पाकिस्तानात खळबळ! माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी तुरुंगातून साधला मोठा डाव; शाहबाजची उडाली झोप (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
Pakistan News : इस्लामाबाद : पाकिस्तानच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांनी पाकिस्तानच्या तुरंगातून एक मोठा डाव साधला आहे. सध्या ते पाकिस्तानच्या अदियाल तुरुंगात आहेत. काही दिवसांपूर्वी पंतप्रधान शाहबाज यांनी इम्रान खान यांच्या पीटीआय पक्ष्यातील नेत्याला विरोधीपक्षनेते (LoP) पदावरुन हटवेल होते. यानंतर हे पद छोट्या पक्षातील नेत्याला सोपवले जाणार असल्याच्या चर्चा सुर होत्या.
पण शाहबाज यांचा हा डाव आता फसला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, इम्रान खान यांच्या पीटीआय पक्षाने विरोधी पक्षनेतेपदासाठी जमात-ए-इस्लामीच्या फजल उर रहमानशी हातमिळवणी केली आहे. यामुळे आता शाहबाज आणि झरदारी पीटीआय पक्षातील नेत्यांना हटवू शकत नाहीत.
यामागचे कारण म्हणजे फजल उर रहमान यांनी शाहबाज यांच्या निर्णयाला विरोध केला आहे. त्यांनी पीटीआयचा अधिकार इतर कोणत्याही पक्षाला दिला जाणार नाही, असे ठामपणे सांगितले आहे. सरकारने विरोधी पक्षांशी बोलणे ठेवले नाही तर त्यांना याचे योग्य उत्तर दिले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर मॉस्को दौऱ्यावर; २६ व्या भारत-रशिया सहकार्य बैठकीत होणार सहभागी
फजल-उर-रहमान हे पाकिस्तानमधील मोठे आणि प्रभावी नेते म्हणून ओळखले जातात. त्यांचा पाठिंबा इम्रान खान आणि त्यांच्या पक्ष्याला मिळाल्यामुळे हा डाव अधिक मजबूत ठरला आहे. तसे पाहता पाकिस्तानात सत्तेवर लष्कराचे नियंत्रण असते. पण मोठ्या निर्णयांमध्ये पंतप्रधान आणि विरोध पक्षनेत्याला बैठकींमध्ये बोलवले जाते. यावेळी त्यांचे मतही मांडण्याचा त्यांना अधिकरा असतो. यामुळे इम्रान खान तुरुंगामध्ये असूनही त्यांचे राजकीय वर्चस्व रहमान यांच्या पाठिंब्याने वाढवू शकतात.
संसदेतील इम्रान खानच्या पक्षाकडे किती जागा?
इम्रान खान आणि फजल-उर-रहमान यांच्यांतील मैत्री दृढ झाल्यास शाहबाज सरकारसाठी मोठी आव्हाने उभा राहण्याची शक्यता आहे. सध्या पाकिस्तानच्या राजकीय संसदेत ३३७ जागा आहे. यातील ९० जागा इम्रान खान यांच्या पीटीआय पक्षाकडे कडे आहेत. तर फजल-उर-रहमान यांच्याकडे १० जागा आहेत. दोन्ही नेते एकत्र केल्यास त्यांच्याकडील जागांचा आकडा मोठा होईल.
शिवाय सिनेटमध्येही इम्रान खान यांच्याकडे १४ जागा आणि रहमान यांच्याकडे ७ जागा आहे. यामुळे हे दोन्ही नेते एकत्र आल्यास त्यांच्याकडे जास्त जागा होती. विरोधीपक्षनेते पदासाठी केवळ १० जागांची आवश्यकता असते. मात्र दोन्ही नेत्यांच्या एकत्र येण्याने इम्रान खान यांना हे पद मिळण्याची शक्यता आहे.
सध्या या घटनांना अधिक महत्व प्राप्त झाले आहे. सध्या पाकिस्तानमध्ये सध्याच्या सरकारविरोधात तीव्र रोष आहे. विशेष करुन बलुचिस्तान आणि खैबर पख्तूनख्वा प्रदेशांमध्ये. यामुळे इम्रान खान आणि फजल-उर रहमान एकत्र आल्यास शाहबाज सरकारला विरोध वाढून पूर्णपणे पीटीआय पक्षाला पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे. यामुळे पाकिस्तानच्या राजकारणात मोठे बदल घडण्याची शक्यता आहे.
US Tariff : डोनाल्ड ट्रम्पने भारतावर का लादला टॅरिफ बॉम्ब? व्हाइट हाउसने स्पष्टच सांगितले कारण