हिंद महासागरात चीनची मोठी खेळी! ड्रॅगनच्या अंडरवॉटर ड्रोन टेस्टिंगमुळे भारताची चिंता वाढली (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
एशिया टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, चीनचे हे ड्रोन नौदलात अत्यंत गुप्तपणे सामील करण्यात आले आहे. या ड्रोनचे अत्याधुनिकरण देखील अत्यंत गुप्तपणे सुरु आहे. या ड्रोनमध्ये मोठी बॅटरी बॅंक आणि डिफेन्स जनरेटर बसवण्यात आला आहे,ज्यामुळे हे ड्रोन जास्त काळा पाण्याखाली राहू शकेल. संरक्षण तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, हे ड्रोन अँटी-समबरीन डिफेन्सपासून बचावासाठी तयार करण्यात आला आहे.
तज्ज्ञांच्या मते, चीन सध्या मोठ्या युद्धाची तयारी करत आहे. या ड्रोनच्या टेस्टिंगमुळे पॅसिफिक महासागरात भीषण युद्धाची भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. याचा सर्वात मोठा धोका हा समुद्राखाली असलेल्या इंटरनेट केबल्स आणि सेन्सर्स नेटवर्क आहे. यामुळे आधुनिक अर्थव्यवस्था, बॅंकिंग, आपत्कालीन आणि दळणवळण सेवांना धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. कारण यासर्व सेवा या इंटरनेट केबल्सवर अवलंबून आहेत. चीनचे हे ड्रोन तब्बल ४००० मीटर खोलवरील स्टील-आर्मर्ड केबल्सलाही क्षणात कापू शकते असे तज्ज्ञांचे मत आहे.
याच वेळी तज्ज्ञांनी असाही इशारा दिला आहे की, चीन ही तयारी तैवानच्या इंटरनेट सिस्टीममध्ये घुसण्यासाठी करत आहे. तैवान अवघ्या २४ अंडरसी नेटवर्क सिस्टीमवर अवलंबून आहे. यामुळे समुद्राखालील इंटरेनट केबल्सला कोणताही धोका झाल्यास तैवानच्या संपूर्ण आर्थिक आणि प्रशासकीय कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता आहे. चीन या ड्रोनच्या मदतीने तैवानला ब्लॉक करण्याची शक्यता आहे. सध्या यामुळे प्रशांत महासागरात धोक्याचे वातावरण आहे.
दरम्यान चीनच्या या ड्रोन टेस्टिंगचा परिणाम हा हिंद महासागरातही होण्याची शक्यता आहे. कारण याच वेळी चीन हिंद महासागरातही अंडरवॉड वाहने तैनात करत आहे. मलक्का स्ट्रेटसारख्या रणनीतिक भागांमध्ये चीनन अडंरवाटॉर शस्त्रे तैनात करत आहे. हे भारत आणि अमेरिकेच्या संरक्षणाला धक्का पोहोचवणारे मानले जाक आहे. गेल्या काही काळात चीनची लष्करी ताकद मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर खळबळ सुरु आहे. चीनच्या या ड्रोन टेस्टिंगमुळे हिंद आणि पॅसिफिक महासागरात चीनची उपस्थिती अधिक मजबूक होत आहे. यामुळे भारत आणि अमेरिकेसाठी ही बाब अत्यंत चिंताजनक बनली आहे.
IPO Market 2025: आयपीओ फंडरेझिंगमध्ये हाँगकाँग दुसऱ्या क्रमांकावर, भारताची देखील विक्रमी कामगिरी
Ans: चीन पाणबुडीच्या आकाराचे, मानवरहित अंडरवॉटर ड्रोन विकसित करत आहे. हे ड्रोन डिझेल-इलेक्ट्रिक प्रणालीवर आधारित असून जास्त काळा पाण्याखाली राहण्याची क्षमतेने विकसित आहे.
Ans: चिनी अंडरवॉटर ड्रोनचा सर्वात मोठा धोका हा समुद्राखाली असलेल्या इंटरनेट केबल्स आणि सेन्सर्स नेटवर्क आहे. यामुळे आधुनिक अर्थव्यवस्था, बॅंकिंग, आपत्कालीन आणि दळणवळण सेवांना धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.
Ans: चीनने हिंद महासागरात हे अंडरवॉटर ड्रोन तैनात केल्यास भारताच्या सुरक्षेसाठी मोठे आव्हान निर्माण होणार आहे,






