Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारताविरुद्ध मोठे षड्यंत्र! पाकिस्तानचे ‘या’ देशाला भेटणे धोकादायक; CDS अनिल चौहान यांनी स्पष्ट सांगितले कारण

CDS Anil Chauhan China support : भारताविरुद्ध चालवण्यात येणाऱ्या षड्यंत्रामध्ये पाकिस्तान आणि चीन या दोन शत्रूराष्ट्रांची भूमिका दिवसेंदिवस धोकादायक ठरत आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Jul 09, 2025 | 10:26 AM
CDS Anil Chauhan said China heavily supported Pakistan during Operation Sindoor

CDS Anil Chauhan said China heavily supported Pakistan during Operation Sindoor

Follow Us
Close
Follow Us:

CDS Anil Chauhan : भारताविरुद्ध चालवण्यात येणाऱ्या षड्यंत्रामध्ये पाकिस्तान आणि चीन या दोन शत्रूराष्ट्रांची भूमिका दिवसेंदिवस धोकादायक ठरत आहे. भारताचे मुख्य संरक्षण प्रमुख, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) जनरल अनिल चौहान यांनी या गंभीर विषयावर भाष्य करत पाकिस्तान आणि चीनमधील वाढत्या सहकार्यामुळे भारताच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असल्याचा गंभीर इशारा दिला आहे.

‘द हिंदू’ला दिलेल्या एका महत्त्वाच्या मुलाखतीत सीडीएस चौहान म्हणाले की, गेल्या पाच वर्षांमध्ये पाकिस्तानला चीनकडून ७० ते ८० टक्के शस्त्रास्त्रे आणि युद्धसामग्री मिळाली आहे. हे फक्त सौदे किंवा मैत्रीपूर्ण व्यवहार नाहीत, तर भारताविरुद्ध आखण्यात आलेल्या दीर्घकालीन युद्धनीतीचा भाग आहे, असा आरोपही त्यांनी केला.

ते पुढे म्हणाले की, दक्षिण आशियामध्ये सतत बदलणाऱ्या सरकारांमुळे या भागातील भू-राजकीय (Geopolitical) समीकरणेही सतत बदलत आहेत. या बदलांमुळे चीन, पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यातील जवळीक वाढते आहे आणि ही एक नवीच आव्हाने भारतापुढे उभी करत आहे. सीडीएस चौहान यांनी हिंद महासागर परिसरातील देशांच्या आर्थिक संकटावरही लक्ष वेधले. “जेव्हा देश आर्थिक अडचणीत सापडतात, तेव्हा बाह्य शक्तींना आपला प्रभाव वाढवण्याची संधी मिळते. याचा परिणाम भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेवरही होतो,” असं ते म्हणाले.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : ‘हा’ देश बनवत आहे जगातील सर्वात घातक 6th जनरेशन ‘F-47’ लढाऊ विमान; 5 महिन्यांपासून गुप्त चाचण्या सुरू

ऑपरेशन सिंदूर आणि चीन-पाकिस्तानचे गूढ संबंध

सीडीएस चौहान यांचा हा इशारा त्या घटनांनंतर आला आहे ज्या ‘ऑपरेशन सिंदूर’ दरम्यान घडल्या. पहलगाममध्ये झालेल्या मोठ्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने जोरदार कारवाई करत ऑपरेशन सिंदूर राबवले. या कारवाईत १०० हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. त्यानंतर पाकिस्तानने भारताविरुद्ध आक्रमणाची तयारी केली होती.

यावेळी उपलष्करप्रमुख लेफ्टनंट जनरल राहुल आर. सिंह यांनीही पाकिस्तानच्या हालचालींबाबत सतर्कता व्यक्त करत सांगितले की, पाकिस्तानला चीनकडून तांत्रिक व लष्करी मदत मिळत आहे. चीनकडून मिळालेल्या शस्त्रास्त्रांमुळे पाकिस्तानची युद्धसज्जता अधिक बळकट झाली आहे.

अमेरिका आणि जागतिक सुरक्षा

जागतिक स्तरावरही सुरक्षेची स्थिती चिंताजनक बनली आहे, असं सांगताना सीडीएस चौहान यांनी अमेरिका या महाशक्तीवरही टीका केली. त्यांनी स्पष्टपणे म्हटले की, जागतिक सुरक्षेला लागलेला ताण आणि अस्थिरता यामागे अमेरिकेच्या धोरणांचा मोठा वाटा आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Nimisha Priya Death Sentence: निमिषा प्रियाला 16 जुलैला येमेनमध्ये फाशी! भारतीय नर्सच्या संघर्षाची ‘हि’ हृदयद्रावक कहाणी

सजग राहावं लागणार

भारताला आता केवळ सीमारेषेवरच नाही, तर राजनैतिक, आर्थिक आणि रणनीतिक पातळीवरही सजग राहावं लागणार आहे. पाकिस्तान-चीन युती आणि बांगलादेशातील संभाव्य हस्तक्षेप हे भारताच्या सुरक्षेसाठी नव्या चिंता घेऊन आले आहेत. सीडीएस अनिल चौहान यांचा इशारा केवळ सावधगिरीचा नाही, तर भविष्यातील धोरण ठरवण्याचा स्पष्ट संकेत आहे.

Web Title: Cds anil chauhan said china heavily supported pakistan during operation sindoor

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 09, 2025 | 10:20 AM

Topics:  

  • China
  • india
  • Operation Sindoor
  • pakistan

संबंधित बातम्या

Bihar Election 2025 : बिहार निवडणुकीशी संबंधित मोठी बातमी! महाआघाडीने मुख्यमंत्र्यांचा चेहरा निवडला, सकाळी ११ वाजता होणार घोषणा
1

Bihar Election 2025 : बिहार निवडणुकीशी संबंधित मोठी बातमी! महाआघाडीने मुख्यमंत्र्यांचा चेहरा निवडला, सकाळी ११ वाजता होणार घोषणा

सरकारी नोकरीची संधी! ‘या’ ७ प्रमुख भरतींसाठी अर्ज करण्याचा शेवटचा आठवडा , झटपट भरा करा अर्ज
2

सरकारी नोकरीची संधी! ‘या’ ७ प्रमुख भरतींसाठी अर्ज करण्याचा शेवटचा आठवडा , झटपट भरा करा अर्ज

भारत-अमेरिकेने व्हावे सावध? चीनच्या नव्या अत्याधुनिक ड्रोन बॉम्बर GJ-X चे उड्डाण यशस्वी, जगभरात खळबळ
3

भारत-अमेरिकेने व्हावे सावध? चीनच्या नव्या अत्याधुनिक ड्रोन बॉम्बर GJ-X चे उड्डाण यशस्वी, जगभरात खळबळ

Jaish-E-Mohammad : जैश-ए- मोहम्मदचा दहशतवादी बनण्यासाठी करावा लागणार कोर्स; मसूद अझहरने तयार केला अभ्यासक्रम
4

Jaish-E-Mohammad : जैश-ए- मोहम्मदचा दहशतवादी बनण्यासाठी करावा लागणार कोर्स; मसूद अझहरने तयार केला अभ्यासक्रम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.