
China's attempt to Meddling in Myanmar
बिजिंग: भारताच्या शेजारी देशांमध्ये चीनचा हस्तक्षेप काही नवीन नाही. पाकिस्तान आणि बांगालेशमध्ये चीनने आपला ताबा जमवला आहे. तसेच नेपाळच्या राजकारणातही नाक खुपसण्याचे काम सुरु आहे. आता आणखी एका देशाला आपल्या तालावर नाचवायला ड्रॅगनने नवी खेळी खेळली आहे. चीनने भारताच्या ईशान्येकडी असलेला देश म्यानमारमध्ये हस्पक्षेप करण्याचा प्रयत्न केला आहे. म्यानमारमध्ये गेल्या चार वर्षापासून जुंता सैन्य आणि बंडखोर गटांमध्ये रक्तरंजित गृहयुद्ध सुरु आहे.
काही आठवड्यांपूर्वी म्यानमारच्या लाशियो शहरात बंडखोर गटांनी मोठी लष्करी कारवाई सुरु केली आणि जंता सैन्याचा पराभव केला आहे. हा गृहयुद्धातील आतापर्यंत मोठा विजय मानला जात आहे. पण यानंतर बंडखोर गटांनी म्यानमार सोडले आहे. चीनच्या आदेशानंतर बंडखोर गटांनी लाशियो शहर सोडले असल्याचे म्हटले जात आहे. कारण म्यानमारमधील लाशियो शहरात चीनने मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बंडखोर गटांच्या नेत्यांनी म्हटले की, चीनने सीमा व्यापर पूर्णपणे थांबवला आहे. तसेच इंटरनेट सेवाही बंद केली आहे. एवढेच नव्हे तर चीनच्या सीमेत प्रवेश केल्यानंतर बंडखोर गटाच्या कमांडरला ताब्यात घेतले आहे. चीनने गुंतवणूक क्षेत्रात संघर्ष थांबवण्यासाठी या कारवाया केल्या आहेत.
चीनसाठी लॅशिओ इतका महत्त्वाचा का?
लॅशिओ हे शहर म्यानमारच्या उत्तर शान राज्यातील एक शहर आहे. हे शहर चीनच्या सीमेपासून ७५ किलोमीटर अंतरावर आहे. या क्षेत्रातून बंगलच्या उपसागरात तेल आणि वायू पाईपलाईनद्वारे चीनलाथेट उर्जा मिळवता येते. या ठिकाणी चीनचा अब्जावधी डॉलर्सचे बेल्ट ॲंड रोड इनिशिएटिव्ह (BRI)प्रकल्प देखील सुरु आहे. या शहरात चीनचा मोठा बिझनेस कॉरिडर आहे. यामध्ये चीनला कोणताही धोका नको आहे. यामुळे चीनने बंडखोर गटांन लाशियो शहरातून बाहेर पडण्याचे आदेश दिले आहेत.
एकीकडे चीन सार्वजनिक व्यासपीठांवर कोणत्याही देशात हस्तक्षेप न करण्याबद्दल बोलतो आणि दुसरीकडे चीन म्यानमार सैन्य आणि बंडखोर गटांना शस्त्रे पुरवतो. तसेच लाशिओतील कोकांग या बंडखोर गटाला देखील चीनने पाठिंबा दिला आहे. या गटाचे सैन्य चीन वंशाच्या हान समुदायाचे आहे. या समुदायाला मंदारिन म्हणून ओळखले जाते. चीन बऱ्याच काळापासून या प्रदेशातील गटांना शस्त्रे पुरवत असल्याची माहिती आहे.
भारतासाठी धोक्याची घंटा दरम्यान चीनचा म्यानमारमध्ये हस्तक्षेप हा भारतासाठी धोक्याची बाब मानला जात आहे. या प्रदेशातील चीनच्या हस्तक्षेपामुळे सुरक्षा आणि धोरणात्मक संतुलन धोक्यात येत आहे. नेपाळ, श्रीलंका, मालदीव, बांदलादेश आणि पाकिस्तान आणि आता म्यानमार या देशांमध्ये चीनची घुसखोरी भारतासाठी मोठे आव्हान ठरत आहे.