Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘दोस्त दोस्त ना रहा…’ चीनने पाकिस्तानला दिला मोठा धक्का, ‘ही’ शस्त्रे देण्यास नकार; शाहबाज सरकार हळहळले

Pakistan Setback Hypersonic Missiles: भारताच्या प्रगत हायपरसोनिक क्षेपणास्त्र तंत्रज्ञानाशी स्पर्धा करण्यासाठी पाकिस्तानने चीनकडे मदत मागितली होती. मात्र, चीनने आपल्या ‘जवळच्या मित्र देशा’लाही स्पष्ट शब्दांत नकार दिला.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Jun 28, 2025 | 02:01 PM
China denies hypersonic missiles to Pakistan major setback for Shahbaz govt

China denies hypersonic missiles to Pakistan major setback for Shahbaz govt

Follow Us
Close
Follow Us:

Pakistan Setback Hypersonic Missiles : भारताच्या प्रगत हायपरसोनिक क्षेपणास्त्र तंत्रज्ञानाशी स्पर्धा करण्यासाठी पाकिस्तानने चीनकडे मदत मागितली होती. मात्र, चीनने आपल्या ‘जवळच्या मित्र देशा’लाही स्पष्ट शब्दांत नकार दिला आहे. चीनने पाकिस्तानला हायपरसोनिक क्षेपणास्त्रे आणि त्यांचे उत्पादन तंत्रज्ञान (Transfer of Technology – ToT) देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे पाकिस्तान सरकार, विशेषतः पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्यासाठी ही बाब अत्यंत अस्वस्थ करणारी ठरली आहे.

चीनचा स्पष्ट नकार : तंत्रज्ञान ‘निर्यातयोग्य’ नाही

चीनच्या अधिकृत सूत्रांनी स्पष्ट केले आहे की, हायपरसोनिक क्षेपणास्त्रे अजून निर्यातीसाठी तयार नाहीत. इतकेच नाही, तर अशा क्षेपणास्त्रांची कोणतीही निर्यात आवृत्ती (export variant)ही चीनने तयार केलेली नाही. त्यामुळे पाकिस्तानला हे प्रगत तंत्रज्ञान मिळण्याची शक्यता निकट भविष्यात फारच धूसर आहे. चीनने याआधी पाकिस्तानला JF-17 लढाऊ विमान, HQ-9 वायुरक्षा प्रणाली आणि अन्य सैनिकी उपकरणे पुरवली आहेत. मात्र, हायपरसोनिक क्षेपणास्त्र हे अत्यंत संवेदनशील आणि सामरिक दृष्ट्या महत्त्वाचे तंत्रज्ञान असल्याने, चीनने यावर पूर्ण नियंत्रण ठेवण्याचे धोरण स्वीकारले आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : युद्ध आहे की Meme War! ‘Daddy शिवाय पर्याय नाही…’ इराणने डोनाल्ड ट्रम्पचे नाव घेऊन इस्रायलला डिवचले

पाकिस्तानची भारताशी स्पर्धा अपुरीच?

भारताने गेल्या काही वर्षांत स्वदेशी हायपरसोनिक प्रणाली (जसे की DRDO चा HSTDV प्रकल्प) विकसित करण्याचे महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. त्यामुळे भारताची क्षेपणास्त्रक्षमता लक्षणीयरीत्या वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर पाकिस्तानने चीनकडे अशी मागणी केली होती की, चीनच्या मदतीने त्याला हायपरसोनिक क्षेपणास्त्रे मिळावीत आणि त्यांचे उत्पादनही स्वदेशी पातळीवर करता यावे. मात्र, चीनकडून नकार मिळाल्याने पाकिस्तानला भारताच्या प्रगत संरक्षण तंत्रज्ञानाशी स्पर्धा करणे कठीण जाणार आहे. यामुळे पाकिस्तानच्या सामरिक महत्त्वाकांक्षांना मोठा झटका बसल्याचे मानले जात आहे.

