
China sends astronauts and 4 mice on space station for Shenzhou-21 mission
China Space new Marathi : बीजिंग : चीन (China) हा त्यांच्या चित्र-विचित्र खाद्यपदार्थांसाठी, चित्र-विचित्र जेवणासाठी ओळखला जातो. काही काही वर्षांपासून चीन मानवी रोबोट्सव विविध संशोधन करत आहे. आता चीनने आणखी एक आगळे-वेगळे पाऊल उचलेले आहे. चीन लवकरच अंतराळ झेप घेणार आहे. पण हैरानजनक बाब म्हणजे चीन अंतराळात उंदीर पाठवणार आहे. होय तुम्ही बरोबर वाचलात. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की चीन नक्की काय संशोधन करत आहे. तर आपण याबद्दल आता जाणून घेऊयात.
चीनच्या माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, चीन अंतराळात येत्या आठवड्यात जिउक्वान प्रक्षेपण केंद्रांतून Shenzhou-21 अंतराळ यान उड्डाण घेणार आहे. विशेष म्हणजे चीन या मोहीमेत अंतराळात चार उंदिर पाठवणार आहे. या मागाचे कारण म्हणजे अंतराळात जैवविज्ञानाचा शोध घेतला जाणार आहे. तज्ज्ञांच्या मते, ही बाब केवळ चीनसाठीच नव्हे तर संपूर्ण जगासाठी अतंत्य महत्त्वाची आहे.
या मोहिमेचे नेतृत्त्व चीनचे सर्वात अनुभवी अंतराळवीर झांग लू यांच्याकडे आहे. तसेच त्यांच्यासोबत वू फेई आणि झांग होंगझांग हे नवीन अतंराळवीर पहिल्यांदा अंतराळ प्रवास सहन करणार आहेत. वे फूई हे ३२ वर्षाचे सर्वात तरुण अंतराळवीर ठरले आहे. तर झांग होंगझांग हे पेलोड विशेषतज्ञ आहे.
काय आहे मोहिमेचे उद्दिष्ट म्हणजे उंदरांना अंतराळात पाठवून Microgravity चा आणि अंतराळ जागेत राहण्याच्या प्रभावाचा अभ्यास करणे आहे. यामुळे भविष्यात मानवाच्या दीर्घकालीन अंतराळ प्रवासासाठी आवश्यक माहिती मिळेल. चीनच्या सरकारी माध्यम चायना नॅशनल रेडिओने दिलेल्या अहवालानुसार, अंतराळात दोन नर (Male) आणि दोन मादी (Female) पाठवले जाणार आहेत. अंदाजे पाच ते सात दिवस उंदिर अंतराळात राहतील. यादरम्यान उंदरांच्या हालचाली, आहार, झोप आणि वर्तनाचे निरिक्षण केले जाणार आहे. त्यांना Shenzhou-20 या अंतराळ यानाने परत पृथ्वीवर आणले जाईल.
हे संशोधन चीनच्या जैवविज्ञान संशोधनासाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे. यामुळे अंतराळातील जीवनशैलीचा पृथ्वीवरील सजीवांवर काय परिणाम होतो, ज्यामध्ये हाडे, स्नायू, तसेच मानसिक आरोग्य अशा बदलांचा अभ्यास केला जाणार आहे. चीनची ही मोहीम केवळ एक प्रयोग नसून जगभरासाठी तंत्रज्ञान विकासासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जात आहेत.
FAQs(संबंधित प्रश्न)
प्रश्न १. काय आहे चीनची Shenzhou-21 मोहिम?
चीनच्या या अंतराळ मोहिमेत मानवांसोबत चार उंदिर पाठवले जाणार आहेत, ज्यामुळे अंतराळातील वातावरणाचा मानवावर काय परिणाम होईल याचा अभ्यास करता येईल.
प्रश्न २. काय आहे या मोहिमेचा उद्देश?
अंतराळात चार उंदिर पाठवण्यामागाचा चीनचा हेतू म्हणजे, अंतराळातील जीवनशैलीचा पृथ्वीवरील सजीवांवर होणारा परिणाम, हाडे आणि स्नायूंच्या वाढीवरील परिणाम, तसेच मानसिक आरोग्यावर होणारे बदल या सर्व बाबींचा सखोल अभ्यास करणे आहे.
सौदी अरेबियामध्ये पोलीस अन् गुंडांमध्ये चकमक; गोळी लागून एका भारतीय नागरिकाचा मृत्यू