धोक्याची घंटा! चिनीने विकसित केले डासाच्या आकाराचे ड्रोन; युद्धभुमीत घडवू शकते मोठा विनाश (फोटो सौजन्य: सोशल मीडिया/ एक्स -@OwenGregorian)
China News Marathi : बिजिंग :सध्या जग युद्धाच्या उंबरठ्यावर आहे. एकीकडे इराण आणि इस्रायलमध्ये युद्धबंदी झाली असली तर तणावाचे वातावरण आहे, तसेच दुसरीकडे रशिया आणि युक्रेनमध्ये संघर्ष सुरु आहे. याशिवाय चीन देखील जपान आणि तैवानला घेरण्याच्या तयारीत आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर चिंतेचे वातावरण आहे. याच वेळी आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. चीनने असे अत्याधुनिक ड्रोन विकसित केले आहे, ज्यामुळे युद्धभुमीत प्रचंड विध्वंस होऊ शकतो.
मिळालेल्या माहितीनुसार, जग इराण आणि इस्रायल युद्धात बुडालेले असताना चीनने आपली लष्करी ताकद वाढवण्यावर भर दिला आहे. चीनने डासाच्या आकाराएवढे अत्याधुनिक लष्करी ड्रोन विकसित केले आहे. हे मायक्रो ड्रोन युद्धभुमीत मोठा विनाश घडवून आणू शकते. या ड्रोनचा वापर देखरेखेसाठी आणि हल्ल्यासाठी देखील करता येतो. यामुळे अनेक गुप्तचर योजनांमध्ये चीन याचा वापर करुन शकतो.
यामुळे जगभरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. चिनी शास्त्रज्ञांनी अतिशय लहान डासांच्या आकाराचा ड्रोन विकसित केला आहे. साऊथ चायना मॉर्निंग पोस्टने दिलेल्या अहवालानुसार, ड्रॅगनचे हे डासाच्या आकाराचे मायक्रो ड्रोन हुंतात प्रांतातील नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ डिफेन्स टेक्नॉलॉजी (NUDT)च्या रोबोटिक्स लॅबने तयार केले आहे.
Chinese military unveils mosquito-sized drones that can perform battlefield missions | Christopher McFadden, Interesting Engineering
The drone features a pair of flapping “wings” and “legs” and is designed for covert military operations.
China’s National University of Defence… pic.twitter.com/V1VZz5w3Ft
— Owen Gregorian (@OwenGregorian) June 22, 2025
चीनच्या माध्यमांनी अलीकडे या ड्रोनचे व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केले होते. यामध्ये या डासांसारख्या मायक्रो ड्रोन दाखवण्यात आले होते. चीनच्या सरकारी माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, या ड्रोनचा वापर लष्करी आणि गुप्त मोहीमांसाठी करण्यात येणार आहे. याशिवाय या ड्रोनचा वापर गोपीनीय डेटा गोळा करणे, रेकॉर्ड करणे, शत्रू देशांवर नजर ठेवणे पासवर्ड चोरणे यासांरख्या बेकायदेशीर गोष्टींसाठी केला जाऊ शकतो.
हे ड्रोन आकाराने लहान आणि हलके आहे. मात्र यामध्ये प्रचंड विनाश घडवून आणण्याची ताकद आहे. भविष्यात चीन याचा वापर, भारत, अमेरिका, तैवान सारख्या शत्रू देशांविरोधात करु शकतो.अहवालात दिलेल्या माहितीनुसार, या मायक्रो ड्रोनचा वापर लष्करी कारवायांमध्येह सहज करता येऊ शकतो. युद्धादरम्यान शत्रू देशाच्या अनेक गुप्त माहिती यामुळे चीनला मिळू शकते. या ड्रोनच वापर आपत्तीजनक परिस्थितीमध्ये, भूंकप आणि पूरपरिस्थितीत ढिगाऱ्यांखाली अडकलेल्या, बेपत्ता झालेल्या लोकांना शोधण्यासाठी देखील होऊ शकतो.