
फोटो सौजन्य सोशल मीडिया
China Rain : चीनच्या युनेस्को वारसा स्थळी पर्यटकांची सुखरूप सुटका
महाराजा दलीप सिंह यांनी पंधरा वर्षे वय पूर्ण झाल्यानंतर भारताचा केवळ दोनदाच दौरा केला. हे दोन्ही दौरे खूप छोटे होते आणि त्या दरम्यान त्यांच्यावर अनेक प्रकारच्या बंदीही होत्या.त्यांचा पहिला दौरा 1860 मध्ये त्यांच्या आईला इंग्लंडला घेऊन जाण्यासाठी झाला होता.
दुसरा दौरा 1863 मध्ये त्यांच्या आईच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यासाठी झाला.महाराजा दलीप सिंह यांच्याबत ब्रिटिश सरकार इतके कडक होते की मृत्यूच्या वेळीही त्यांना भारतात येऊ दिले नाही.
महाराजा दलीप सिंह यांचे 1893 मध्ये 55 व्या वर्षी पॅरिसमध्ये निधन झाले.खूपच दुर्दैवी आयुष्य होते . कोहिनूर सोबत त्यांचे राज्यही गेले आणि शेवटपर्यंत मायदेशी परत येऊ शकले नाहीत.
असे म्हटले जाते की महाराजा दलीप सिंह यांचे लहान वयातच ब्रेनवॉश करण्यात आले आणि 1853 मध्ये त्यांना ख्रिस्ती धर्म स्वीकारण्यास भाग पाडण्यात आले. परंतु त्यांच्या आईच्या मृत्यूनंतर ते पुन्हा शीख झाले.महाराजा दलीप सिंह यांनी 25 वर्षांच्या वयात सफोक येथे एल्वडेन हॉल नावाचे घर विकत घेतले आणि त्यांच्या पहिल्या पत्नी बाम्बा मुलर यांच्यासोबत तिथे स्थायिक झाले. बाम्बा मुलर जर्मन आणि एबिसिनियन वंशाच्या होत्या. या जोडप्याला सहा मुले होती आणि बैंस यांच्या म्हणण्यानुसार त्यांची आवडती राजकुमारी कॅथरीन होती.खरंच वेदनादायक आहे bhai… लहानपणी राज्य, धर्म आणि देश तिन्ही हिरावून घेतले गेले.
Breaking News : POK मध्ये पाकिस्तान विरोधात बंड , JAAC ने निवडणुकांवर केला बहिष्कार
महाराजा दलीप सिंह हे कोहिनूर हिऱ्याचे शेवटचे वारसदार होते. महाराजा दलीप सिंह यांचे वडील महाराजा रणजित सिंह यांच्या खजिन्यात जगातील सर्वात प्रसिद्ध कोहिनूर हिरा होता. महाराजा रणजित सिंह यांच्या निधनानंतर हा कोहिनूर हिरा महाराजा दलीप सिंह यांना मिळाला. तथापि, त्यावेळी पंजाब आणि कोहिनूर हिऱ्यावर इंग्रजांची नजर होती. महाराजा रणजित सिंह यांच्या निधनानंतर लगेचच इंग्रजांनी पंजाबवर हल्ला करून त्यावर पूर्णपणे ताबा मिळवला.29 मार्च 1849 रोजी इंग्रजांनी 10-11 वर्षांच्या महाराजा दलीप सिंह यांच्याकडून एका तहावर स्वाक्षरी करून घेतली. त्यानुसार दलीप सिंह यांना आपली गादी सोडावी लागली आणि शीख साम्राज्यावर इंग्रजांचे राज्य झाले. त्यांना कोहिनूर हिरा महाराणी व्हिक्टोरियाला भेट म्हणून देण्यास भाग पाडण्यात आले.10 वर्षांच्या मुलाकडून संपूर्ण राज्य आणि जगातील सर्वात मौल्यवान हिरा हिसकावून घेणे… हा इतिहासातील सर्वात मोठा अन्याय होता .कोहिनूर आजही ब्रिटनच्या रॉयल क्राउनमध्ये आहे