Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Baramati Assembly bypoll Elections 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

World War 3: ड्रॅगनच्या दारात भारताचे ‘यमदूत’! BrahMos आणि Akashच्या जोडीने फिलीपिन्स अभेद्य; चीनच्या नौदलाला पळता भुई थोडी

Philippines Brahmos: दक्षिण चीन समुद्रात ब्राह्मोस क्षेपणास्त्र तैनात केल्याने फिलीपिन्स कोस्टल डिफेन्स रेजिमेंटची क्षमता लक्षणीयरीत्या वाढली आहे, ज्यामुळे त्यांना त्यांच्या सागरी हद्दीत कोणत्याही शत्रूच्या जहाजाला....

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Mar 11, 2026 | 02:18 PM
philippines deploys india brahmos missile near taiwan border china tension marathi news

philippines deploys india brahmos missile near taiwan border china tension marathi news

Follow Us
Close
Follow Us:
  • चीनच्या उंबरठ्यावर प्रलय
  • अभेद्य सुरक्षा कवच
  • ड्रॅगनची कोंडी

Philippines Brahmos Deployment : जागतिक राजकारणात भारताची संरक्षण ताकद आता केवळ सीमेपुरती मर्यादित राहिलेली नाही. फिलीपिन्सने तैवानच्या अगदी जवळ आणि चीनच्या (china vs philippines) सागरी हद्दीला लागून असलेल्या भागात भारताकडून खरेदी केलेली ब्राह्मोस (BrahMos) सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्रे तैनात केली आहेत. फिलीपिन्स मीडियाच्या अहवालानुसार, मरीन कॉर्प्सच्या कोस्टल डिफेन्स रेजिमेंटने या विनाशक क्षेपणास्त्रांच्या बॅटरी उत्तर लुझोनमध्ये कार्यान्वित केल्या आहेत. या एका निर्णयामुळे दक्षिण चीन समुद्रातील सत्तासमीकरणे पूर्णपणे बदलली असून चीनच्या ‘विस्तारवादी’ धोरणाला मोठा लगाम बसला आहे.

लुझोन सामुद्रधुनी: चीनचा ‘डेथ झोन’ ठरणार?

फिलीपिन्सने ब्राह्मोस क्षेपणास्त्रे ज्या ठिकाणी तैनात केली आहेत, ते ठिकाण धोरणात्मकदृष्ट्या अत्यंत संवेदनशील आहे. कॅम्प केप बोजेडोर (Camp Cape Bojedor) येथून डागलेले ब्राह्मोस क्षेपणास्त्र लुझोन सामुद्रधुनीतील कोणत्याही चिनी युद्धनौकेला किंवा विमानवाहू जहाजाला काही सेकंदात जलसमाधी देऊ शकते. हा समुद्री मार्ग तैवान आणि फिलीपिन्समधील मुख्य प्रवेशद्वार असून येथूनच चिनी नौदलाच्या हालचाली चालतात. आता भारताचे हे ‘ब्रह्मास्त्र’ थेट चीनच्या दारात उभे ठाकले आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : THAAD Defence: युद्धात इराणला पहिलं यश! इराणच्या धाकाने दक्षिण कोरियाचं ‘कवच’ हिसकावलं; किम जोंग-उनला मोठी संधी

आकाश आणि ब्राह्मोसची जोडी: ड्रॅगनची सुरक्षा यंत्रणा फेल!

केवळ ब्राह्मोसच नाही, तर या क्षेपणास्त्रांच्या संरक्षणासाठी फिलीपिन्सने भारताची ‘आकाश’ (Akash Air Defence System) ही जमिनीवरून हवेत मारा करणारी यंत्रणा देखील तैनात केली आहे. ब्राह्मोस हे शत्रूची जहाजे नष्ट करण्यासाठी आहे, तर ‘आकाश’ हे शत्रूची विमाने आणि ड्रोनपासून ब्राह्मोसच्या तळाचे संरक्षण करेल. विशेष म्हणजे, गेल्या वर्षी पाकिस्तानविरुद्धच्या संघर्षात ‘आकाश’ने आपली ताकद सिद्ध केल्याने फिलीपिन्सने यावर विश्वास दर्शवला आहे. चीनची कोणतीही हवाई संरक्षण यंत्रणा ब्राह्मोसच्या ‘सुपरसॉनिक’ वेगाला रोखू शकत नाही, हीच चीनची सर्वात मोठी डोकेदुखी ठरत आहे.

