क्वीव: सध्या गेल्या तीन वर्षांहून अधिक काळ रशिया-यूक्रेन युद्ध सुरु आहे. सध्या हा संघर्ष दिवसेंदिवस वाढत चालला असून दोन्ही देश एकमेकांवर मोठ्या प्रमाणात हल्ले करत आहे. जागतिक स्तरावर हे युद्ध संपवण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. 30 दिवसांच्या यूद्धबंदीला दोन्ही देशांनी सहमती दर्शवली आहे. दरम्यान यूक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी एक धक्कादायक विधान केले आहे. त्यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन लवकरच मरणार असल्याचा दावा केला आहे. पॅरिसमध्ये फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएव मॅक्रॉन यांची भेट घेतल्यानंतर हे विधान केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, माध्यमांशी बोलताना झेलेन्स्की यांनी “ पुतिन लवकरच मरतील आणि ही वस्तुस्थिती आहे. यानं सगळं संपेल” असे वक्तव्य त्यांनी केले आहे.
गेल्या काही काळापासून व्लादिमिर पुतिन यांच्या प्रकृतीबद्दल अनेक अंदाज बांधला जात आहे. इंग्रजी वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, पुतिन यांचा चेहरा काही काळापासून सुजलेला दिसत आहे. अनेक वेळा सार्वजनिक सभांमध्ये ते खुर्ची धरुन बसलेले दिसले आहेत. तसेच त्यांच्या शरीरातील थरथरणे आणि हातापायाच्या नियंत्रित हालचाली देखील दिसून आल्या आहेत. अनेक माध्यमांनी दावा केला आहे, पुतिन यांना कर्करोग आणि पार्किन्सन सारख्या गंभीर आजारांनी त्रस्त आहेत. 2022 मध्ये एका बैठकीत त्यांची वाकडी मुद्रा, टेबल धरुन बसणे आणि अडखळणारा आवाज यावरुन हा दावा करण्यात आला आहे.
अनेक तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, झेलेन्स्की यांचा हा दावा आरोग्याशी संबंधित नसुन राजकीय टीप्पणी आहे.शिवाय याला मानसिक आघातही मानले जात आहे. झेलेन्स्की यांनी हे व्यक्तव्य पुतिनवर दबाव आणण्यासाठी आणि रशियन सत्तेवर हल्ला करण्यासाठी करण्यात आले आहे. हे एक धोरणात्मक पाऊल असून शकते.
सध्या आंतरराष्ट्रीय स्तरावर रशिया-यूक्रेन युद्ध थांबण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. दरम्यान युरोपीय देशांनी यूक्रेनला मदतीचे आश्वासन दिले आहे. फ्रानसचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रों यांनीही रशियाविरोधात कठोर भूमिका घेतली आहे. रशियाने कोणत्याही अटींशिवाय 30 दिवसांचा युद्धविराम मान्य करावा असे मॅक्रों यांनी म्हटले आहे. दरम्यान फ्रान्सने यूक्रेनला 2.2 अब्ज डॉलर्सची लष्करी मदत जाहीर केली.
सध्या रशियाने राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्या आजारपणाबद्दल कोणतीही अधिकृत माहिती जाहीर केलेली नाही. मात्र, झेलेन्स्की यांचे विधान यूक्रेन रशियाला कमकुवत करण्यासाठी आहे. मात्र युक्रेनची पुढील रणनीती काय असेल याबाबत अद्याप स्पष्टता नाही.