Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अंधःकारमय इतिहासाची पुनरावृत्ती? चीनमध्ये परेड तर अमेरिकेत पेंटागॉनमध्ये धडाधड पिझ्झा ऑर्डर ‘हा’ जगासाठी धोक्याचा इशारा

Potential War Signs : चीनमध्ये विजय दिनाच्या परेडच्या तयारी दरम्यान, अमेरिकेतील पेंटागॉनभोवती पिझ्झाची मागणी अचानक वाढली आहे. याला 'पेंटागॉन पिझ्झा इंडेक्स' म्हणतात आणि असे मानले जाते की ते...

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Sep 06, 2025 | 02:58 PM
china victory day parade us pentagon pizza demand index

china victory day parade us pentagon pizza demand index

Follow Us
Close
Follow Us:

Potential War Signs : जगातील महाशक्तींच्या हालचालींवर नेहमीच लक्ष ठेवले जाते. कारण, त्यांच्या प्रत्येक हालचालींमध्ये केवळ राजकारण दडलेले नसते तर कधी कधी भविष्यात घडू शकणाऱ्या घटनांची चाहूलही मिळते. अलीकडेच घडलेली एक विचित्र बाब पुन्हा चर्चेत आली आहे ती म्हणजे “पेंटागॉन पिझ्झा इंडेक्स”. चीनमध्ये विजय दिनाच्या परेडची जोरदार तयारी सुरू असताना, अमेरिकेतील पेंटागॉन परिसरात पिझ्झाच्या ऑर्डरमध्ये अचानक वाढ नोंदवली गेली. पाहता साधेसे वाटणारे हे प्रकरण प्रत्यक्षात जगभरात चर्चेचा विषय बनले आहे. कारण असे मानले जाते की, जेव्हा जेव्हा अमेरिकेत आणीबाणी येते किंवा युद्धाची तयारी सुरू असते, तेव्हा पेंटागॉन व व्हाईट हाऊसजवळील पिझ्झा विक्रीत प्रचंड वाढ होते.

‘पेंटागॉन पिझ्झा इंडेक्स’ म्हणजे काय?

१९९० च्या दशकात सोव्हिएत रशियाच्या गुप्तचर संस्थांनी प्रथम हा पॅटर्न ओळखला. त्यांचे म्हणणे असे होते की, पेंटागॉन किंवा सीआयए मुख्यालयात अचानक २४ तास काम सुरू झाले, की कर्मचारी बाहेर जाऊन खाण्यास वेळ काढू शकत नाहीत. त्यामुळे ते पिझ्झासारखे फास्ट फूडच मागवतात. आणि त्याचा थेट परिणाम म्हणजे जवळच्या डोमिनोज किंवा इतर पिझ्झा आउटलेटवर प्रचंड ऑर्डर येऊ लागतात. हा योगायोग इतका ठळक होता की १९९१ मध्ये कुवेत-इराक युद्धाच्या आधीही डोमिनोज फ्रँचायझीने पिझ्झा विक्रीत झालेल्या अचानक वाढीचा उल्लेख केला होता. त्यामुळे त्याला पुढे “पेंटागॉन पिझ्झा इंडेक्स” असे नाव मिळाले.

#VantageOnFirstpost: As China showcased its military might with a grand parade, a curious trend emerged— a massive spike in pizza orders near the Pentagon. Is this just a coincidence, or does the so-called Pentagon Pizza Index reveal something deeper? @palkisu tells you. pic.twitter.com/L8wWee6BnL — Firstpost (@firstpost) September 5, 2025

credit : social media

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : अमेरिकेनंतर भारतानेही दिला ग्रीन सिग्नल? ट्रम्प यांनी PM मोदींचे कौतुक केल्यावर एस जयशंकर यांची पहिलीच प्रतिक्रिया

 इतिहासातील काही उदाहरणे

  • १९९८ : तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांच्यावर महाभियोग प्रक्रिया सुरू झाली तेव्हाही पेंटागॉनभोवती पिझ्झाच्या ऑर्डर्समध्ये वाढ झाली होती.
  • इराणवरील हल्ला : अमेरिकेने इराणवर कारवाई केली तेव्हाही डोमिनोजच्या ऑर्डर्स अचानक उंचावल्या.
  • इराक-इराण युद्ध : युद्धाच्या आधी पेंटागॉन परिसरातील पिझ्झा शॉप्समध्ये विक्री अनेक पटींनी वाढली.

यामुळे, पिझ्झा ऑर्डर्स वाढल्या की, कुठेतरी संकट उभे आहे किंवा मोठ्या कारवाईची तयारी सुरू आहे असे मानले जाऊ लागले.

