भारत-पाक तणाव शिगेला; पाकिस्तानकडून जॅमर आणि चिनी ‘ड्रॅगन’ क्षेपणास्त्रांची तैनाती, भारताकडून हवाई क्षेत्र बंद ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
Pakistan Installed Jammers : पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव अधिकच गडद झाला आहे. दोन्ही देशांनी एकमेकांच्या हवाई क्षेत्रासाठी बंदी घालण्याचा निर्णय घेतला असून, आता पाकिस्तानकडून आणखी आक्रमक हालचाली करण्यात येत आहेत. भारताकडून हवाई हल्ल्याची शक्यता गृहित धरून, पाकिस्तानने आपल्या हवाई क्षेत्रात जॅमर तंत्रज्ञान बसवले असून, चिनी बनावटीची ‘ड्रॅगन’ हवाई संरक्षण क्षेपणास्त्र प्रणालीही तैनात केली आहे.
सुरुवातीला पाकिस्तानने भारतीय विमानांसाठी आपले हवाई क्षेत्र बंद केले होते. या प्रत्युत्तरात भारतानेही पाकिस्तानच्या मालकीच्या व संचालनाखालील सर्व विमानांसाठी ३० एप्रिल ते २३ मे २०२५ पर्यंत आपले हवाई क्षेत्र बंद करण्याची अधिकृत घोषणा केली. या निर्णयासंदर्भात NOTAM (Notice to Airmen) जारी करण्यात आले असून, या कालावधीत पाकिस्तानी विमानांना भारतीय हवाई हद्दीत प्रवेशबंदी करण्यात आली आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : पाकिस्तानात नेमकं चाललंय काय? कराचीत मोठा स्फोट अन् उरलेले पाणीही गेले नाल्यांमध्ये वाहून
पाकिस्तानच्या लष्करी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय लढाऊ विमानांचा संभाव्य प्रवेश रोखण्यासाठी नियंत्रण रेषेजवळ (LOC) जॅमर यंत्रणा बसवण्यात आल्या आहेत. या जॅमर्सद्वारे भारतीय विमाने आणि ड्रोनचे नेव्हिगेशन, कम्युनिकेशन व रडार सिग्नल्स अडवण्याचा प्रयत्न होणार आहे. याशिवाय, पाकिस्तानने चिनी बनावटीची अत्याधुनिक विमानविरोधी क्षेपणास्त्र प्रणाली ‘FD-2000B’ (ड्रॅगन सिस्टीम) LOC जवळील संवेदनशील भागांमध्ये तैनात केली आहे. ही प्रणाली हाय-अल्टिट्यूडवरून येणाऱ्या लढाऊ विमानांवर अचूक हल्ला करण्यास सक्षम असल्याचे मानले जाते.
Pakistan deploys fighter planes near the Indian Territory big war move amid fears of all out war just 5 minute distance Pak Air Force on new deployment mobilizes fleet as India gears up for response JF 17 thunder and F16 aircraft deployed different aircrafts,at Skardu airport pic.twitter.com/Y58ABHVx3E
— Steve Adams (@SteveAd13487346) April 30, 2025
credit : social media
दरम्यान, पाकिस्तानी सैन्याने सातव्या दिवशी सलग शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. जम्मू-कश्मीरमधील कुपवाडा, उरी आणि अखनूर भागांत रात्रीच्या सुमारास गोळीबार झाला. लष्कराच्या माहितीनुसार, या गोळीबारामध्ये कोणतीही पूर्वचेतावणी देण्यात आलेली नव्हती. भारतीय लष्कराने तत्काळ प्रत्युत्तर दिले असून, सीमा भागांत तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या शुक्रवारी सुरु झालेल्या या गोळीबारांच्या मालिकेमुळे सीमावर्ती गावांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
या सर्व घडामोडींचा उगम पहलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यात आहे, ज्यात अनेक भारतीय जवान शहीद झाले. या घटनेनंतर भारत सरकारने पाकिस्तानला कठोर इशारा देत कारवाईचे संकेत दिले होते. यानंतरच दोन्ही देशांमध्ये हवाई क्षेत्र बंदी आणि सीमारेषेवर तणाव वाढवणाऱ्या हालचाली सुरू झाल्या.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : कोरडा पडलाय पाकिस्तान; भारताच्या जलनीतीचा कसा पडला प्रभाव? पाहा Satellite Image
भारत आणि पाकिस्तानमधील सध्या सुरु असलेल्या घडामोडी उपद्रवी तणावातून सरळ सैनिकी संघर्षाकडे वळत आहेत का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. भारताने आपले हवाई क्षेत्र पाकिस्तानी विमानांसाठी बंद करणे, आणि पाकिस्तानकडून जॅमर व क्षेपणास्त्रांची तैनाती ही परिस्थिती आणखी गंभीर करत आहे. अशा वेळी दोन्ही देशांनी संयमाने आणि मुत्सद्देगिरीने मार्ग काढणे गरजेचे आहे, अन्यथा छोट्या चिंगाऱ्यापासून मोठ्या आगीचा भडका उडण्यास वेळ लागणार नाही.