Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Photonics Odyssey : 70 कोटी भारतीयांना मिळणार मोफत इंटरनेट; NASA स्पेस ॲप्स चॅलेंजमध्ये 2025 मध्ये चेन्नईच्या संघाने रचला इतिहास

Space Apps Challenge: चेन्नई येथील फोटोनिक्स ओडिसी या टीमने नासाच्या 2025 स्पेस ॲप्स चॅलेंजमध्ये जागतिक पारितोषिक जिंकले आहे. त्यांचे सॅटेलाइट इंटरनेट मॉडेल भारतातील 70 कोटी लोकांना ब्रॉडबँडशी जोडण्यास सक्षम आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Dec 19, 2025 | 12:38 PM
Chennai boys win NASA's global competition 700 million Indians will get cheap internet

Chennai boys win NASA's global competition 700 million Indians will get cheap internet

Follow Us
Close
Follow Us:
  • भारताचा जागतिक विजय: चेन्नईच्या ‘फोटोनिक्स ओडिसी’ संघाने नासाच्या २०२५ स्पेस ॲप्स चॅलेंजमध्ये ‘सर्वाधिक प्रेरणादायी पुरस्कार’ जिंकला आहे.
  • क्रांतिकारी तंत्रज्ञान: या संघाने विकसित केलेले सॅटेलाइट इंटरनेट मॉडेल भारतातील ७० कोटी लोकांना स्वस्त आणि जलद ब्रॉडबँडने जोडण्यास सक्षम आहे.
  • विक्रमी स्पर्धा: १६७ देशांतील १ लाख १४ हजार स्पर्धकांना मागे टाकत भारतीय तरुणांनी हा पराक्रम केला आहे.

Space Apps Challenge : भारतीय बुद्धिमत्तेने पुन्हा एकदा जगाला आपली दखल घेण्यास भाग पाडले आहे. अमेरिकन अंतराळ संस्था नासा (NASA) ने आयोजित केलेल्या ‘२०२५ आंतरराष्ट्रीय स्पेस ॲप्स चॅलेंज’मध्ये चेन्नईच्या (Chennai) एका संघाने जागतिक विजेतेपद मिळवून इतिहास रचला आहे. या विजयामुळे केवळ भारताची मान उंचावली नाही, तर देशातील डिजिटल दरी मिटवण्यासाठी एक मोठी आशेची किरण निर्माण झाली आहे.

कोण आहे हा ‘विजेता’ संघ?

चेन्नईस्थित ‘फोटोनिक्स ओडिसी’ (Photonics Odyssey) या संघाने या जागतिक हॅकेथॉनमध्ये ‘मोस्ट इन्स्पायरिंग’ (सर्वाधिक प्रेरणादायी) पुरस्कारावर आपले नाव कोरले आहे. मनीष डी. आणि प्रशांत जी. यांसारख्या तरुण संशोधकांचा समावेश असलेल्या या संघाने एक असे सॅटेलाइट इंटरनेट मॉडेल तयार केले आहे, जे सध्याच्या महागड्या खाजगी सेवांना टक्कर देऊ शकते. त्यांनी या तंत्रज्ञानाकडे केवळ एक व्यवसाय म्हणून न पाहता, ती एक ‘सार्वजनिक सेवा’ (Public Utility) असावी, असा विचार मांडला आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Bangladesh Violence: रक्ताने माखला लोकशाहीचा चेहरा! ‘भारतामुळे’ बांगलादेशात पत्रकारांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न; VIDEO VIRAL

७० कोटी लोकांसाठी ‘इंटरनेट’ची क्रांती

या प्रकल्पाचा सर्वात मोठा फायदा म्हणजे भारतातील त्या ७० कोटी लोकांसाठी, जे आजही हाय-स्पीड इंटरनेटपासून वंचित आहेत. दुर्गम खेडी, डोंगाळ भाग आणि जिथे वायरने इंटरनेट पोहोचणे कठीण आहे, अशा ठिकाणी हे उपग्रह मॉडेल स्वस्त दरात ब्रॉडबँड सुविधा देऊ शकते. नासाच्या मते, भौगोलिक अडथळ्यांवर मात करून शिक्षण, आरोग्य आणि ग्रामीण विकासात हे मॉडेल मोठी डिजिटल क्रांती घडवून आणेल.