After the Philippines 🇵🇭, Now Indonesia 🇮🇩 entered into an agreement with India to buy the BrahMos missile system. The deal is estimated to be worth $200-350 million. 🇮🇳 pic.twitter.com/PuU9HkTHDL — Defence Core (@Defencecore) March 9, 2026

credit – social media and Twitter

‘हिट-अँड-रन’ रणनीती: चीनला वेढण्याचा प्लॅन

फिलीपिन्सच्या संरक्षण तज्ज्ञांच्या मते, हे क्षेपणास्त्र युनिट एकाच जागी स्थिर राहणार नाही. ब्राह्मोसची ही यंत्रणा ट्रकद्वारे फिलीपिन्सच्या विविध बेटांवर (उदा. पलावान, मिंडोरो) वेगाने हलवता येते. युद्धाच्या वेळी “हल्ला करा आणि गायब व्हा” (Hit-and-Run) या रणनीतीचा वापर करून चिनी नौदलाचे कंबरडे मोडण्याची तयारी फिलीपिन्सने केली आहे. या भागात अमेरिकेची ‘टायफून’ आणि ‘HIMARS’ यंत्रणा आधीच तैनात आहे, त्यात भारताच्या ब्राह्मोसची भर पडल्याने चीन आता तिन्ही बाजूंनी वेढला गेला आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Dubai International Airport वर इराणी ड्रोनचा धुमाकूळ; एका भारतीयासह 4 जण रक्ताच्या थारोळ्यात, या गोंधळाचा VIDEO VIRAL

तैवान युद्धाचा ‘बफर झोन’

जर चीनने तैवानवर हल्ला केला, तर त्याचे थेट पडसाद फिलीपिन्सवर उमटतील. अशा स्थितीत उत्तर लुझोनमधील हे नवीन क्षेपणास्त्र युनिट एक ‘बफर झोन’ म्हणून काम करेल. भारताकडून अधिक ब्राह्मोस खरेदी करण्यासाठी फिलीपिन्सचे लष्कर सध्या वाटाघाटी करत आहे. याचाच अर्थ, येणाऱ्या काळात चीनच्या सीमेजवळ भारतीय बनावटीच्या अस्त्रांचा मोठा ताफा तैनात असेल.

💡

Frequently Asked Questions

  • Que: ब्राह्मोस क्षेपणास्त्र चीनसाठी धोकादायक का आहे?

    Ans: ब्राह्मोस हे जगातील सर्वात वेगवान सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्र आहे. याचा वेग आणि मारा करण्याची अचूकता इतकी जबरदस्त आहे की, चीनची कोणतीही यंत्रणा याला हवेत पकडू शकत नाही.

  • Que: फिलीपिन्सने हे क्षेपणास्त्र कुठे तैनात केले आहे?

    Ans: फिलीपिन्सने हे क्षेपणास्त्र तैवानच्या जवळ असलेल्या उत्तर लुझोन बेटावरील 'कॅम्प केप बोजेडोर' येथे तैनात केले आहे.

  • Que: 'आकाश' क्षेपणास्त्र प्रणालीचे काम काय आहे?

    Ans: आकाश यंत्रणा ही ब्राह्मोसच्या तळाचे शत्रूच्या विमानांपासून आणि क्षेपणास्त्रांपासून संरक्षण करण्यासाठी तैनात करण्यात आली आहे.

Web Title: Philippines deploys india brahmos missile near taiwan border china tension marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 11, 2026 | 02:18 PM

Topics:  

  • China
  • Taiwan
  • World War 3

संबंधित बातम्या

China Flood : चीनमध्ये पावसाचा हाहा:कार! Qinzhou शहरात ढगफुटीने विनाशकारी पूर, जनजीवन विस्कळीत
1

China Flood : चीनमध्ये पावसाचा हाहा:कार! Qinzhou शहरात ढगफुटीने विनाशकारी पूर, जनजीवन विस्कळीत

रोबोट पडला प्रेमात! नाचता नाचताच मुलीजवळ गेला अन् मारली घट्ट मिठी, काही केल्या सोडेने तिचा हात; घटनेचा Video Viral
2

रोबोट पडला प्रेमात! नाचता नाचताच मुलीजवळ गेला अन् मारली घट्ट मिठी, काही केल्या सोडेने तिचा हात; घटनेचा Video Viral

China Spies: चिनी गुप्तहेरांचा हनीट्रॅप! निवृत्त भारतीय अधिकाऱ्यांना डॉलरचे आमिष; भारताविरोधात सोशल मीडियावर ‘हे’ मोठं षडयंत्र
3

China Spies: चिनी गुप्तहेरांचा हनीट्रॅप! निवृत्त भारतीय अधिकाऱ्यांना डॉलरचे आमिष; भारताविरोधात सोशल मीडियावर ‘हे’ मोठं षडयंत्र

Oil Politics : युद्धाच्या आगीत महासत्तांची ‘आफ्रिका वारी’! अमेरिका रेड सीमध्ये सक्रिय; तर चीनने टाकला 348 अब्ज डॉलर्सचा फास
4

Oil Politics : युद्धाच्या आगीत महासत्तांची ‘आफ्रिका वारी’! अमेरिका रेड सीमध्ये सक्रिय; तर चीनने टाकला 348 अब्ज डॉलर्सचा फास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.