इस्रायलला समर्थन देणे पडले महागात; अमेरिकेच्या कोलोराडोत निदर्शनावर प्रणाघातक हल्ला (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
वॉशिंग्टन: अमेरिकेतून आणखी एक इस्रायलविरोधी घटना समोर आली आहे. अमेरिकेच्या कोलोराडोमध्ये इस्रायली ओलिसांच्या सुटकेची मागणी करणाऱ्या रन फॉर देअर लाईव्हजच्या निदर्शनावर हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात सहाजण जखणी झाल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांमनी एका संशयिताला अटक केली आहे. एफबीआयने या घटनेचे दहशतदवादी हल्ला म्हणून वर्णन केले आहे. या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. यापूर्वी देखील इस्रायली दूतावासाच्या दोन कर्मचाऱ्यांवर हल्ला करण्यात आला होता.
एफबीआयने दिलेल्या माहितीनुसार, संशयिताचे नाव मोहम्मद साबरी सोलिमान आहे. ( ४५ वर्षीय) साबरीने फ्री पॅलेस्टाईनची घोषणा देत इस्रायली समर्थकांवर हल्ला केला. हल्ल्यानंकर पोलिसांच्या कारवाईदरम्यान साबरी देखील जखमी झाला. त्याला रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. परंतु त्याच्या प्रकृतीबद्दल अद्याप पोलिस अधिकाऱ्यांनी कोणतीही माहिती दिलेली नाही.
इस्रायली समर्थकांवर हल्ला करणाऱ्या मोहम्मद सबरी सोलीमानला अटक करण्यात आला आहे. हल्लाचा फुटेज आणि व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायर होत आहे. मोहम्मद सबरी हल्ल्याच्या वेळी झायोनिस्टांचा खात्मा करा, ते दहशतवादी आहेत आणि पॅलेस्टाईनला मुक्त करा अशा घोषणा देत होता.
Mohamad Soliman was arrested today for throwing Molotov cocktails. Boulder Colorado is liberal infestation, so no one is surprised. pic.twitter.com/WhcBkNUmeW
— Jere_Memez (@Jere_Memez) June 1, 2025
अमेरिकेत सध्या गाझातील इस्रायलच्या कारवायांनुळे इस्रायली समर्थकांवर हल्ले होत आहे. यामुळे यहूदी-नविरोधी आणि इस्लामोफोबिक हिंसाचाराच्या घटमनांमध्ये वाढ होत आहे. अमेरिका इस्रायसलचा जवळचा मित्र आहे. इस्रायलच्या गाझातील कारवायांमुळे ५४ हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये बहुतेक महिला आणि मुलांचा समावेश आहे. तसेच गाझातील लोकांना मानतावादी मदत पुरवण्यात देखील इस्रायलच्या कारवायांमुळे अडचणी निर्माण होत आहे. यामुळे गाझातील लोकांना उपासमारीचे जीवन जगावे लागत आहे. २३ लाख लोक दुष्काळाच्या उंबरठ्यावर आहेत.
गाझामध्ये युद्धबंदीचे कोणतेही चिन्ह दिसत नाही. इस्रायलकडून सतत लष्करी कारवाया आणि हल्ले सुरु आहे. यामुळे जगभरात इस्रायलविरोधी वातदावरण तापलेले आहे. परंतु यामुळे अमेरिकेत यहूदी-विरोधी भावना निर्माण होत आहे. अमेरिकेत इस्रायली समर्थांवर हल्ले होत आहे. गेल्या महिन्यात वॉशिंग्टन डीसीतील दूतावासातील दोन कर्मचाऱ्यांची हत्या करण्यात आली होती. यावेळीही हल्लेखोर फ्री पॅलेस्टाईन च्या घोषणा देत होता.
सध्या कोलोराडोतील इस्रायली समर्थकांवरील हल्ल्यामुळे अमेरिका-इस्रायलमध्ये वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. गेल्या हल्ल्यानंतरही इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंनी इस्रायलींवर झालेल्या हल्ल्यामुळे संताप व्यक्त केला होता.