An Indian team’s satellite internet concept emerged as a global winner of NASA’s 2025 International Space Apps Challenge. The Chennai-based team, Photonics Odyssey, proposed a sovereign, phased-array satellite internet infrastructure to expand broadband access across remote… pic.twitter.com/B3K6Socc8N — All India Radio News (@airnewsalerts) December 19, 2025

credit : social media and Twitter

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Deepu Das: बांग्लादेशात ‘हिंदू तरुणा’ला झाडाला टांगून जिवंत जाळले; उस्मान हादीच्या मृत्यूनंतर कट्टरपंथीयांचा नंगा नाच, पाहा VIDEO

नासाचा सर्वात मोठा विज्ञान उत्सव

२०२५ मधील हे ‘स्पेस ॲप्स चॅलेंज’ आतापर्यंतचे सर्वात मोठे आव्हान ठरले. जगभरातील १६७ देशांमधून ११,५०० हून अधिक प्रकल्प सादर करण्यात आले होते. नासाच्या पृथ्वी विज्ञान विभागाच्या संचालक कारेन सेंट जर्मेन यांनी भारतीय संघाचे कौतुक करताना म्हटले की, “खुल्या डेटाचा वापर करून मानवी समस्यांवर उपाय शोधणे हेच या स्पर्धेचे यश आहे.” चेन्नईच्या संघासोबतच ‘ॲस्ट्रो स्वीपर्स’ या भारतीय वंशाच्या संघानेही अवकाशातील कचरा व्यवस्थापनासाठी ‘गॅलेक्टिक इम्पॅक्ट अवॉर्ड’ जिंकून भारताचे वर्चस्व सिद्ध केले आहे. भारताच्या या विजयामुळे हे स्पष्ट झाले आहे की, भविष्यातील तंत्रज्ञान केवळ प्रयोगशाळेत नाही, तर भारतीय तरुणांच्या कल्पक डोक्यातून जन्म घेणार आहे. ७० कोटी लोकांना जगाशी जोडण्याचे हे स्वप्न आता लवकरच प्रत्यक्षात येईल, अशी आशा आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: नासा स्पेस ॲप्स चॅलेंज २०२५ मध्ये कोणत्या भारतीय संघाने विजय मिळवला?

    Ans: चेन्नई येथील 'फोटोनिक्स ओडिसी' (Photonics Odyssey) या संघाने 'सर्वाधिक प्रेरणादायी' श्रेणीत जागतिक पुरस्कार जिंकला आहे.

  • Que: या प्रकल्पाचा मुख्य उद्देश काय आहे?

    Ans: भारतातील दुर्गम भागातील ७० कोटी लोकांना स्वस्त आणि जलद सॅटेलाइट इंटरनेटशी जोडणे, हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे.

  • Que: 'ॲस्ट्रो स्वीपर्स' (Astro Sweepers) संघाने कोणता पुरस्कार जिंकला?

    Ans: या संघाने 'गॅलेक्टिक इम्पॅक्ट अवॉर्ड' जिंकला असून, त्यांचा प्रकल्प अवकाशातील कचरा कमी करण्यावर आधारित आहे.

Web Title: Chennai boys win nasas global competition 700 million indians will get cheap internet

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 19, 2025 | 12:38 PM

Topics:  

  • india
  • NASA
  • NASA Space Agency
  • Space News

संबंधित बातम्या

UPI Digital Payment: भारत बनतोय कॅशलेस! ऑनलाइन पेमेंट मध्ये 33% वाढ; तर 3 महिन्यांत तब्बल ‘इतका’ अब्ज व्यवहार
1

UPI Digital Payment: भारत बनतोय कॅशलेस! ऑनलाइन पेमेंट मध्ये 33% वाढ; तर 3 महिन्यांत तब्बल ‘इतका’ अब्ज व्यवहार

Climate Crisis : दिल्लीचा श्वास का कोंडला? भारतीय शेतकऱ्यांच्या ‘या’ कृतीने NASAचे शास्त्रज्ञही चक्रावले; वाचा कसे ते…
2

Climate Crisis : दिल्लीचा श्वास का कोंडला? भारतीय शेतकऱ्यांच्या ‘या’ कृतीने NASAचे शास्त्रज्ञही चक्रावले; वाचा कसे ते…

धुरंधर चित्रपट पाहून आलेल्या पाकिस्तानी प्रेक्षकाची कबुली; भावुक झाला अन् म्हणाला, “मान्य करतो की… ” Video Viral
3

धुरंधर चित्रपट पाहून आलेल्या पाकिस्तानी प्रेक्षकाची कबुली; भावुक झाला अन् म्हणाला, “मान्य करतो की… ” Video Viral

WaterWar: पाकिस्तानच्या घशाला कोरड; जलयुद्ध तीव्र, भारताने अडवले सिंधूचे पाणी तर आता अफगाणिस्तानानेही केली मोठी गळचेपी
4

WaterWar: पाकिस्तानच्या घशाला कोरड; जलयुद्ध तीव्र, भारताने अडवले सिंधूचे पाणी तर आता अफगाणिस्तानानेही केली मोठी गळचेपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.