Children under 16 banned from using social media patforms in Australia
Instangram Facebook Ban news : कॅनबेरा : ऑस्ट्रेलिया आता फेसबुक, इन्स्टाग्राम, स्नॅपचॅट, टिकटॉक, एक्स (पहिले ट्विटर) रेडिट आणि यू ट्यूब यांसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर बंदी घातली आहे. आता १६ वर्षाखालील मुलांना हे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स वापरण्यास परवानगी नाही. येत्या चार महिन्यात हा निर्णय लागू करण्यात येणार आहे. यासाठी संघीय सरकार कायदा आमंलात आणण्यावर कार्य करत आहे.
यासाठी सरकारने सर्व सोशल मीडिया कंपन्यांना डिसेंबरपर्यंत अल्पवयीन मुलांचे सोशल मीडिया अकाउंटस हटवण्याचे आदेश दिले आहेत. यासाठी मुलांचे वय पडतळाणी सॉफ्टवेअरद्वारे नवीन अकांउट बनवण्यापासूनही रोखले जात आहे. ऑस्ट्रेलिया सरकारच्या या कायद्यानुसार आता १६ वर्षाखालील अल्पवयीन मुलांना पालकांच्या परनागीनेही सोशल मीडिया अकाउंट वापरण्यास मनाई आहे.
US Tariff : डोनाल्ड ट्रम्पने भारतावर का लादला टॅरिफ बॉम्ब? व्हाइट हाउसने स्पष्टच सांगितले कारण
देशभरात सरकारच्या या निर्णयावरुन चर्चा सुरु आहे. तोटे आणि फायदे अशा दोन्ही बांजूनी याचा विचार केला जात आहे. काहींच्या विश्वास, आहे की सध्याच्या जगात सोशल मीडिया द्वारेच मुले स्वत:ची ओळख निर्माण करतात. यामुळे त्यांना सामाजिक संबंधांचा अनुभव मिळतो.तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या देशभरात दर पाचपैकी दौन मुले एकटेपणा जगत असतात. पण या ठिकाणी सोशल मीडिया त्यांच्यासाठी फायदेशीर ठरते.
पण काही लोकांनी सरकारच्या या निर्णयाला पाठिंबा दिला आहे. त्यांच्या मते सोशल मीडियाचे व्यसन त्यांच्या मुलांचे आयुष्य हिरावून घेते आहेत. विशेष करुन पालकांच्या मनात त्यांचे मूल मागे पडण्याची भीती निर्माण झाले आहे. मुले सतत सोशल मीडियावर, स्मार्टफोन्सवर असतात. यामुळे अनेक गंभीर आजार देखील त्यांना होत आहे.
सध्या ऑस्ट्रेलियात पालकांसाठी काही सुचना जारी करण्यात आल्या आहेत. ज्यामुळे बंदी लागू झाल्यानंतर त्यांच्या मुलांना त्रास सहन करावा लागणार नाही.
या सर्व गोष्टींमुळे १० डिसेंबरपर्यंत मुलांना सोशल मीडियाशिवाय, स्मोर्टफोनशिवाय राहण्याची सवय होईल. यामुळे फोन अचानक बंद झाल्यास मुलांचा गोंधळ उडणार नाही. हवे असल्यास डॉक्टरांचाही सल्ला घ्या असेही तज्ज्ञांनी सांगितले आहे.
पाकिस्तानात खळबळ! माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी तुरुंगातून साधला मोठा डाव; शाहबाजची उडाली झोप