Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘तुम्ही आगीशी खेळताय’, अमेरिकेच्या तैवानला मदतीने संतापला चीन; ‘One China’ पॉलिसीचे उल्लंघन केल्याचा आरोप

अमेरिका आणि चीन यांच्यातील संबंध पुन्हा एकदा तैवानच्या मुद्द्यावरुन बिघडले आहेत. चीनने तैवानला अमेरिकेने दिलेल्या संरक्षण सहाय्य पॅकेजचा विरोध केला आहे. चीनने म्हटले आहे की, हे करताना अमेरिका आगीश खेळत आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Dec 23, 2024 | 10:44 AM
'तुम्ही आगीशी खेळताय', अमेरिकेच्या तैवानला मदतीने संतापला चीन; 'One China' पॉलिसीचे उल्लंघन केल्याचा आरोप

'तुम्ही आगीशी खेळताय', अमेरिकेच्या तैवानला मदतीने संतापला चीन; 'One China' पॉलिसीचे उल्लंघन केल्याचा आरोप

Follow Us
Follow Us:

बीजिंग: अमेरिका आणि चीन यांच्यातील संबंध पुन्हा एकदा तैवानच्या मुद्द्यावरुन बिघडले आहेत. चीनने तैवानला अमेरिकेने दिलेल्या संरक्षण सहाय्य पॅकेजचा विरोध केला आहे. चीनने म्हटले आहे की, हे करताना अमेरिका आगीश खेळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिकेने नुकतेच तैवीनसाठी 4.85 हजार कोटी रुपयांची संरक्षण पॅकेडची घोषणा केली होती. यामुळे चीनने तीव्र संताप व्यक्त केला आहे. अमेरिकेने चीनच्या वन चायना पॉलिसीचे उल्लंघन केल्याचे चीनने म्हटले आहे.

तैवान रेड लाईन आहे- चीन

याशिवाय, अमेरिकेने दोन दिवसांपूर्वी संरक्षण विभागाकडून तैवानसाठी 2.50 हजार कोटी रुपयांच्या लष्करी विक्रीलाही मंजुरी दिली आहे. यावर चीनच्या परारष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, या कृचीने अमेरिकेने वन चायना पॉलिसीचे उल्लंघन केले आहे. मंत्रालयाने स्पष्ट केले आहे की, तीन आपल्या सार्वभौमत्वाचे आणि प्रादेशिक अखंडतेचे रक्षण करण्यासाठी सर्व आवश्यक पावले उचलेल. याशिवाय चीनने तैवानला रेड लाईन असल्याचे स्पष्ट केले आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- सर्व बंडखोर गट सीरियन लष्कराचा भाग बनणार; HTS प्रमुखाचे मोठे वक्तव्य, कशी असेल नवीन राजवट?

शांततेला धोका

चीनने अमेरिकेला तैवानला शस्त्रे पुरवण्याचे थांबवण्याचे आवाहन केले आहे. चीनच्या म्हणण्यानुसार, अमेरिकेच्या या कृतीमुळे या प्रदेशातील स्थैर्य व शांतता धोक्यात येऊ शकते. चीनी स्टेट काउंसिलच्या प्रवक्त्या झू फेंगलियान यांनीही अमेरिकेच्या या कृतीचा तीव्र विरोध केला आहे.तर दुसऱ्या बाजूला, तैवानने अमेरिकेच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. तैवानच्या परराष्ट्र मंत्रालयाने सोशल मीडियावर अमेरिकेचे आभार मानत म्हटले की, हा निर्णय तैवानच्या सुरक्षेसाठी अमेरिकेची वचनबद्धता दर्शवतो.

वन चायना पॉलिसी म्हणजे काय?

चीनच्या मते, जगात एकच चीन आहे, आणि तैवान हा चीनचाच अविभाज्य भाग आहे. चीन तैवानला स्वतंत्र देश मानणाऱ्या किंवा त्याच्याशी संबंध ठेवणाऱ्या देशांचा विरोध करतो. भारतासह अनेक देश “वन चायना पॉलिसी”चे समर्थन करतात.

अमेरिका-चीन तणावातील तैवान महत्त्वाचा मुद्दा

अमेरिकेने 1979 मध्ये चीनसोबत संबंध सुधारले आणि तैवानसोबतच्या राजनैतिक संबंधांना समाप्ती दिली. तरीही, अमेरिकेने चीनच्या विरोधाला डावलून तैवानला शस्त्रे पुरवली आहेत. अमेरिकेनेही “वन चायना पॉलिसी”ला समर्थन दिले आहे, पण तैवानच्या मुद्द्यावर त्याची भूमिका साशंक राहिली आहे.

चीनचा तैवानवर कब्जा करण्याचा प्रयत्न

1940 च्या दशकात चीनमध्ये कम्युनिस्ट राजवट आल्यावर राष्ट्रवादी तैवानमध्ये गेले आणि तिथे लोकशाही सरकार स्थापन केले. चीन तैवानला स्वतःचा भाग मानतो, तर तैवान स्वतःला स्वतंत्र देश समजतो. चीन तैवानच्या हवाई सीमांमध्ये सातत्याने घुसखोरी करत असून, अमेरिकन नौदलाच्या हालचालींवर नजर ठेवण्यासाठी सैन्य तैनात करत आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या – अमेरिकेच्या सैन्याचा स्व:ताच्याच लढाऊ विमानांवर हल्ला; मोठं कारण आलं समोर

Web Title: China calls taiwan a red line criticises new milatary us aid to taiwan nrss

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 23, 2024 | 10:44 AM

Topics:  

  • America
  • China
  • World news

संबंधित बातम्या

Indus Waters Treaty : सिंधू पाणी वाटप करारावरुन पुन्हा तणाव; भारताच्या ‘या’ निर्णयावर भडकला पाकिस्तान
1

Indus Waters Treaty : सिंधू पाणी वाटप करारावरुन पुन्हा तणाव; भारताच्या ‘या’ निर्णयावर भडकला पाकिस्तान

Sukhoi SJ 100: भारत आणि रशिया पुन्हा एकत्र! 200 सुपरजेट विमानांबाबत मोठा संकेत; विमान वाहतूक क्षेत्रात घडवू शकतो मोठे बदल
2

Sukhoi SJ 100: भारत आणि रशिया पुन्हा एकत्र! 200 सुपरजेट विमानांबाबत मोठा संकेत; विमान वाहतूक क्षेत्रात घडवू शकतो मोठे बदल

India Venezuela संबंधांना नवी दिशा; राष्ट्राध्यक्ष डेल्सी रॉड्रिग्ज यांची PM मोदींसोबत महत्त्वपूर्ण बैठक
3

India Venezuela संबंधांना नवी दिशा; राष्ट्राध्यक्ष डेल्सी रॉड्रिग्ज यांची PM मोदींसोबत महत्त्वपूर्ण बैठक

Abu Dhabi : मुस्लिम देशात वसलेल्या भारतीय संस्कृतीचा जगभर गौरव; अबू धाबीतील BAPS हिंदू मंदिराला ‘Global Tolerance Award 2026’
4

Abu Dhabi : मुस्लिम देशात वसलेल्या भारतीय संस्कृतीचा जगभर गौरव; अबू धाबीतील BAPS हिंदू मंदिराला ‘Global Tolerance Award 2026’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.