Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Mumbai Crime |
  • Lifestyles |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

“शासकीय कामकाजात AI चा वापर…”; ‘इंडिया ग्लोबल फोरम’मध्ये CM Devendra Fadnavis यांचे विधान

महाराष्ट्रात ‘पॉलिसी-लेड ग्रोथ’ हा विकासाचा मंत्र आहे. गेल्या एका वर्षात राज्य सरकारने लॉजिस्टिक्स, फिनटेक, जेम्स अँड ज्वेलरी, उद्योग अशा विविध क्षेत्रांसाठी १४ नवीन धोरणे जाहीर केली आहेत.

  • By तेजस भागवत
Updated On: Mar 10, 2026 | 06:14 PM
“शासकीय कामकाजात AI चा वापर…”; ‘इंडिया ग्लोबल फोरम’मध्ये CM Devendra Fadnavis यांचे विधान
Follow Us
Follow Us:

पॉलिसी-आधारित विकास मॉडेल राज्याच्या विकासात फायदेशीर- फडणवीस
हिरो फिनकॉर्प आयोजित इंडिया ग्लोबल फोरममध्ये बोलत होते मुख्यमंत्री
२०१५ पासून राज्य शासनाने विकसित केली ‘वॉर रूम’ संकल्पना

मुंबई: महाराष्ट्राच्या विकासासाठी राबविण्यात येत असलेल्या ‘वॉर रूम’ प्रणाली आणि पॉलिसी-आधारित विकास मॉडेल या शासनाच्या कामकाजात वेग, पारदर्शकता आणि परिणामकारकता आणण्यासाठी महत्त्वपूर्ण संकल्पना ठरत असल्याचे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. हिरो फिनकॉर्प आयोजित इंडिया ग्लोबल फोरम, मुंबई २०२६ कार्यक्रमात, अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज लाडवा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची हॉटेल ताज लँड एंड्स येथे झालेल्या कार्यक्रमात मुलाखत घेतली, त्यावेळी ते बोलत होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, २०१५ पासून राज्य शासनाने ‘वॉर रूम’ संकल्पना विकसित केली आहे. या प्रणालीद्वारे विविध प्रकल्पांचे सतत निरीक्षण केले जाते. पायाभूत सुविधा, सामाजिक प्रकल्प आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रकल्पांसाठी स्वतंत्र वॉर रूम तयार करण्यात आल्या आहेत. विविध मंत्रालये, केंद्र सरकार, राज्य शासन आणि स्थानिक स्वराज्य संस्था यांच्याशी समन्वय साधताना प्रकल्पांमध्ये होणारा विलंब टाळण्यासाठी ही यंत्रणा प्रभावी ठरते. या वॉर रूममधून प्रकल्पांची प्रगती नियमितपणे तपासली जाते आणि अडचणी त्वरित सोडविल्या जातात. “शासनामध्ये अनेक स्तरांवरील भागधारक असतात, त्यामुळे कामाचा वेग कायम राहण्यासाठी वॉर रूममुळे सर्वांना एकाच ठिकाणी आणून निर्णय घेणे शक्य होते,” असे त्यांनी सांगितले.

याशिवाय, राज्याच्या दीर्घकालीन विकासासाठी ‘विकसित महाराष्ट्र २०४७’ या दृष्टीकोनानुसार एक विशेष व्हिजन मॅनेजमेंट युनिट स्थापन करण्यात आले आहे. हे युनिट २०२९, २०३५ आणि २०४७ या टप्प्यांनुसार ठरवलेल्या उद्दिष्टांची अंमलबजावणी आणि प्रगतीवर लक्ष ठेवते. असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. तंत्रज्ञानाच्या वापराबाबत मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, शासकीय कामकाजात कृत्रिम बुद्धिमतेचा वापर वाढविण्यावरही भर दिला जात आहे.

Interesting conversation at India Global Forum, Mumbai 2026, focused on Maharashtra’s future growth and how policy, innovation, and global capital can accelerate the State’s journey towards becoming one of the world’s most dynamic economic hubs. (Mumbai | 09-03-2026 )… pic.twitter.com/btOKYzQAWn — Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) March 9, 2026

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, महाराष्ट्रात ‘पॉलिसी-लेड ग्रोथ’ हा विकासाचा मंत्र आहे. गेल्या एका वर्षात राज्य सरकारने लॉजिस्टिक्स, फिनटेक, जेम्स अँड ज्वेलरी, उद्योग अशा विविध क्षेत्रांसाठी १४ नवीन धोरणे जाहीर केली आहेत. प्रत्येक क्षेत्रासाठी स्पष्ट धोरण, प्रोत्साहन योजना आणि प्रक्रिया निश्चित केल्यामुळे गुंतवणूकदारांचा विश्वास वाढला आहे.

BMC मध्ये पारदर्शकतेचे नवे पर्व! मुंबईसाठी भाजपचा १०० दिवसांचा ‘२० सूत्रीय’ कार्यक्रम; मुख्यमंत्र्यांचे भ्रष्टाचारमुक्तीचे आदेश

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी शासनाची स्थिरता, धोरणांची स्पष्टता आणि ‘ईज ऑफ डुइंग बिझनेस’ हे तीन महत्वाचे घटक आहेत. उद्योगांना देण्यात येणाऱ्या परवानग्यांची संख्या कमी करणे, प्रक्रिया सुलभ करणे आणि वेळ कमी करणे यासाठी मोठ्या प्रमाणावर सुधारणा करण्यात आल्या आहेत. आता पुढील टप्प्यात १०० नवीन सुधारणा राबविण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

Web Title: Cm devendra fadnavis said india global forum summit ai use in government work

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 10, 2026 | 06:14 PM

Topics:  

  • Business News
  • CM Devendra Fadnavis
  • maharashtra news

संबंधित बातम्या

Inflation: महाग तेलाने बिघडवला सर्व खेळ, अन्नधान्यच्या किमतीने सामन्यांना केले हवालदिल; ३.९३% वर पोहचली महागाई
1

Inflation: महाग तेलाने बिघडवला सर्व खेळ, अन्नधान्यच्या किमतीने सामन्यांना केले हवालदिल; ३.९३% वर पोहचली महागाई

Tukaram Mundhe Transfer:  तुकाराम मुंडेंच्या प्रतिमेला थेट दुग्धाभिषेक! बदली न करण्यासाठी मंगळवेढ्यातील जनता रस्त्यावर
2

Tukaram Mundhe Transfer: तुकाराम मुंडेंच्या प्रतिमेला थेट दुग्धाभिषेक! बदली न करण्यासाठी मंगळवेढ्यातील जनता रस्त्यावर

Cancer Medicine: कॅन्सर रुग्णांना दिलासा देण्यासाठी शासनाचा मोठा निर्णय, 2 औषधांची वाढवली Price Cap, कसा मिळणार लाभ
3

Cancer Medicine: कॅन्सर रुग्णांना दिलासा देण्यासाठी शासनाचा मोठा निर्णय, 2 औषधांची वाढवली Price Cap, कसा मिळणार लाभ

Rohit Sharma आता बिझनेस पिचवर! प्रसिद्ध फिटनेस स्टार्टअप ‘Fittr’ मध्ये केली मोठी गुंतवणूक; बनला इक्विटी पार्टनर
4

Rohit Sharma आता बिझनेस पिचवर! प्रसिद्ध फिटनेस स्टार्टअप ‘Fittr’ मध्ये केली मोठी गुंतवणूक; बनला इक्विटी पार्टनर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.