China heavily investing in gold as so India, know why
China News in Marathi : बीजिंग : गेल्या काही काळात सोन्याची भूरळ आता बायकांनाच नाही, तर जगभरातील देशांनाही पडत आहे. अनेक देश सोन्यात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करत आहे. सोन्याचा प्रचंड साठा करत आहे. यामध्ये सर्वात अग्रगण्य चीन आहे. तसेच भारताने देखील सोन्यात गुंतवणूक करण्यास सुरुवात केली आहे. मात्र तज्ज्ञांच्या मते, सोन्याच्या वाढत्या साठ्यांमुळेच सोन्याच्या दरात इतकी वाढ झाली आहे.
गेल्या दोन वर्षात म्हणजेच २०२३-२४ पर्यंत ७० हजारा रुपयांच्या आत होता. आता मात्र सोने लाखाता दरात पोहोचले आहे. याची कधी कल्पानाही लोकांनी केली नसेल. तज्ज्ञांच्या मते, वाढत्या सोन्याच्या दरामागे त्याची खरेदी नसून मोठ्या देशांद्वारे केला जाणारा सोन्याचा साठा आहे. गेल्या २ ते ३ वर्षात जगभरातील अनेक देशांच्या रिझर्व्ह बँकांनी सोने खरेदी करुन त्यांची साठवणूक सुरुवात केली आहे. चीन तर सतत सोने खरेदी आहे. पण नेमकं कारण काय आहे हे आपण जाणून घेणार आहोत.
चीनकडून मिसाईल आणि ड्रोन घेणार इराण, बदल्यात देणार तेल…रिपोर्टमध्ये खुलासा
मिळालेल्या माहितीनुसार, चीनने सोन्यामध्ये प्रचंड गुंतवणूक केली आहे. चीनच्या सेंट्रल बँक म्हणजे पीपल्स बँकफ चायनाने २०२५ पासून मोठ्या प्रमाणात सोने खरेदी सुरु ठेवली आहे. जानेवारी २०२५ ते सप्टेंबर २०२५ पर्यंत चीनने ३९.२ टन सोने खरेदी केले आहे. तर १ ऑक्टोबर ते ०८ ऑक्टोबर पर्यंत जवळपास २,२९८.५ टने सोने साठवले आहे. गेल्या ०९ महिन्यांमध्ये चीनने सोने खरेदीमध्ये एकदाही खडा पडू दिलेला नाही. दर महिन्याला चीन २ ते ५ टन सोने खरेदी करत आहे.
आर्थिक तज्ज्ञांच्या मते, चीनच्या एवढे सोने खरेदी करण्यामागचे सर्वात मोठे कारण म्हणजे अमेरिका आहे. चीनला अमेरिकन डॉलरवरील अवलंबित्व कमी करायची आहे. डॉलरचा प्रभाव कमी करायाचा आहे. तसे पाहता जगभरातील देशांमध्ये चीनकडे डॉलरचा सर्वाधिक साठा आहे, मात्र चीन आणि अमेरिका कट्टर शत्रू असल्याने दोघेही एकमेकांच्या प्रभाव कमी करण्याचा प्रयत्न करत आहे. डॉलर केवळ अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर अवलंबून आहे. पण सोने कोणत्या देशाच्या अर्थव्यवस्थेवर अवलबूंन नाही. यामुळे अनेक लोक सोन्यात गुंतवणूक करणे सर्वात जास्त सुरक्षित मानतात.
यामागचे दुसरे कारण म्हणजे सध्या जगभरातील अनेक देशांमध्ये विविध क्षेत्रात तणावाचे वातावरण आहे. रशिया-युक्रेन युद्ध (Russia Ukraine War) गाझातील इस्रायल हमास युद्ध (Israel Hamas War) भारत पाकिस्तानमधील तणावपूर्ण वातावरण (India Pakistan War) यामुळे. चीन सध्या त्यांचाय पैसा असा देशांमध्ये गुंतवत आहेत.
तिसरे सर्वात मोठे कारण म्हणजे वाढती महागाई आहे. यंदा सोन्याची किंमत ३,९०० डॉलर प्रति अंशापर्यंत पोहोचली आहे. तसेच वस्तूंच, सेवांचे दर मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अशा परिस्थिती पैशा पेक्षा अधिक सोन्याची किंमत जास्त मानली जाते, ज्यामुळे पैशांची ताकदही वाचवता येते. यामुळे चीन सोन्याला चलनाची ताकद बनवत आहे.
सोन्याच्या खरेदीमध्ये भारत, रशिया आणि तुर्कीचाही समावेश आहे. गेल्या काही काळात या देशाच्या सेंट्र बँकांनी देखील सोन्याचा साठा वाढवण्यास सुरुवात केली आहे. २०२२ पासून जगभरातील सेंट्रल बँकांनी १,००० टनाहून अधिक सोने खरेदी केले आहे. यामागे देखील डॉलर पासून अंतर राखणे, जागतिक तणाव, महागाई हीच कारणे आहेत.
भारताने देखील सोन्याचा प्रचंड साठा केला आहे. आजपर्यंत भारताने जवळपास ८८० टन सोने साठवले आहे. यामध्ये ५१२ टन सोने महाराष्ट्रातील नागपूर आणि मुंबईच्या आरबीआयच्या तिजोरीत आहे. तसेच विदेश बँकांमध्येही सोन्याचा साठा आहे. विदेशी चलनसाठ्यात भारताने ११. ७ टक्के सोन्याचा वाटा आहे.
अंगात नाही बळ न चिमटा काढून पळ; पाकिस्तानची औरंगजेबाचा दाखला देत भारताच्या अखंडतेवर टीका