फोटो सौजन्य AI
सुरवातीला रशिया आणि अमेरिके मध्ये महासत्ता होण्याची स्पर्धा लागली होती . अर्थात अजून ही स्पर्धा पूर्णपणे संपली आहे असे म्हणता येणार नाही . पण पूर्वी सारखा आता रशियाचा प्रभाव जगभरात राहिला नाही . खास करून सोव्हियेत संघाच्या विघटनानंतर , यानंतर अमेरिका मात्र आपले स्थान टिकवून ठेवायला यशस्वी झाली .
पण पुढील काही काळानंतर चीन हळूहळू सर्वच बाबतीत सुधारणा करत मार्गक्रमण करू लागला . आणि जगाच्या लक्षात यायला लागलं किंबहुना अमेरिकेच्या हे लक्षात यायला लागला कि रशिया , भारत हा सध्या आणि भविष्यातील आपला महासत्तेच्या दृष्टीने विरोधक नसून चीन आहे . विज्ञान , तंत्रज्ञान , गरिबी , बांधकाम , विविध वस्तू उत्पादन , शिक्षण , आरोग्य व्यवस्था इत्यादी अनेक सर्वच पातळीवर चीन प्रगती करू लागला .
अर्थात अमेरिकेने त्यात अडथळे आणण्याचे प्रयत्न केले नाही असे नाही . पण प्रत्यक्षात अमेरिका चीन ठळकपणे विरोध करू शकत नसला तरी दोन्ही देशांमध्ये आता एक सुप्त संघर्ष सुरु झाला आहे . याचे उदाहरण द्यायचे झाले तर बऱ्याच गोष्टी आहेत . जसं कि चीन ला सेमीकंडक्टर बनवण्यासाठी लागणारी मशीन ही नेदरलँड मधील जगप्रसिद्ध कंपनीकडून मिळू न देणे , त्यावर निर्बंध लादणे इत्यादी आपल्याला सांगता येतील . तेव्हा चीन आणि अमेरिका यांच्यात येणाऱ्या काळात एकमेकांवर कुरघोड्या करणं आणि आपला स्वार्थ साधनं हे सुरूच राहणार आहे . असे जाणकार सांगत असल्याचे समजते .
या मार्गाचा सर्वात मोठा फायदा म्हणजे अंतर आणि वेळ कमी होणे . चीनहून युरोपला जाण्यासाठी पारंपरिक मार्गापेक्षा Arctic Route काही प्रवासांमध्ये जवळपास निम्मा वेळ घेऊ शकतो . त्यामुळे इंधनाचा वापर आणि काही वाहतूक खर्च कमी होण्याची शक्यता आहे . मात्र या यामागे एक मोठी विसंगती आहे .
हा मार्ग अधिक खुला होत आहे कारण Arctic मधील बर्फ वेगाने वितळत आहे . म्हणजेच हवामान बदलामुळे निर्माण झालेल्या परिस्थीचा फायदा घेऊन नवीन व्यापार मार्ग तयार होत आहे . त्यामुळे त्याला आपोआप ग्रीन किंवा पर्यावरणपूरक मार्ग म्हणता येणार नाही .
चीनला या मार्गामुळे Suez canal , Red Sea आणि इतर महत्वाच्या समुद्री Chokepoints वरील अवलंबित्व काही प्रमाणात कमी करता येऊ शकते . त्यामुळे हा केवळ व्यापाराचा मार्ग न राहता चीनच्या दीर्घकालीन रणनीतीक धोरणाचा भाग बनू शकतो . चीनने २०१८ मध्येच Arctic shipping विकसित करण्यासाठी Polar silk road उभारण्याची भूमिका मांडली होती .
त्यामुळे Arctic मध्ये चीन रशिया आणि अमेरिका यांच्यातील रणनीतीक सर्प[स्पर्धा आणखी वाढण्याची शक्यता आहे . विशेषतः रशियाच्या नियंत्रणाखालील NSR चा वापर वाढल्यास व्यापाराबरोबरच ऊर्जा , संसाधने ,या आणि लष्करी रणनीतीक उपस्थितीचे महत्वही वाढेल .