 आत्ताची परिस्थिती

चीनमध्ये नुकत्याच झालेल्या विजय दिनाच्या मिलिटरी परेडमध्ये रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग-उन यांची उपस्थिती ही जगासाठी पुरेशी धक्कादायक होती. याच काळात, म्हणजे १ आणि २ सप्टेंबर रोजी, व्हाईट हाऊसजवळ डोमिनोज विक्रीत अचानक वाढ नोंदवली गेली. त्यानंतर पेंटागॉन परिसरातही असामान्य प्रमाणात पिझ्झा ऑर्डर झाल्या. ही वाढ केवळ एक योगायोग आहे का? की खरोखरच अमेरिकेत कुठल्या मोठ्या निर्णयाची तयारी सुरू आहे? या प्रश्नाने जगभरातील माध्यमांचे लक्ष वेधले आहे. सोशल मीडियावर तर “Trump is Dead” हा ट्रेंड काही दिवसांत अचानक वाढला. यामुळे राजकीय वातावरण आणखीच तापले.

 पिझ्झा म्हणजे संकटाचे लक्षण?

गंमत म्हणजे, पेंटागॉन पिझ्झा इंडेक्स हे कोणतेही अधिकृत युद्ध संकेतक नाही. पण अनेकदा इतिहासाने दाखवून दिले आहे की, अशा वाढीमुळे काहीतरी मोठी घटना घडण्याची शक्यता असते. काही विश्लेषकांचे म्हणणे आहे की, हे फक्त “वर्क कल्चर” आहे. आणीबाणीच्या वेळी कर्मचारी ऑफिसमध्ये अडकतात आणि त्यांना पटकन मिळणारा पर्याय म्हणजे पिझ्झा. त्यामुळे विक्री वाढते, आणि जग त्याला युद्धाची चाहूल मानते.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : ‘हा विजयाचा संदेश आहे…’अमेरिकेचा पुन्हा आक्रमक पवित्रा, ट्रम्प यांनी पेंटागॉनचे नामकरण ‘डिपार्टमेंट ऑफ वॉर’ का केले?

 जगाची नजर अमेरिकेकडे

आजच्या जागतिक राजकारणात प्रत्येक हालचालीकडे लक्ष ठेवले जाते. चीनची मिलिटरी परेड, रशिया-उत्तर कोरियाचे जवळ येणे, आणि त्याच वेळी पेंटागॉनमधील पिझ्झा ऑर्डर्स वाढणे या सर्व घडामोडींनी जगाला एक गंभीर प्रश्न विचारायला भाग पाडले आहे. आगामी काळात आपण मोठ्या संघर्षाच्या उंबरठ्यावर आहोत का? उत्तर अजून मिळालेले नाही, पण “पेंटागॉन पिझ्झा इंडेक्स” पुन्हा एकदा चर्चेत आलाय, हे मात्र नक्की.

Web Title: China victory day parade us pentagon pizza demand index

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 06, 2025 | 02:58 PM

Topics:  

  • America
  • China
  • History
  • International Political news

संबंधित बातम्या

टॅरिफनंतर आता AI वॉर? ट्रम्पच्या खास व्यक्तीचा भारतावर हल्ला, ChatGPT बंद करण्याची केली मागणी
1

टॅरिफनंतर आता AI वॉर? ट्रम्पच्या खास व्यक्तीचा भारतावर हल्ला, ChatGPT बंद करण्याची केली मागणी

Iran Regime Change : इराणवर अजूनही ट्रम्पची नजर? खामेनेईंच्या सत्तापालटाचा थेट इशारा, नवा प्लॅन तयार?
2

Iran Regime Change : इराणवर अजूनही ट्रम्पची नजर? खामेनेईंच्या सत्तापालटाचा थेट इशारा, नवा प्लॅन तयार?

Greenland साठी ट्रम्पला आव्हान देणं युरोपीय देशांना पडलं महागात; फ्रान्स-जर्मनीसह ८ देशांवर ‘टॅरिफ बॉम्ब’
3

Greenland साठी ट्रम्पला आव्हान देणं युरोपीय देशांना पडलं महागात; फ्रान्स-जर्मनीसह ८ देशांवर ‘टॅरिफ बॉम्ब’

Greenland Protest 2026: ट्रम्प यांच्या ‘हट्टामुळे’ जग पेटले! डेन्मार्क ते ग्रीनलँड हजारो लोक रस्त्यावर; अमेरिकन दूतावासाला घेराव
4

Greenland Protest 2026: ट्रम्प यांच्या ‘हट्टामुळे’ जग पेटले! डेन्मार्क ते ग्रीनलँड हजारो लोक रस्त्यावर; अमेरिकन दूतावासाला घेराव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.