canada ousted pm justin farewell from house of commons
कॅनडाचे मावळते पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी सोमवारी (10 मार्च) ओटावामधील व्हािट हाऊस ऑफ कॉमन्समध्ये त्यांचे उत्तराधिकारी म्हणून मार्क कार्नी यांना नियुक्त केले. जस्टिन ट्रूडो यांच्या पदाचा कार्यभार संपला असून आता मार्क कार्नी कॅनडाचे नवे पंतप्रधान असतील. जस्टिन ट्रूडो यांनी औपचारिकपणे सोमवारी व्हाइट हाऊस ऑफ कॉमन्समध्ये आपला राजीनामा दिला. यानंतर ट्रुडो यांना अधिकृतपणे निरोप देण्यात आला.
याचदरम्यान निरोप घेतल्यानंततर, जस्टिन ट्रुडो यांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हायरल फोटोमध्ये ट्रुडो यांनी खुर्ची उचलून घेतली असून ते व्हाइट हाउस ऑफ कॉमन्समधून बाहेर पडताना दिसत आहेत. यावेळी त्यांनी जीभ बाहेर काढून कॅमेऱ्याकडे उत्साहात पाहिले आहे. ट्रूडोंच्या या हावभाने सोशल मीडियावर नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे. ट्रूडोंची कॅनडाच्या राजकारणात एक वेगळी भूमिका होती, यामुळे अनेक बदल घडून आले. आता पंतप्रधानपदी दीर्घकाळ काम केल्यानंतर त्यांनी पक्ष आणि सरकारची सूत्रे नवीन पंतप्रधानांच्या हाती सोपवली आहेत.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
व्हायरल पोस्ट
जस्टिन ट्रूडो यांनी सोमवारी 10 मार्च रोजी कॅनडाचे नवे पंतप्रधान मार्क ट्रूडो यांची भेट घेतली. यानंतर त्यांनी कॅनडामध्ये लवकरच औपचारिक सत्ता हस्तांतरण होईल असे सांगितले. जस्टिन ट्रूडो यांनी लिबरल लीडरशिप कन्व्हेन्शनमध्ये लिबरल पक्षाच्या कामगिरीबद्दल भाष्य करताना म्हटले की, “मध्यमवर्गीय आणि त्यातील कष्टकरी लोकांसाठी गेल्या 10 वर्षात आम्ही जे काही केले आहे त्याचा मला अभिमान आहे.”
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
सध्या ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. इन्स्टाग्रामवर @reuters या इंग्रजी वृत्तसंस्थेने ही पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टला लाखो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत. अनेकांनी यावर मजेशीर प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत. एका युजरने मी एक झिओनिस्ट आहे आणि मी खुर्ची ताब्यात घेत आहे अशी टीका केली आहे, तर दुसऱ्या एकाने लवकर हाकललं याला असे म्हटले आहे. सध्या ही पोस्ट मोठ्या प्रमाणावर चर्चेचा विषय बनली आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.