थायलंडमधील अनोखा फॅशन शो! सजून-धजून मॉडेलिंग करतात चक्क म्हशी... (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
Thailand News in Marathi : बँकॉक : आतापर्यंत तुम्ही घोडे, कुत्रे, बैल, कासव, ससा या प्राण्यांच्या शर्यतीबद्दल ऐकले असेल किंवा तुम्ही पाहिलेही असेल. पण तुम्ही कधी म्हशींची सौंदर्य स्पर्धा आणि शर्यत पाहिली आहे का? हे वाचून तुम्ही थोडे गोंधळला असाल, पण एक असा देश आहे जिथे म्हशींच्या शर्यतीसह त्यांची सौंदर्य स्पर्धा देखील अयोजित केली आहे. त्या देशात याला एका सणाप्रमाणे साजरे केले जाते. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल असा कोणता देश आहे, जो म्हशींची सौंदर्यस्पर्धा आयोजित करतो आणि लोक याचा उत्सव का साजरा करतात. या बद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.
Saudi Arabia News : सौदीमध्ये जाणं झालं सोप्पं; उमराह वीजाबाबत मोठी अपडेट आली समोर
भारतात आपण बेंदूरला जसे बैलाला सजवतो, त्यांच्या शर्यती ठेवतो तसेच थायलंड मध्ये म्हशींच्या सौंदर्याची स्पर्धा आयोजित केली जाते. म्हशींना फुलांचे मुकूट घातले जातात. पारंपारिक लाकडी गाड्यांना बांधले जाते. त्यांच्या शर्यतीचे आयोजन केले जात. १०० मीटरच्या शर्यतीत म्हशींना पळवले जाते.
लोक अगदी आनंदाने हा उत्सव साजरा करतात. दरवर्षी थायलंडच्या चोनबुरी येथे यासाठी एक विशेषे उत्सवाचे आयोज केले जाते. या उत्सवात म्हशींच्या शर्यती आणि सौंदर्य स्पर्धा असतात. यामुळे येथील शेतकऱ्यांना एक नवी ओळख आणि आशा मिळते. हा उत्सव म्हणजे शेतीच्या नव्या हंगामाची सुरुवात.
थायलंडमध्ये शेत नांगरण्यासाठी आणि जड ओझे वाहून नेण्यासाठी केला जात होता. पण गेल्या काही काळात आता तांत्रिक यंत्रणांनी याची जागा घेतली आहे. यामुळे म्हशींचे मांस विकण्यास सुरुवात झाली. यावर तोडगा म्हणून या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. लोक स्पर्धांद्वारे लाखो कमवू लागले. थायलंडमध्ये २०२४ मध्ये पांढरी म्हैस १८ दशलक्ष बाहट (थायलंडमधील चलन) म्हणजे अंदाजे ५.५ कोटी USD डॉलरला विकली गेली.
थायलंडच्या सरकारकडून थाई म्हशी संवर्धन अंतर्गत या उत्सवाला प्रोत्साहनही मिळते. याला एक थाई म्हशी संवर्धन दिन म्हणून घोषित करण्यात आले आहे. २०१७ मध्ये या सणाची सुरुवात झाली होती.म्हशी पाळणाऱ्या शेतकऱ्यांना मदतही पुरवली जाते. यामुळे म्हशींची संख्याच वाढत असून नवीन उद्योंगाना देखील चालना मिळते.
FAQs(संबंधित प्रश्न)
प्रश्न १. कोणत्या देशात केले जाते म्हशींच्या सौंदर्य स्पर्धांचे आयोजन?
थायलंडमध्ये केले जाते म्हशींच्या सौंदर्य स्पर्धांचे आणि शर्यतीचे आयोजन.
प्रश्न २. थायलंडमध्ये का केले जाते म्हशींच्या सौंदर्य स्पर्धांचे आयोजन?
पूर्वी शेत नांगरण्यासाठी, जड ओझे वाहून नेण्यासाठी म्हशींचा वापर केला जात होता. पण याची जागा आता तंत्रज्ञाने घेतली. यामुळे म्हशींचे मांस विकण्यास सुरुवात झाली. यावर तोडगा म्हणून या स्पर्धेचे आयोजन केले जाऊ लागले.
America Shutdown : अमेरिकेचा कारभार सहाव्या दिवशीही ठप्प; डोनाल्ड ट्रम्प पडले बुचकळ्यात, म्हणाले…