डोनाल्ड ट्रम्प आता 'या' देशावर नाराज; ख्रिश्चन धर्मासाठी मोठा धोका असल्याचं म्हणत 'वॉचलिस्ट'मध्ये टाकलं (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
Donald Trump News in Marathi : वॉशिंग्टन : अमेरिकेचे (America) राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) सतत कोणत्या ना कोणत्या देशावर नाराज होत आहे. गेल्या काही काळात त्यांनी अनेक देशांविरोधात भूमिका घेतली आहे. भारत, रशियावर ट्रम्प नाराज आहेतच, पण आता आणखी एका देशावर त्यांना नाराजी व्यक्त केली आहे. हे ट्रम्प यांनी नायजेरियाला ख्रिश्चन धर्माच्या अस्तित्वासाठी धोक्याचा सामना करावा लागत असल्याचे म्हटले आहे. याच पार्श्वभूमीवर त्यांनी एक मोठी निर्णय घेतला असल्याचे म्हटले आहे.
ट्रम्प यांनी नायजेरियाला (Nigeria News) अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाच्या वॉचलिस्टमध्ये टाकले आहे. ट्रम्प यांनी त्यांनी ट्रुथ या सोशल मिडिया अकाऊंटवर यासंबंधी पोस्ट केली आहे. ट्रम्प यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे की, नायजेरियात हजारो ख्रिश्चनांची हत्या केली जात आहे. ख्रिश्चन धर्माचे कट्टरपंथी विरोधक त्यांच्याविरोधात नरसंहार करत आहेत. यामुळे अमेरिकेने हा विषय चिंताजनक असल्याचे घोषित करत नायजेरियाला वॉचलिस्टमध्ये टाकले आहे.
अमेरिके नायजेरियाला वॉचलिस्टमध्ये म्हणजेच (CCP) विशेष चिंताजनक देशांच्या यादीत टाकले आहे. या यादीतमध्ये रशिया, चीन, पाकिस्तान, उत्तर कोरिया आणि म्यानमार यांसारख्या देशांचा समावेश आहे. या यादीत धार्मिक स्वातंत्र्याचे उल्लंघन करणाऱ्या देशाला ठेवले जाते. यामुळे आता नायजेरियावर आर्थिक निर्बंध लादले जाण्याची शक्यता आहे. सध्या राजनैतिक किंवा आर्थिक कारवाई ही ट्रम्प यांच्या निर्णयावर अवलंबून आहे.
Donald Trump has finally join the propaganda, and he declared Nigeria as a country of particular concern because of the so called Christian genocide! This happened because of the carelessness of our government. The FG knows it’s false, yet it turned a blind eye. pic.twitter.com/F2OInSPTyz — F A A R E E S 💫 🇵🇸 (@MFaarees_) October 31, 2025
ट्रम्प यांनी दिलेल्या माहितीनुसार, यूएस व्हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हज ॲप्रोप्रिएशन कमिटी आणि कॉंग्रेस सदस्य रिले यांच्याकडे नायजेरियातील परिस्थितीच्या चौकशीची मागणी केली आहे. ट्रम्प यांनी नायजेरियात हजारो निरापराध लोकांना त्यांच्या धर्मामुळे ठार केले जात आहे. ही बाब चिंताजनक असल्याचे आणि यासाठी कारवाईची आवश्यकता असल्याचे म्हटले आहे.
ट्रम्पच्या कारवाईवर नायजेरियाची प्रतिक्रिया
ट्रम्प यांनी केलेल्या कारवाईला नायजेरियाने स्पष्टीकरण देत म्हटले आहे की, त्यांच्या देशात धार्मिक स्वतंत्र पूर्णपणे संरक्षित आहे. तसेच सरकारने कोणत्याही धर्माविरोधात हिंसाचाराचे समर्थन केलेले नाही.
अमेरिका आता कोणती कारवाई करणार ?
नायजेरियाला वॉचलिस्टमध्ये टाकल्यानंतर अमेरिका नायजेरियातील संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेईल. यानंतर यावर एक अहवाल तयार करुन अमेरिकेच्या आंतरराष्ट्रीय धार्मिक स्वातंत्र्य कायद्यानुसार कारवाई केली जाईल. यानुसार, जर एखाद्या देशान धार्मिक स्वातंत्र्या किंवा अल्पसंख्यांक धार्मिक लोकांना लक्ष्य केले असल्यास त्यांच्यावर आर्थिक निर्बंध, व्यापार निर्बंध आणि राजनैतिक दबाव लादले जातील.
FAQs(संबंधित प्रश्न)
प्रश्न १. ट्रम्प आता कोणत्या देशावर नाराज झाले आहेत आणि का?
ट्रम्प आता नायजेरियावर नाराज झालेले आहेत, कारण नायजेरियात धार्मिक स्वातत्र्यांचे उल्लंघन केले असल्याचे आणि निरापराध लोकांची हत्या केली असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
प्रश्न २. ट्रम्प यांनी नायजेरियाविरोधात कोणती कारवाई केली आहे.
म्प यांनी नायजेरियाला (Nigeria News) अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाच्या वॉचलिस्टमध्ये म्हणजेच (CCP) विशेष चिंताजनक देशांच्या यादीत टाकले आहे.
प्रश्न ३. ट्रम्प यांच्या कारवाईवर नायजेरियाने काय प्रतिक्रिया दिली आहे?
ट्रम्प यांनी केलेल्या कारवाईला नायजेरियाने स्पष्टीकरण देत म्हटले आहे की, त्यांच्या देशात धार्मिक स्वतंत्र पूर्णपणे संरक्षित आहे. तसेच सरकारने कोणत्याही धर्माविरोधात हिंसाचाराचे समर्थन केलेले नाही.






