भारताच्या हवाई हल्ल्यात AWACS चं मोठं नुकसान; अखेर ब्रह्मोसचा वापर झाल्याची पाकिस्तानच्या कबुली
Operation Sindoor : दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारताने रात्री उशिरा पाकिस्तानच्या सहा ठिकाणांवर हवाई हल्ले केल्यानंतर पाकिस्तानने तातडीने प्रत्युत्तर दिले असून पाच भारतीय लढाऊ विमाने पाडल्याचा दावा केला आहे, अशी माहिती पाकिस्तानी लष्कराच्या प्रवक्त्यांनी दिली. पाकिस्तानी वृत्तसंस्था ‘DAWN’ च्या वृत्तानुसार पाकिस्ताननेही भारताची 5 फायटर जेट पडली असा दावा पाकिस्तानचे लष्करी प्रवक्ते आणि माहिती मंत्री अत्ताउल्लाह तरार यांनी दिली.
भारताने “ऑपरेशन सिंदूर” अंतर्गत सियालकोट, बहावलपूर, मुरीदके, बाग, मुझफ्फराबाद व कोटली येथे लक्षित हल्ले केल्याचे स्पष्ट झाले. या हल्ल्यांमध्ये मशिदींसह नागरी ठिकाणे ध्वस्त झाली असून आठ पाकिस्तानी नागरिकांचा मृत्यू झाला आहे, तर ३५ जण जखमी झाले आहेत. या मृतांमध्ये एक तीन वर्षांची मुलगी व अन्य महिला आणि मुले यांचा समावेश आहे.
पाकिस्तानच्या इंटर-सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्स (ISPR) च्या मते, भारतीय हल्ल्यानंतर झालेल्या प्रत्युत्तरात तीन राफेल, एक मिग-२९ आणि एक एसयू-३० असे पाच भारतीय लढाऊ विमाने पाडण्यात आली. याशिवाय अनेक ड्रोन आणि क्वाडकॉप्टरही निष्क्रिय करण्यात आले. लष्करी प्रवक्ते आणि माहिती मंत्री अत्ताउल्लाह तरार यांनी याबाबत पहाटेपासून पत्रकार परिषदांत माहिती दिली. तरार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, “भारताने नियंत्रण रेषेवर पांढरा झेंडा फडकवला आहे, ही त्यांची प्रत्यक्ष पराभवाची कबुली आहे.” पाकिस्तानच्या संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनीही या प्रतिक्रियेची पुष्टी केली. त्यांनी म्हटले की, भारताच्या कारवायांनंतर पाकिस्तान शांत बसणार नाही.
भारताच्या हल्ल्यांमुळे बहावलपूर, मुझफ्फराबाद, कोटली व इतर ठिकाणच्या मशिदींना लक्ष्य करण्यात आले असून, नागरिकांच्या घरांनाही मोठ्या प्रमाणात हानी पोहोचली आहे. डीजी ISPR यांनी म्हटले की, भारताने एकूण २४ ठिकाणी आक्रमण केले. यामुळे दोन पाकिस्तानी नागरिक बेपत्ता आहेत.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : ‘Operation Sindoor’ नंतर पाक पंतप्रधान शेहबाज शरीफ यांची पहिलीच प्रतिक्रिया; जम्मू-कश्मीरमध्ये अलर्ट, विमानसेवा विस्कळीत
भारताने अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य केले नसले तरी हे हल्ले भारतीय हवाई दलासाठी दशकांतील सर्वात मोठ्या नुकसानीपैकी एक ठरू शकतात. राफेल लढाऊ विमाने ही भारताच्या नव्या लष्करी आधुनिकतेची ओळख असून, काही दिवसांपूर्वीच भारताने फ्रान्सकडून आणखी २६ राफेल खरेदी करण्याचा ७.४ अब्ज डॉलरचा करार केला होता.
दरम्यान, पाकिस्तानने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेकडे ही बाब नेली आहे. पंतप्रधान शेहबाज शरीफ यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय सुरक्षा समितीची तातडीची बैठक बोलावण्यात आली असून ISI च्या मुख्यालयात त्यांना संपूर्ण लष्करी तयारीची माहिती देण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपले जुने विधान पुन्हा अधोरेखित करत पाकिस्तानकडे वाहणारे पाणी थांबवण्याचा इशारा दिला आहे. “भारताचे पाणी आता भारतासाठी वापरले जाईल,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Operation Sindoor First Video: पहलगाम दहशतवादी हल्ल्याची योजना आखली ‘ती’ जागा केली भारतीय सैन्याने उद्ध्वस्त
या स्फोटक घडामोडींमुळे दक्षिण आशियात तणाव शिगेला पोहोचला आहे. अमेरिका आणि संयुक्त राष्ट्र संघाने दोन्ही देशांना संयम बाळगण्याचे आवाहन केले आहे. पाकिस्तानमध्ये नागरी संरक्षण यंत्रणा सक्रिय झाली असून भारतात देखील नागरिक संरक्षणासाठी मॉक ड्रिल्स सुरू करण्यात आल्या आहेत. दोन अण्वस्त्रधारी शेजारी देशांमधील या नव्या संघर्षामुळे संपूर्ण जगाचे लक्ष या भागाकडे लागले आहे.