू आंबा उत्पादक आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं, मुंबईत घमासान

Breaking News: दिल्लीतील सरकारी कार्यालयांमध्ये आठवड्यातून दोन दिवस ‘वर्क फ्रॉम होम’; मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची मोठी घोषणा
3

Breaking News: दिल्लीतील सरकारी कार्यालयांमध्ये आठवड्यातून दोन दिवस ‘वर्क फ्रॉम होम’; मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची मोठी घोषणा

Ex-army chief Manoj Naravane: पहलगाम हल्ल्याचा बदला आणि ऑपरेशन सिंदूरचा थरार;’ माजी लष्करप्रमुख मनोज नरवणे यांचे मोठे विधान
4

Ex-army chief Manoj Naravane: पहलगाम हल्ल्याचा बदला आणि ऑपरेशन सिंदूरचा थरार;’ माजी लष्करप्रमुख मनोज नरवणे यांचे मोठे विधान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.