Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

छत्रपती संभाजीनगरमध्ये औद्योगिक संकट! उद्योजकांची तातडीची बैठक; राज्य सरकारकडे करणार मागणी

केंद्र सरकारने औद्योगिक एलपीजी पुरवठा थांबवल्यामुळे छत्रपती संभाजीनगरमधील उद्योगांमध्ये खळबळ उडाली आहे. वाळूजमध्ये मसिआच्या बैठकीत उद्योजकांनी व्यक्त केली चिंता.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Mar 11, 2026 | 02:57 PM
छत्रपती संभाजीनगरमध्ये औद्योगिक संकट!

छत्रपती संभाजीनगरमध्ये औद्योगिक संकट!

Follow Us
Follow Us:

  • छत्रपती संभाजीनगरमध्ये औद्योगिक संकट!
  • उद्योजकांची तातडीची बैठक
  • राज्य सरकारकडे करणार मागणी
केंद्र सरकारच्या पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने प्रोपेन व ब्युटेन वायूचा वापर केवळ घरगुती एलपीजी (LPG) उत्पादनासाठी राखीव ठेवण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे औद्योगिक वापरासाठी होणारा एलपीजी पुरवठा तातडीने थांबवण्यात आला असून, याचा मोठा फटका छत्रपती संभाजीनगरमधील उद्योगांना बसला आहे. इंधन टंचाईच्या या गंभीर पार्श्वभूमीवर वाळूज येथे उद्योजकांची तातडीची बैठक पार पडली, ज्यामध्ये अनेक युनिट्स बंद पडण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.

मसिआची (MASSIA) आक्रमक भूमिका; केंद्र व राज्य सरकारला साकडे

वाळूज येथील मसिआच्या ‘अनिल विश्वासराव चव्हाण’ सभागृहात आयोजित या बैठकीत उद्योजकांनी आपल्या व्यथा मांडल्या. औद्योगिक उत्पादन प्रक्रिया अखंड सुरू राहण्यासाठी स्थिर इंधन पुरवठा आवश्यक असतो. मात्र, अचानक गॅस पुरवठा बंद झाल्यामुळे येथील उद्योगांची परिस्थिती बिकट झाली आहे. या समस्येकडे केंद्र आणि राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी मसिआतर्फे तातडीने पत्रव्यवहार करण्यात आला असल्याची माहिती मसिआचे अध्यक्ष अर्जुन गायकवाड यांनी दिली.

Iran-Israel War: इराणविरोधी कारवाईत ४८ तासांत अमेरिकेचे निघाले दिवाळे; तब्बल इतक्या कोटींचा खर्च 

आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम

आखाती देशांमध्ये निर्माण झालेली युद्धजन्य परिस्थिती आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर विस्कळीत झालेली इंधन साखळी, यामुळे भारताला इंधन व्यवस्थापनासाठी कठोर पावले उचलावी लागली आहेत. केंद्र सरकारने घरगुती ग्राहकांसाठी इंधन राखीव ठेवल्याने उद्योगांच्या उत्पादनात अडथळे निर्माण झाले आहेत. बैठकीत या जागतिक घडामोडींमुळे स्थानिक उद्योगांवर होणाऱ्या परिणामांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

पावडर कोटिंग युनिट्सना पहिला तडाखा

बैठकीत मिळालेल्या माहितीनुसार, गॅस पुरवठा खंडित झाल्यामुळे छत्रपती संभाजीनगरमधील काही पावडर कोटिंग युनिट्स आजपासूनच बंद पडली आहेत. एलपीजीसाठी पर्याय म्हणून डिझेल, इलेक्ट्रिक किंवा सीएनजी गॅसचा वापर करण्यावर चर्चा झाली, मात्र अनेक उद्योगांची यंत्रणा पूर्णपणे एलपीजीवर आधारित आहे. अशा परिस्थितीत तातडीने पर्यायी इंधनावर स्थलांतर करणे तांत्रिक आणि आर्थिकदृष्ट्या शक्य नसल्याचे उद्योजकांनी नमूद केले.

उद्योजकांची मोठी उपस्थिती

या बैठकीला मसिआचे अध्यक्ष अर्जुन गायकवाड यांच्यासह किरण जगताप, मनीष अग्रवाल, राहुल मोगले, सचिन गायके, सर्जेराव साळुंके, राजेश मानधनी, अजय गांधी, जगदीश जोशी, प्रदीप चौधरी, हरिश पठाडे, श्रीराम शिंदे आणि विविध औद्योगिक क्षेत्रातील उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tech Mahindra Layoff: टेक महिंद्रा ३०,००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकणार? सोशल मीडियावरील दाव्यांमुळे गोंधळ

Web Title: Industrial crisis in chhatrapati sambhajinagar urgent meeting of industrialists

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 11, 2026 | 02:57 PM

Topics:  

  • Business News
  • Chhatrapati Sambhajinagar

संबंधित बातम्या

Samsung AI : भारतातील घराघरांत आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा प्रवेश; गेल्या 3 वर्षांत सॅमसंगच्या एआय उपकरणांच्या विक्रीत 9 पट वाढ
1

Samsung AI : भारतातील घराघरांत आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा प्रवेश; गेल्या 3 वर्षांत सॅमसंगच्या एआय उपकरणांच्या विक्रीत 9 पट वाढ

Gold Rate Today : सोन्याचे भाव कडाडले! किमती थेट 1.54 लाखांच्या पार; चांदीतही मोठी वाढ
2

Gold Rate Today : सोन्याचे भाव कडाडले! किमती थेट 1.54 लाखांच्या पार; चांदीतही मोठी वाढ

‘बिग बुल’ची निवृत्ती … 96 व्या वर्षी Warren Buffett यांचा मोठा निर्णय; 61 वर्षांत Share Market मधून कमावले तब्बल इतके कोटी
3

‘बिग बुल’ची निवृत्ती … 96 व्या वर्षी Warren Buffett यांचा मोठा निर्णय; 61 वर्षांत Share Market मधून कमावले तब्बल इतके कोटी

ASCI चा मोठा निर्णय, AI युगात जाहिरातींची विश्वासार्हता टिकवण्यासाठी महत्त्वाचं पाऊल; Vision 2032 द्वारे आखली नवी दिशा
4

ASCI चा मोठा निर्णय, AI युगात जाहिरातींची विश्वासार्हता टिकवण्यासाठी महत्त्वाचं पाऊल; Vision 2032 द्वारे आखली नवी दिशा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.