China is building a trap in PoK say intel reports
Pahalgam Terror Attack News : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने कठोर भूमिका घेतली असून पाकिस्तानविरोधात निर्णायक पावले उचलण्याच्या तयारीत असल्याचे संकेत मिळाले आहेत. या पार्श्वभूमीवर पाकव्याप्त काश्मीर (पीओके) पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. अनेक संरक्षण तज्ज्ञांच्या मते, पीओके मुक्त करण्यासाठी युद्ध हा एकमेव पर्याय उरतो, मात्र हे युद्ध अत्यंत गुंतागुंतीचे आणि अवघड असेल.
पीओके क्षेत्राची भौगोलिक रचना अत्यंत गुंतागुंतीची आहे. उंच पर्वत, खोल दऱ्या, हिमनद्या आणि अरुंद खिंडींनी परिपूर्ण असलेल्या या भागात लढाई करणे हे भारतीय लष्करासाठी एक मोठे आव्हान ठरेल. नीलम व्हॅली, लिपा व्हॅली आणि झेलम कॉरिडॉर यांसारख्या दुर्गम भागांत प्रवेश करणे आणि तेथे सैन्य कारवाया करणे सहज शक्य नाही.
चीनने पीओकेमध्ये पाय रोवले असून तेथील रणनीती ‘मृत्यूचा सापळा’ निर्माण करणारी आहे, असा दावा अनेक गुप्तचर अहवाल करत आहेत. चीन-पाकिस्तान आर्थिक कॉरिडॉर (CPEC) प्रकल्पाचा मोठा भाग गिलगिट-बाल्टिस्तान प्रदेशातून जातो. त्यामुळे चीनने तेथे बंकर, बॅरॅक्स, रस्ते आणि इतर संरक्षणात्मक पायाभूत सुविधा उभारल्या आहेत.
याशिवाय, चायनीज पीएलए-संलग्न बांधकाम कंपन्या (जसे की CCECC, चायना गेझौबा) येथे बळकट काम करत आहेत, जे हल्ल्याच्या वेळी भारतीय फौजांसमोर अडचणी उभ्या करू शकतात. चीन पीओकेमध्ये पाकिस्तानला गुप्तचर माहिती, ड्रोन, उपग्रह डेटा आणि दारुगोळा पुरवण्याची शक्यता असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Pahalgam Terror Attack: भारताकडून हवाई क्षेत्र बंद तर पाकिस्तानकडून जॅमर आणि चिनी ‘ड्रॅगन’ क्षेपणास्त्रांची तैनाती
निवृत्त कर्नल दिनेश नैन यांच्या मते, “शिमला करार मोडून पाकिस्तानने भारतासाठी कारवाईची वाट मोकळी केली आहे.” ते म्हणतात, “भारतीय सैन्य पीओकेमध्ये आधीच मर्यादित स्वरूपात कारवाया करत आहे आणि त्यांच्या गुप्तचर यंत्रणेकडे त्या भागाची पुरेशी माहिती आहे.” मात्र, यावेळी जर भारत कारवाई करतो, तर ती पूर्ण पीओके ताब्यात घेण्याऐवजी केवळ दहशतवादी तळांवर मर्यादित असावी, जेणेकरून व्यापक युद्ध टाळता येईल, असेही अनेक सुरक्षा विश्लेषकांचे मत आहे.
These tunnels could be far more advanced than anything we’ve seen historically. The Chinese engineering corps has shown subsurface drilling technologies that can penetrate even the hardest Himalayan granite. Our defensive preparations on conventional above-ground incursions while… pic.twitter.com/fzSdFEOOMd
— Jitendar Singh (@jitendarsinghk) March 3, 2025
credit : social media
संरक्षण विश्लेषक पी.के. सहगल यांच्यानुसार, भारताने लष्करी, मुत्सद्देगिरी, आर्थिक आणि गुप्तचर पातळीवर एकत्रित आघात करावा लागेल. यासाठी पॅरा एसएफ, घटक प्लाटून, MARCOS स्क्वॉड्स यांसारखी विशेष सैन्यदले तैनात केली जातील. हवाई दलाकडून मिराज-2000, SU-30MKI आणि राफेल यांसारख्या अत्याधुनिक लढाऊ विमानांद्वारे वेगवान आणि अचूक हल्ल्यांची आवश्यकता भासेल. या व्यतिरिक्त, सायबर वॉरफेअर आणि माहिती युद्धाचाही वापर अनिवार्य ठरेल, कारण चीन आणि पाकिस्तान एकत्रितपणे आंतरराष्ट्रीय समुदायात ‘काश्मीरवर हल्ला’ असल्याचा प्रचार करण्याचा प्रयत्न करू शकतात.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : ‘आम्ही पाकिस्तानसोबत आहोत…’ ज्यांच्यावर पाकिस्तानचा जास्त विश्वास, त्यांनीच उघड केलं गुपित
पीओके मुक्त करण्याची कल्पना भारतासाठी भावनिक आणि सामरिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची असली, तरी ती अतिशय गुंतागुंतीची आणि धोकादायक आहे. भारतासाठी हा लढा केवळ पाकिस्तानविरुद्ध नसेल, तर चीनच्या अप्रत्यक्ष हस्तक्षेपाचाही सामना करावा लागेल. युद्ध झाल्यास, त्याचे परिणाम संपूर्ण दक्षिण आशिया आणि आंतरराष्ट्रीय संबंधांवर होणार आहेत. त्यामुळे फार विचारपूर्वक आणि बहुआयामी रणनीतीच्या आधारेच निर्णय घेणे गरजेचे आहे. पीओकेवर कब्जा शक्य आहे, पण त्यासाठी शौर्य, संयम आणि भूराजकीय बुद्धिमत्ता यांचा अभूतपूर्व समन्वय आवश्यक आहे.