Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

चीनने आता नेपाळच्या राजकारणात खुपसले डोके; ‘या’ खतरनाक सल्ल्यामुळे भारताची डोकेदुखी वाढणार?

बांगलादेश आणि पाकिस्ताननंतर आता नेपाळमध्येही चीनने राजकीय हलचाली सुरु केल्या आहेत. सध्या नेपाळच्या माजी राष्ट्रपती बिजिंग दौऱ्यावर गेल्या आहेत. त्यांनी रविवारी (१ जून) चीनला भेट दिली. 

  • By स्वराली शहा
Updated On: Jun 02, 2025 | 03:30 PM
China poking its head in Nepal's politics, will affect India

China poking its head in Nepal's politics, will affect India

Follow Us
Close
Follow Us:

बिजिंग: बांगलादेश आणि पाकिस्ताननंतर आता नेपाळमध्येही चीनने राजकीय हलचाली सुरु केल्या आहेत. सध्या नेपाळच्या माजी राष्ट्रपती बिजिंग दौऱ्यावर गेल्या आहेत. त्यांनी रविवारी (१ जून) चीनला भेट दिली.  यावेळी चीनने त्यांच्याकडे एक महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपवली आहे.   यावेळी चीनने विद्या देवी भंडारी यांना नेपाळमधील सर्व कम्युनिस्ट पक्षांना एकत्र आणण्याची जबाबदारी दिली आहे. चीनच्या म्हणण्यानुसार, नेपाळमधील सर्व कम्युनिस्ट पक्ष एकत्र आले तरच नेपाळचा विकास होईल.

विद्या देवींच्या चीनच्या दौऱ्यामागील हेतू नेमका काय?

राष्ट्रपतीपद सोडल्यानंतर दोन वर्षांनी विद्या देवी भंडारी पुन्हा एकदा राजकारणात येत आहेत. विद्या देवी भंडारी नेपाळचे पंतप्रधान के.पी शर्मा ओली यांच्या पक्षाच्या आहे. 2027 मध्ये नेपाळमध्ये सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. यामध्ये नवीन सरकार स्थापन होणार आहे. भंडारी यांना पुढील पंतप्रधान होण्याची इच्छा आहे. याच अनुषंगाने भंडारी यांनी बिजिंगला भेट दिली असल्याचे म्हटले जात आहे. नेपाळ हा भारतासह चीनचाही शेजारी देश आहे. नेपाळणध्ये कम्युनिस्टॉ विचारसरमीचा प्रभाव जास्त आहे. यामुळे येथील अंतर्गत राजकारणामध्ये चीनला अधिक पसंती मिळत आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- इराणची इस्रायलविरोधी कारवाई; गुप्तचर संस्था ‘मोसाद’च्या एजंटला मृत्यूदंडाची शिक्षा

नेपाळमधील कम्युनिस्ट पक्ष

नेपाळमध्ये सध्या तीन प्रमुख कम्युनिस्ट पक्ष आहे. के. पी. ओली शर्मा यांचा सीपीएन(यूएमएल) पक्ष, दुसरा पुष्पकमल दहल प्रचंड यांचे माओवादी केंद्र आणि माधव कुमार नेपाळ यांचे सीपीएनम युनिफाइड पक्ष आहेत.

माधव कुमार आणि प्रचंड यांनी नेपाळच्या पंतप्रधान पदाची भूमिका बजावली आहे. दोन्ही नेत्यांना राजकारणातचील दिग्गज नेते म्हणून ओळखले जाते.

नेपाळमध्ये कम्युनिस्ट एक्य का?

सध्या नेपाळमधील सीपीएन(यूएमएल) आणि कॉंग्रस पक्षाचे सरकार आहे.
कॉंग्रेसचा कल भारताकडे आहे. यामुळे नेपाळमध्ये चीनचे काही हेतू पूर्ण होण्यास अडथळ येत आहे. केपी शर्मा ओली यांच्या राजवटीत चीनचा बीआरआय प्रकल्प देखील मंदावला आहे.

तसेच नेपाळमध्ये सध्या राजेशाही समर्थनार्थ तीव्र आंदोलन सुरु आहे. यामुळे कम्युनिस्ट पक्षामध्ये गोंधळ निर्माण झाला आहे. राजेशाही चळवळीमुळे भविष्यात नेपाळमध्ये उजव्या विचारसरणीच्या पक्षाचे वर्चस्व वाढण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत नेपाळमध्ये चीनला आपला हेतू साध्य करणे कठी होऊ शकते.

पण नेपाळमध्ये तीन कम्युनिस्टपक्ष एकत्र आले तर याठिकाणी कोणताही दुसरा पक्ष सत्तेत येणार नाही. यामुळे चीन सहजपण नेपाळमधील सरकार चालवण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु यामुळे भारतविरोधी खेळी देखील रचली जाण्याची शक्यता आहे. आता भारत याकडे कोणत्या दृष्टीकोनातून पाहतो हे पाहणे महत्त्वाचे ठरमार आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- इस्रायलला समर्थन देणे पडले महागात; अमेरिकेच्या कोलोराडोत निदर्शकांवर प्रणाघातक हल्ला

Web Title: China poking its head in nepals politics will affect india

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 02, 2025 | 03:30 PM

Topics:  

  • China
  • nepal
  • World news

संबंधित बातम्या

२ लाख घ्या अन् अमेरिका सोडा…; कोणाला दिली ट्रम्प प्रशासनाने ही ऑफर? काय आहे प्रकरण? 
1

२ लाख घ्या अन् अमेरिका सोडा…; कोणाला दिली ट्रम्प प्रशासनाने ही ऑफर? काय आहे प्रकरण? 

Syria News : सीरियाच्या माजी राष्ट्राध्यक्षांची हत्या करण्याचा प्रयत्न; रशियामध्ये विषप्रयोग झाल्याची चर्चा
2

Syria News : सीरियाच्या माजी राष्ट्राध्यक्षांची हत्या करण्याचा प्रयत्न; रशियामध्ये विषप्रयोग झाल्याची चर्चा

ब्रिटनचे पंतप्रधान भारत दौऱ्यावर येणार; दोन्ही देशांच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान संबंधांना मिळणार नवी दिशा
3

ब्रिटनचे पंतप्रधान भारत दौऱ्यावर येणार; दोन्ही देशांच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान संबंधांना मिळणार नवी दिशा

नेपाळमध्ये मुसळधार पावसाचा इशारा जारी; भूस्खलनाच्या भीतीने काठमांडूत वाहतूकीवर बंदी
4

नेपाळमध्ये मुसळधार पावसाचा इशारा जारी; भूस्खलनाच्या भीतीने काठमांडूत वाहतूकीवर बंदी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.