Oooppss Seems like the “Taller than mountains and deeper than oceans” friendship will have very short lifespan. China has rejected to share its hypersonic missiles and tec transfer to Pakistan. pic.twitter.com/wBWDzJmOmT — UP Wale Bhiya (@upwalebhiya) June 27, 2025

credit : social media

चीनच्या नकारामागची कारणे

संरक्षण तज्ज्ञांच्या मते, चीनच्या नकारामागे दोन मुख्य कारणे आहेत :

1. पाकिस्तानकडे आधीच मिळालेल्या शस्त्रसामग्रीचा मर्यादित उपयोग – चीनकडून मिळालेली अनेक शस्त्रप्रणाली प्रत्यक्षात अपेक्षित कार्यक्षमतेनुसार सिद्ध झालेल्या नाहीत.

2. तंत्रज्ञान गळतीची भीती – चीनला शंका आहे की पाकिस्तान हे तंत्रज्ञान थेट किंवा अप्रत्यक्षरित्या पश्चिमी देशांपर्यंत पोहोचवू शकतो. त्यामुळे तांत्रिक सुरक्षिततेच्या दृष्टीने चीनने फार काळजीपूर्वक निर्णय घेतला आहे.

अंतरराष्ट्रीय दबाव आणि राजकीय गणित

हायपरसोनिक क्षेपणास्त्रे ही आंतरराष्ट्रीय सामरिक समतोल बिघडवू शकणारी प्रणाली असल्याने, चीन त्याची वितरण प्रक्रिया अत्यंत मर्यादित ठेवत आहे. याशिवाय, अमेरिकेसारख्या बलाढ्य देशांसोबत सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर चीन हे तंत्रज्ञान अन्य देशांकडे पाठवण्याबाबत अत्यंत सावध भूमिका घेत आहे. तथापि, चीन स्वतः या क्षेपणास्त्रांना आणखी सुधारण्यासाठी आणि मोठ्या प्रमाणात उत्पादनासाठी काम करत आहे. ही प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत ते तंत्रज्ञान इतर देशांकडे हस्तांतरित करण्याचा विचारही करत नाही.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Canada-China Relations : कॅनडाचा चीनवर मोठा घाव! ‘या’ कंपनीला देशातून हाकलले, राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर

 पाकिस्तानची कोंडी, भारताचा फायदा

पाकिस्तानच्या अणुक्षमता आणि क्षेपणास्त्र विकास योजनांमध्ये चीन महत्त्वाची भूमिका बजावत आला आहे. पण हायपरसोनिक प्रणालीबाबत मिळालेला नकार पाकिस्तानसाठी मोठा अपमान मानला जात आहे. यामुळे भारत-पाकिस्तान यांच्यातील तांत्रिक दरी आणखी वाढण्याची शक्यता आहे. शेवटी, चीनच्या या धोरणामुळे पाकिस्तानची सामरिक स्वप्ने खोडली गेली असून, भारतासाठी ही बाब सामरिक फायद्याची ठरू शकते.

Web Title: China denies hypersonic missiles to pakistan major setback for shahbaz govt

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 28, 2025 | 02:01 PM

Topics:  

  • China
  • Nuclear missiles
  • pakistan
  • World news

संबंधित बातम्या

२ लाख घ्या अन् अमेरिका सोडा…; कोणाला दिली ट्रम्प प्रशासनाने ही ऑफर? काय आहे प्रकरण? 
1

२ लाख घ्या अन् अमेरिका सोडा…; कोणाला दिली ट्रम्प प्रशासनाने ही ऑफर? काय आहे प्रकरण? 

Syria News : सीरियाच्या माजी राष्ट्राध्यक्षांची हत्या करण्याचा प्रयत्न; रशियामध्ये विषप्रयोग झाल्याची चर्चा
2

Syria News : सीरियाच्या माजी राष्ट्राध्यक्षांची हत्या करण्याचा प्रयत्न; रशियामध्ये विषप्रयोग झाल्याची चर्चा

ब्रिटनचे पंतप्रधान भारत दौऱ्यावर येणार; दोन्ही देशांच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान संबंधांना मिळणार नवी दिशा
3

ब्रिटनचे पंतप्रधान भारत दौऱ्यावर येणार; दोन्ही देशांच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान संबंधांना मिळणार नवी दिशा

नेपाळमध्ये मुसळधार पावसाचा इशारा जारी; भूस्खलनाच्या भीतीने काठमांडूत वाहतूकीवर बंदी
4

नेपाळमध्ये मुसळधार पावसाचा इशारा जारी; भूस्खलनाच्या भीतीने काठमांडूत वाहतूकीवर बंदी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.