Canada PM Mark Carney credits Trump bringing peace in India Pakistan
Donald Trump and Mark Carney Meet : वॉशिंग्टन : कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी (Mark Carney) यांनी नुकतेच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांची भेट घेतली. मंगळवारी (०७ ऑक्टोबर) व्हाइट हाउसमध्ये दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. या वेळी कार्नी यांनी ट्रम्पची खुशामत करत त्यांना भारत-पाकिस्तान (India Pakistan War), अर्मेनियाच्या युद्धबंदीचे श्रेय दिले. तसे तर भारताने ट्रम्प यांचा दावा अनेक वेळा फेटाळून लावला आहे. पण मार्क कार्नी यांच्या या कृतीने भारत-कॅनडा संबंधात तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे.
थायलंडमधील अनोखा फॅशन शो! सजून-धजून मॉडेलिंग करतात चक्क म्हशी…
कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांनी डोनाल्ड ट्रम्प यांची प्रशंसा करत त्यांच्या खोट्या द्याव्यांचे समर्थन केले. तसेच त्यांनी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प हे एक परिवर्तन प्रेमी असल्याचे म्हटले आहे. पंतप्रधान कार्नी यांनी म्हटले की, तुम्ही भारत आणि पाकिस्तानसारख्या देशात शांतता प्रस्थापित केली. त्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. पण भारताने ट्रम्प यांनी पाकिस्तानसोबतच्या युद्धात शांतता प्रस्थापित केल्याचा दावा अनेक वेळा फेटाळला आहे.
तसेच कार्नी यांनी असाही दावा केला की, अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेतील बदल, नाटो देशांनी वाढवलेल्या संरक्षण खर्च, अझरबैजान आणि अर्मानियामध्ये शांतात प्रस्थापित हे सर्व राष्ट्राध्यक्षांच्या प्रयत्नांमुळे झाले आहे. मार्क कार्नी यांनी ही विधाने अशा वेळी केली आहे जेव्हा भारत आणि कॅनडातील संबंध सुधारत आहे. तसेच काही महिन्यांपूर्वी ट्रम्प यांनी अतिरिक्त शुल्क लादण्याची कॅनडाला दिली होती. मार्च २०२५ मध्ये कार्नी यांनी पंतप्रधान पदाचा कारभार स्वीकारला होता. यानंतर त्यांचा हा अमेरिकेचा दुसरा दौरा आहे. त्यांच्या या विधानांमुळे कॅनडा अमेरिकेचे ५१ वे राज्य बनणार अशी अटकळही बांधली जात आहे.
#WATCH | Canadian Prime Minister Mark Carney meets US President Donald Trump in the White House PM Carney says, “You are a transformative President. Since then, transformation in the economy, unprecedented commitment to NATO partners to defence spending, peace from India,… pic.twitter.com/oCexOMmcOG — ANI (@ANI) October 7, 2025
FAQs(संबंधित प्रश्न)
प्रश्न १. कॅनडच्या पंतप्रधानांनी ट्रम्प यांच्या कोणत्या खोट्या दाव्यांचे केले समर्थन?
कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांनी ट्रम्प यांच्या भारत-पाकिस्तान ते अर्मानिया अझरबैझान मध्ये युद्धबंदी केल्याच्या दाव्यांचे समर्थन केले
प्रश्न २. मार्क कार्नी यांनी ट्रम्प यांचे कौतुक करत अजून काय म्हटले?
कार्नी यांनी डोनाल्ड ट्रम्प यांचे कौतुक करत ते परिवर्तन बदल स्वीकारणारे राष्ट्राध्यक्ष असल्याचे म्हटले. तसेच त्यांच्यामुळे नाटोचा विस्तार झाल्याचे म्हटले.
Earthquake News: पापुआ न्यू गिनी भूकंपाने हादरले! 6.6 तीव्रतेने लोकांमध्ये घबराट