Canada election 2025 Indian-origin Chandra Arya's Canadian MP ticket cancelled over India trip
ओटावा: येत्या एप्रिल महिन्यांत 28 तारखेला कॅनडाच्या निवडणुका होणार आहेत. दरम्यान एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. भारतीय वंशाचे खासदार चंद्रा आर्य यांना कॅनडाच्या लिबरल पक्षाच्या नेतृत्वाच्या शर्यतीतून वगळण्यात आले आहे. तसेच त्यांचे नेपियरचे तिकटही रद्द करण्यात आले आहे. भारत सरकारशी जवळचे संबंध असल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. यामुळे मोठा गोंधळ उडाला आहे.
खासदार चंद्रा आर्य यांनी गेल्या वर्षी भारताला भेट दिली होती. या दरम्यान त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली होती. यामुळेच त्यांना पक्षातून बाहेर काढण्यात आले असून त्यांचे तिकीट रद्द केले जात असल्याचे म्हटले जात आहे. मात्र, कॅनडा सरकार आमि लिबरल पक्षाने चंद्रा आर्य यांना निवडणूकीच्या शर्यतीतून बाहेर काढण्याचे कोणतेही कारण अद्याप स्पष्ट केलेले नाही.
मीडिया रिपोर्टनुसार, चंद्रा आर्य यांनी कॅनडा सरकारला या भेटीची कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नव्हती. या काळात भारत आणि कॅनडामध्ये संबंध अतिशय तणावपूर्ण स्थितीत होते. मिळालेल्या माहितीनुसार, कॅनडियन सिक्युरिटी अंटेलिदजंस सर्व्हिस (CSIS) ने कॅनडियन सरकारला आर्यचे भारत सरकारशी असलेल्या संबंधांबद्दल माहिती दिली होती. 22 जून 2024 रोजी कॅनडाच्या संसदेत खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंग निज्जर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ मौन्य पाळल्यानं चंद्रा आर्य यांनी माजी ट्रुडो सरकारवर टीका केली होती.
दरम्यान भारतीय वंशाचे खासदार चंद्रा आर्य यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की,भारताशी माझे जवळचे संबंध असल्याने माझे तिकीट रद्द जाले नाही. खासदार म्हणून अनेक राजदूतांना आणि राष्ट्रप्रुखांना भेट देतो. अशा कोणत्याही बैठकीसाठी कधीही सरकारची परवानगी त्यांनी घेतलेली नाही.
आर्य यांनी हेही स्पष्ट केले की, खलिस्तानी चळवळीला त्यांच्या विरोधामुसे त्यांना लिबरल पक्षाच्या नेतृत्त्वातून आणि नेपियनमधून काढून टाकण्यात आले आहे. चंद्रा आर्य यांनी अनेकवेळी कॅनडातील खलिस्तानी चलवळींविरुद्ध आवाज उठवला आहे.
आर्य यांनी दिलेल्या माहितीनुसार, खलिस्तानविरोधी चळवळींविरुद्ध आवाज त्यांनी उठवला आहे. यटामुळे चिडलेल्या खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नू यांनी तत्कालीन पंतप्रधान जस्टिनी ट्रुडो यांना आर्यविरुद्ध कारवाई करण्याची विनंती केली होती. पूर्वी चंद्रा आर्य हे ट्रुडोंच्या जवळ मानले जायचे, परंतु खलिस्तानी दहशतवाद आणि अतिरेकीपणाबद्दल ट्रुडो यांच्या भूमिकेनंतर आर्य यांनी त्यांच्यापासून स्वत:ला दूर ठेवले.
आर्य यांनी म्हटले होते की, लिबरल पक्षाने त्यांच्या नेपियनमधील आगामी संघीय निवडुकीसाठी उमेदवार म्हणून अर्ज रद्द करम्यात आले असल्याची माहिती दिली. त्यांनी म्हटले की, हे निराशजनक आहे, पण यामुळे लोकांच्या सेवा करणे मी कमी करणार नाही. आर्य यांनी 99 जानेवरी रोजी उमेदवारी जाहीर केली होती. मात्र तरीही आर्य यांना पदासाठी अयोग्य ठरवत ती रद्द केली.
सध्या कॅनडात 28 एप्रिल रोजी सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. ट्रम्प यांनी कॅनडावर टॅरिफ लादण्याच्या सतत दिलेल्या धमक्यांनंतर कार्नी यांनी हा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान कार्नी यांनी म्हटले आहे की, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमक्यांना तोंड देण्यासाठी आपण एक मजबूत जनादेशाची स्थापन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.