China Taliban Relations Taliban cancels Landmark oil contract with Chinese company Afchin
China Taliban Realtions : काबूल : सध्या मध्य पूर्वेत इराण आणि इस्रायलमध्ये युद्ध धगधगत आहे. याच वेळी दुसरीकडे चीन आणि तालिबानमध्येही तणाव निर्माण झाला आहे. चीनच्या फसवणुकीविरोधात तालिबानने मोठे पाऊल उचलले आहे. यामुळे चीनला मोठा धक्का बसला आहे. चीनी कंपनी अफचिनविरोधात तालिबानने कठोर कारवाई केली असून कोट्यावधींचा करार रद्द केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चीनने तालिबानसोबत खाण आणि पेट्रोलियमसाठी अमू नदीतून तेल काढण्याचा करार केला होता. परंतु हा करार रद्द केल्याची घोषणा तालिबानने केली आहे. हा करार २५ वर्षांसाठी करण्यात आला होता. मात्र हा करार रद्द करण्यात आला आहे. अफगाणिस्तानच्या मंत्रालयाच्या प्रवक्त्याने यासंबंधी एक निवेदन जारी केले आहे.
या निवेदनात सांगण्यात आले आहे की, चिनी कंपनीने या करारांतर्गत दिलेली आश्वासने पूर्ण केलेली नाहीत. यामुळे हा करार रद्द करण्यात येत आहे. या करारांतर्गत चीन गुंतवणूक करण्यात अपयशी ठरला आहे. तसेच विहिरी खोदकाम आणि शोधकामात अभाव आहे. तसेच अफगाण नागरिकांना त्यांचे वेतन देण्यात आलेले नाही. यामध्येही चीनने निष्काळजीपणा केला असल्याचा आरोप चीनी कंपनीवर करण्यात आला आहे.
अफगाणिस्तानच्या खाण आणि पेट्रोलिम मंत्रालयाचे प्रवक्ते हुमायून अफगाण यांनी दिलेल्या माहितीनुसा, या कारारांतर्गत संयुक्त आंतर-मंत्रालयीन समिती स्थापन करण्यात आली होती.
यावेळी समितीला चौकशीमध्ये चीन कंपनीने कराराच्या अटी पूर्ण न केल्याचे आढळून आहे. यामुळे आर्थिक कार्यालयाच्या शिफारशीनुसार आणि पंतप्रधानांच्या आदेशानुसार, अमू बसीयासाठी अफचिनसोबतचा हा तेल करार रद्द करण्यात येते आहे.
याच वेळी अफगाणच्या आर्थिक तज्ञांनी त्यांच्या गरजा लक्षात घेऊन खाण प्रकल्पांवर अधिक चौकशीचे आदेश दिले आहेत. अफगाणिस्तानात असलेल्या स्थानिक कंपन्यांना प्रकल्प देण्याचीही मागणी करण्यात आली आहे. यामुळे अशा फसवणुकीच्या घटनांना टाळता येईल असे आर्थिक तज्ञांनी म्हटले आहे.
याचवेळी आर्थिक विश्लेषक मोहम्मद नबी अफगाण यांनी, सध्या देशामध्ये तेलाची गरज मोठ्या प्रमाणात असल्याचे म्हटले आहे. यासाठी सराकरने योग्य ती पावले उचलण्याचे आवाहन मोहम्मद नबी यांनी केले आहे. तसेच भविष्याती करारांमध्ये काही कठोर अटी समाविष्ट करण्यास सांगितल्या आहे, ज्यामुळे कोणतेही नुकसान आणि परिणाम तालिबानला भोगावे लागणार नाही.