Chinese spies tracking Rafale jets exposed in Greece Ukraine and Italy
Chinese spies Rafale : जगभरातील सामरिक तंत्रज्ञानाची चोरी आणि बनावट प्रचार मोहीमेत आता चीनचे नाव आघाडीवर येत आहे. राफेलसारख्या अत्याधुनिक लढाऊ विमानाविरोधात गुप्त पाळत ठेवणाऱ्या चिनी हेरांचा जागतिक जाळा आता ग्रीस, युक्रेन आणि इटलीसारख्या देशांत उघडकीस येत आहे. या घटनांमुळे चीनच्या गुप्तचर यंत्रणेच्या आक्रमक धोरणांची आणि जागतिक सुरक्षेवरील परिणामांची गंभीर चर्चा सुरु झाली आहे.
ग्रीसच्या टांगारा परिसरातील हेलेनिक हवाई दलाच्या ११४ व्या कॉम्बॅट विंगमध्ये तैनात असलेल्या फ्रेंच बनावटीच्या राफेल लढाऊ विमानांवर नजर ठेवणाऱ्या चार चिनी नागरिकांना ग्रीक पोलिसांनी अटक केली आहे. हे चौघे पर्यटकांच्या वेषात ग्रीसमध्ये आले होते आणि त्यांनी विमानांचे गुप्त फोटो काढण्याचा प्रयत्न केला. हेच लोक ग्रीसच्या एरोस्पेस कारखान्यातही संशयास्पदपणे फोटो घेताना आढळले होते. सुरक्षा अधिकाऱ्यांनी तत्परतेने कारवाई करताना चौघांना अटक केली. आता ग्रीसच्या गुप्तचर यंत्रणा तपास करत आहेत की हे स्वतंत्र हेरगिरी प्रकरण आहे की फ्रान्समध्ये उघड झालेल्या एका मोठ्या रॅकेटचा भाग.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : भारताच्या आत्मनिर्भरतेचे उड्डाण! बनवत आहे ‘ही’ 5 धोकादायक हायपरसोनिक क्षेपणास्त्रे; हवाई दलासाठी ठरणार गेम चेंजर
फ्रेंच गुप्तचर संस्थेने काही दिवसांपूर्वी एक मोठा खुलासा केला होता. त्यांच्या म्हणण्यानुसार, ‘ऑपरेशन सिंदूर’च्या पार्श्वभूमीवर चीनने जगभरातील आपल्या दूतावासांना राफेलविरुद्ध खोटा प्रचार करण्याचे आदेश दिले होते. त्याअंतर्गत, चिनी माध्यमांतून हे दावे करण्यात आले की पाकिस्तानने वापरलेली चिनी J-10 आणि J-17 लढाऊ विमाने PL-15 क्षेपणास्त्रांच्या मदतीने राफेल विमाने पाडू शकतात. या बनावट माहितीच्या माध्यमातून चीन राफेलच्या खरेदीवर प्रश्नचिन्ह उभे करायचा प्रयत्न करत होता.
युक्रेनमध्येही दोन चिनी हेर अटक करण्यात आले. हे वडील-मुलगा जोडी असल्याचे सांगितले जात आहे. मुलगा विद्यार्थी म्हणून कीवमध्ये राहत होता, तर वडील त्याला भेटण्याच्या बहाण्याने युक्रेनमध्ये आले. हे दोघे मिळून युक्रेनियन ‘नेपच्यून क्रूझ क्षेपणास्त्र’चे तंत्रज्ञान चोरण्याचा प्रयत्न करत होते. युक्रेनच्या गुप्तचर यंत्रणांनी त्यांना रंगेहाथ पकडले.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : तैवानकडून चीनविरोधात मोठे शक्तिप्रदर्शन! अमेरिकेच्या HIMARS रॉकेट आणि अब्राम्स टँकसह सर्वात मोठा युद्धसराव सुरु
इटलीच्या मिलान शहरात अमेरिकेच्या एफबीआयने शु झेवेई नावाच्या चिनी हॅकरला अटक केली. तो चीनच्या राज्य सुरक्षा मंत्रालयासाठी (MSS) काम करत होता. शु झेवेईवर अमेरिकेच्या संवेदनशील प्रणालींमध्ये घुसखोरी करण्याचा आरोप आहे.