China's Moon Mission Achieves Successful Escape Test; Plans Human Landing by 2030
China Space news Marathi : बिजिंग : एक मोठी माहिती समोर येत आहे. चीन लवकरच चंद्रावर पाऊल ठेवण्याच्या तयारीत आहे. चीनने यासाठी एक नवीन योजना आखली आहे. २०३० पर्यंत ही योजना पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. यासाठी चीनने एक मोठी यशस्वी चाचणी केली आहे. यामुळे चीनसाठी चंद्रावर अंतराळवीर पाठवण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल घेतले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चीनने १७ जून रोजी चंद्र मोहिमे अंतर्गत “मेंगझोऊ” च्या ड्रॅगन कॅप्सूलची यशस्वी चाचणी केली आहे. यामध्ये मेंगझोऊचे कॅप्सूल एस्केप वॉटरपासून वेगळे करण्यात आले. ही चाचणी यशस्वी झाल्याने चीनसाठी ही एक मोठे आणि महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. अंतराळवीरांचे सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी ही चाचणी घेण्यात आली होती.
मेंगझोऊच्या कॅप्सूल एस्केपमुळे चीनला आता टॉवरपासून यशस्वीपणे वेगळे होता येईल. तसेच आपात्कालीन परिस्थितीत हे तंत्रज्ञान अंतराळवीरांची सुरक्षा देखील सुनिश्चित करेल. चीनच्या मेंगझोऊ मिशनची पहिली यशस्वी चाचणी १९९८ मध्ये घेण्यात आली होती. त्यानंतर आज २०२५ मध्ये झालेली दुसरी यशस्वी चाचणी आहे. यामुळे अंतराळयान जमिनीपासून कमी उंचीवर असल्यावर आणि आपत्कालीन परिस्थितीत कॅप्सूल सहज वेगळे करता येईल.
चीनने या चंद्रयान योजनेला मेंगझोऊ नाव दिली आहे. या मेंगझोऊचा अर्थ स्वप्नांचे जहास असा होता. या मेंगझोऊ वाहनाचे खास वैशिष्ट्ये म्हणजे याची बचाव प्रणाली पूर्णपणे अंतराळयानाच्या आतामध्ये बसवण्यात आली आहे. ही यान पूर्वी शेन्झोऊ मोहिमेत रॉकेट प्रणालीद्वारे विकसित करण्यात आले आहे.
या मोहिमेमुळे अंतराळवीरांची आपत्कालीन परिस्थितीत लकवर बचावर होऊ. या मोहिमेची बचाव प्रणाली चौथ्या अकादमी ऑफ चायना एरोस्पेस ॲंड इंडस्ट्री कॉर्प अंतर्गत विकसित करण्यात आली आहे. या प्रणालीमध्ये स्वदेशी सेन्सर्स आणि तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. तसेच सॉलिड रॉकेट मोटर तंत्रज्ञानाचाही वापर करण्यात आला आहे. ही प्रणाली रिटर्न कॅप्सूलच्या वरच्या भागात बसवण्यात आली आहे. यामुळे अंतराळवीरांना सुरक्षितपणे बाहेर काढता येईल.
चिनी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, चीनने या मोहीमेच्या लॉन्चसाठी १० मार्च २०२६ तारिख निश्चित केली आहे. या दिवशी रॉकेटचे पहिले प्रक्षेपण केले झाली. भविष्यात ही मोहिम चीनसाठी अंतराळ क्षेत्रात महत्त्वाची भूमिका बजावले. सध्या चीन मानवयुक्त चंद्राच्या दिशेने पाऊल ठेवत आहे. अगदी अचूक तांत्रिक तयारीने चीन हळूहळू एक पाऊल पुढे टाकत आहे.