Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 27 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडोंनी दिला राजीनामा; पक्षाचे नेतेपदही सोडले म्हणाले…

कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी काल ( दि.6 जानेवारी) आपल्या पदाचा राजीनामा दिला. याशिवाय त्यांनी आपल्या पक्षाचे नेतेपदही सोडले. सध्या कॅनडाच्या राजकारणार मोठी उलथापालथ सुरु आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jan 07, 2025 | 08:39 AM
कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडोंनी दिला राजीनामा; पक्षाचे नेतेपदही सोडले म्हणाले...

कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडोंनी दिला राजीनामा; पक्षाचे नेतेपदही सोडले म्हणाले...

Follow Us
Follow Us:

ओटावा: कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी काल( दि.6 जानेवारी) आपल्या पदाचा राजीनामा दिला. यामुळे सध्या कॅडाच्या राजकारणात मोठी उलथापालथ सुरु आहे. याशिवाय त्यांनी आपल्या पक्षाचे नेतेपदही सोडले. राजीनामा देताना त्यांनी आपल्या देशाला उद्देशून केलेल्या भाषणात म्हटले की, पुढील निवडणुकीसाठी स्वतःला योग्य पर्याय ते मानत नाहीत. तसेच त्यांनी म्हटले की, “मी लढवय्या आहे, पण घरातील संघर्षात अडकून राहिलो तर मी कॅनडाच्या जनतेसाठी चांगले नेतृत्व करु शकणार नाही.” त्यांनी कॅनडा जनतेच्या कल्याणासाठी कार्यरत राहण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

ट्रूडो यांच्या राजीनाम्यामागची कारणे

लिबरल पक्षाच्या खासदारांनी अनेक महिन्यांपासून ट्रूडो यांच्यावर राजीनाम्याचा दबाव टाकला होता. पक्षातील 24 खासदारांनी ऑक्टोबरमध्ये जाहीरपणे त्यांना पद सोडण्याचे आवाहन केले होते. डिप्टी पंतप्रधान आणि वित्तमंत्री क्रिस्टिया फ्रीलँड यांनी डिसेंबरमध्ये राजीनामा दिल्यानंतर पक्षात असंतोष अधिक वाढला. फ्रीलँड यांनी ट्रूडो यांच्यावर निर्णय घेण्याच्या प्रक्रियेमध्ये मतभेद असल्याचा आरोप केला होता. तसेच महागाई, कट्टरतावादी प्रवृत्तींचा प्रसार, अप्रवासी समस्या आणि कोविड-19 नंतरची आव्हाने यामुळे ट्रूडो यांच्यावर जनतेचा रोष वाढत होता. सध्या त्यांची लोकप्रियता 30% पर्यंत घसरली असून 65% नागरिकांनी असंतोष व्यक्त केला.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- अमेरिकेत ‘Rabbit Fever’ च्या आजारात 56% वाढ; जाणून घ्या काय आहे हा विचित्र आजार?

लिबरल पार्टीपुढील आव्हाने

ट्रूडो यांच्या राजीनाम्यानंतर लिबरल पक्षाकडे लोकप्रिय आणि प्रभावी नेतृत्व नसून, नवीन पक्षनेता निवडण्यासाठी विशेष अधिवेशन आयोजित करण्यात येईल. मात्र, या अधिवेशनाला काही महिने लागू शकतात. यामुळे पक्षाला नुकसान होण्याची शक्यता आहे. सध्या जस्टिन ट्रुडोंच्या जागी परराष्ट्र मंत्री मेलानी जोली, डोमिनिक लेब्लांक आणि मार्क कानी यांची नावे पुढे येत आहेत. हाऊस ऑफ कॉमन्समध्ये बहुमतासाठी 170 जागा लागतात, परंतु पक्षाकडे फक्त 153 खासदार आहेत. न्यू डेमोक्रॅटिक पार्टीने पाठिंबा काढून घेतल्याने लिबरल सरकार अस्थिर झाले आहे.

भविष्यातील राजकीय परिणाम

जस्टिन ट्रुडोंच्या राजीनाम्यामुळे,  कंझर्व्हेटिव्ह पार्टीचे नेते पियरे पॉइलीवर यांना कॅनडाच्या आगामी निवडणुकांमध्ये मोठा फायदा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. लिबरल पार्टीसाठी हा मोठा टप्पा ठरू शकतो, ज्यामध्ये पक्षाला आपले संघटन मजबूत करणे कठीण जाऊ शकते आणि जनतेचा विश्वास पुन्हा मिळण्यास प्रयत्न करावे लागतील.

जस्टिन ट्रुडोंचा राजीनामा हा कॅनडाच्या राजकीय परिस्थितीत सध्या एक मोठा बदल घडवून आणणार आहे. जस्टिन ट्रुडो यांच्या राजीनाम्यामुळे देशाच्या राजकारणात सध्या खळबळ उडाली आहे. लिबरल पार्टीला नव्या नेतृत्वाखाली आपले अस्तित्व टिकवण्यासाठी आणि कंझर्व्हेटिव्ह पक्षाला टक्कर देण्यासाठी प्रभावी रणनीती आखावी लागेल असे तज्ञांनी म्हटले आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- न्यूझीलंडने व्हिसा आणि स्थलांतर नियमांमध्ये केले ‘हे’ मोठे बदल; भारतीयांसह परदेशींसाठी होणार रोजगार संधी उपलब्ध

Web Title: Canadian pm justin trudeau resigns also steps down as party leader nrss

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 07, 2025 | 08:35 AM

Topics:  

  • Canada
  • Justin Trudeau
  • World news

संबंधित बातम्या

Eco Friendly: सिगारेटच्या थोटकांपासून बनणार मजबूत रस्ते; ऑस्ट्रेलियन संशोधकांनी शोधला शहरातील उष्णता कमी करण्याचा अफलातून उपाय
1

Eco Friendly: सिगारेटच्या थोटकांपासून बनणार मजबूत रस्ते; ऑस्ट्रेलियन संशोधकांनी शोधला शहरातील उष्णता कमी करण्याचा अफलातून उपाय

El Nino :धोक्याची घंटा ;‘गॉडझिला एल निनो’चा कहर! जगभरात ४.५१ लाख मृत्यूंचा अंदाज
2

El Nino :धोक्याची घंटा ;‘गॉडझिला एल निनो’चा कहर! जगभरात ४.५१ लाख मृत्यूंचा अंदाज

Iran Trade Crisis : बंदरांवरील निर्बंधांचा फटका; तुर्की सीमेवर किलोमीटरच्या ट्रकच्या रांगा
3

Iran Trade Crisis : बंदरांवरील निर्बंधांचा फटका; तुर्की सीमेवर किलोमीटरच्या ट्रकच्या रांगा

India-Canada Ties : जयशंकर यांनी शेअर केला अनिता आनंद यांच्या भेटीचा व्हिडिओ; 2030 पर्यंत 70 अब्ज डॉलर्सच्या व्यापाराचे लक्ष्य
4

India-Canada Ties : जयशंकर यांनी शेअर केला अनिता आनंद यांच्या भेटीचा व्हिडिओ; 2030 पर्यंत 70 अब्ज डॉलर्सच्या व्यापाराचे लक्ष्य

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.