चीन तैवानवर हल्ला करण्याच्या तयारीत
नवी दिल्ली: एकीकडे इस्त्रायल-हिजबुल्लाह, इराण-इस्त्रायल यांच्यात युद्ध सुरू आहे. यामुळे जगातील इतर अनेक देशांची तिसरे महायुद्ध होण्याची भिती वाढली आहे. दरम्यान आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. आता चीन आणि तैवानमध्ये पुन्हा युद्ध सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तैवानच्या एका अधिकाऱ्याने चीनवर आपल्यावर हल्ला करण्याची तयारी सुरू केल्याचा गंभीर आरोप केला आहे.
चीनच्या विमानवाहू जहाजांचा तैवानच्या दक्षिणेकडे कूच
तैवानच्या संरक्षण मंत्रालयाने रविवारी याबाबत एक निवेदन जारी केले आहे. या निवेदनात सांगण्यात आले आहे की, चीनच्या विमानवाहू जहाजांचा एक गट त्यांच्या प्रदेशाच्या दक्षिणेकडच्या भागाकडे कूच करत आहे. याशिवाय चीनच्या लष्कराने एक व्हिडिओदेखील जारी केला आहे. या व्हिडिओत “युद्धासाठी सज्ज” असल्याचे संकेत दिले आहेत. चीनच्या या हालचालींमुळे तैवानमध्ये चिंता वाढली असून, परिस्थिती तणावपूर्ण बनली आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, चीनने तैवानला त्यांचा भाग असल्याचे म्हटले आहे. मात्र तैवानच्या म्हणण्यानुसार ते लोकशाही पद्धतीने शासित असून एक स्वतंत्र देश म्हटले आहे. चीनच्या या भूमिकेमुळे देन्ही देशांमध्ये सतत संघार्षाचे वातावरण असते. तैवानचे अध्यक्ष लाइ चिंग-ते यांच्या म्हणणण्यानुसार, त्यांनी चीनच्या दाव्यांना विरोध केला आणि पीपल्स रिपब्लिक ऑफ चायनाला तैवानचे प्रतिनिधित्व करण्याचा कोणताही अधिकार नाही, असे स्पष्ट केले आहे. त्यांच्या या विधानानंतर चीन आणखी संतप्त झाला आहे.
तैवान चीनच्या हालचालींवर लक्ष ठेवून
तैवानच्या संरक्षण अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, लिओनिंग या चीनी विमानवाहू जहाजाच्या नेतृत्वाखालील नौदल गटाने तैवान आणि फिलिपाइन्सला वेगळे करणाऱ्या बाशी वाहिनीजवळ हालचाली केल्या आहेत. हा नौदल गट पॅसिफिक महासागराच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे तैवानच्या संरक्षण अधिकाऱ्याने म्हटले आहे. मात्र तैवान चीनच्या या हालचालींवर बारीक लक्ष ठेवून आवश्यक त्या सुरक्षा उपाययोजना लागू करत आहेत.
तसेच चीनने नुकत्याच जारी केलेल्या प्रचारात्मक व्हिडिओमध्ये त्यांच्या लष्करी तयारीचे प्रदर्शन केले आहे. ज्यामध्ये लढाऊ विमाने, युद्धनौका, मोबाइल क्षेपणास्त्र प्रक्षेपक आणि जमिनीवरून हवेत मारा करणारी वाहने दिसत आहेत. यामुळे तैवानमध्ये अधिक भीतीचे वातावरण बनले आहे. चीनने पूर्वीही तैवानवर बळाचा वापर करण्याची धमकी दिली होती. यामुळे सध्याच्या घडामोडींमुळे या शक्यतेला अधिक जोर आला आहे.
हे देखील वाचा- इस्रायलचा दक्षिण लेबनॉनमधे कब्जा करण्याचा प्रयत्न; IDF ने गाझावरही केला हल्ला