Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • ajit pawar plane crash |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

AI careers : बारावीनंतर लगेच निवडा ‘AI’ करिअर; ‘हे’ आहेत भारतातून परदेशात करिअर बनवणारे टॉप कोर्सेस

AI careers after 12th : आजच्या युगात चांगली नोकरी आणि करिअर मिळवणे खूप कठीण झाले आहे. AI च्या युगात, त्याच्याशी संबंधित कोर्स केल्याने भविष्यात चांगले पर्याय मिळू शकतात.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Sep 14, 2025 | 10:22 PM
Choose AI career immediately after 12th and get courses that increase job opportunities abroad

Choose AI career immediately after 12th and get courses that increase job opportunities abroad

Follow Us
Close
Follow Us:
  • बारावीनंतर एआय (Artificial Intelligence) क्षेत्रातील कोर्सेसमुळे चांगल्या करिअरच्या आणि परदेशातील नोकरीच्या संधी वाढतात.
  • बी.टेक, बी.कॉम, बीसीए, तसेच अल्पकालीन डिप्लोमा कोर्सेसद्वारे विद्यार्थी एआयचे सखोल शिक्षण घेऊ शकतात.
  • एआय कोर्सेसमुळे डिजिटल मार्केटिंग, ई-कॉमर्स, स्टार्टअप्स यांसारख्या क्षेत्रांमध्येही प्रगतीची दारे खुली होतात.

Courses for AI jobs abroad : आजच्या स्पर्धात्मक जगात विद्यार्थ्यांसाठी करिअरचा मार्ग निवडणे हा एक मोठा टप्पा ठरतो. बारावीनंतर कोणता अभ्यासक्रम निवडायचा, भविष्यात नोकरी कुठे मिळेल, करिअरमध्ये स्थैर्य किती असेल अशा असंख्य प्रश्नांमुळे पालक व विद्यार्थी दोघेही गोंधळतात. परंतु आजच्या काळातील सर्वात वेगाने वाढणारे क्षेत्र म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय). तंत्रज्ञानाच्या प्रत्येक अंगामध्ये एआयचा वापर वाढत असून, त्यामुळे या क्षेत्रातील करिअरच्या संधी अमर्याद आहेत.

एआय का निवडावे?

आज माहिती शोधणे, संवाद साधणे, बँकिंग, आरोग्य, शिक्षण, अगदी मनोरंजनपर्यंत प्रत्येक क्षेत्रात एआयचा वापर सुरू आहे. एआय टूल्सनी उद्योगांच्या कामकाजात क्रांती केली आहे. त्यामुळे या क्षेत्रात कौशल्य मिळवले तर केवळ भारतातच नव्हे तर परदेशातूनही नोकरीचे कॉल आणि शिष्यवृत्तीच्या संधी उपलब्ध होतात.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Russia Ukraine War : युक्रेनचा थेट रशियाच्या अर्थव्यवस्थेवरच घाला; Russia मध्ये अचानक पेट्रोलचा तुटवडा, वाचा का ते?

कोणते कोर्सेस करता येतील?

  1. बी.टेक इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स
    • विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांसाठी हा सर्वोत्तम पर्याय.
    • हा चार वर्षांचा अभ्यासक्रम असून प्रवेशासाठी पीसीएम (Physics, Chemistry, Maths) विषय आवश्यक.
    • यात मशीन लर्निंग, रोबोटिक्स, डेटा सायन्स यांसारख्या विषयांचे सखोल शिक्षण दिले जाते.
  2. बी.कॉम (एआयसह)
    • वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांसाठी उत्तम संधी.
    • यामध्ये फायनान्स, अकाउंटिंगसोबत एआय टूल्सचा वापर, डेटा ॲनालिटिक्स, ऑटोमेशन, रिपोर्टिंग यांसारखी कौशल्ये शिकवली जातात.
    • उदाहरणार्थ, मुंबईतील युनिव्हर्सल एआय युनिव्हर्सिटीमध्ये हा कोर्स उपलब्ध असून तो तीन वर्षांचा असतो. प्रवेशासाठी बारावीमध्ये किमान ५०% गुण आवश्यक.
  3. बीसीए (आर्टिफिशियल इंटेलिजन्स)
    • संगणक आणि तंत्रज्ञानाची आवड असलेल्या विद्यार्थ्यांसाठी हा पर्याय उत्तम.
    • या तीन वर्षांच्या अभ्यासक्रमात एआय प्रोग्रामिंग, मशीन लर्निंग, डेटा मायनिंग अशा विषयांचा समावेश आहे.
    • प्रवेशासाठी गणित विषय अनिवार्य आहे.
  4. डिप्लोमा कोर्सेस इन एआय
    • कमी वेळेत एआय शिकू इच्छिणाऱ्यांसाठी सोयीस्कर.
    • कालावधी ६ महिने ते १ वर्ष.
    • यात ChatGPT, Prompt Engineering, विविध एआय टूल्सचे प्रॅक्टिकल प्रशिक्षण दिले जाते.
    • हे कोर्सेस पदवीसोबत साइडमध्येही करता येतात.

करिअरमध्ये काय लाभ होईल?

एआय शिकल्याने केवळ नोकरीच्या संधी वाढत नाहीत, तर स्टार्टअप आयडियाज, डिजिटल मार्केटिंग, ई-कॉमर्स यांसारख्या क्षेत्रांतही विद्यार्थी स्वतःचा व्यवसाय उभारू शकतात.

  • आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये आकर्षक पॅकेज मिळवण्याची संधी.
  • शिष्यवृत्तीच्या माध्यमातून परदेशी शिक्षणाची दारे खुली.
  • तंत्रज्ञान क्षेत्रात टिकाव धरण्यासाठी एआयचे ज्ञान अनिवार्य ठरत आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Peñico city discovery : अमेरिकन संस्कृतीच्या उगमाचे रहस्य उलगडले; पेरूमध्ये सापडलेले 3800 वर्ष जुने शहर

परदेशातील संधी

बारावीनंतर कोणता करिअर मार्ग निवडावा, हा प्रत्येक मुलाच्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा असतो. आजच्या काळात एआय हे फक्त भविष्य नाही, तर वर्तमान आहे. त्यामुळे बी.टेक, बी.कॉम, बीसीए किंवा डिप्लोमा कोणताही मार्ग निवडा, परंतु एआय कौशल्य आत्मसात करा. हे कौशल्य तुम्हाला चांगल्या करिअरकडे, परदेशातील संधींकडे आणि उज्ज्वल भविष्याकडे घेऊन जाईल.

Web Title: Choose ai career immediately after 12th and get courses that increase job opportunities abroad

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 14, 2025 | 10:22 PM

Topics:  

  • AI technology
  • Artificial intelligence
  • career guide
  • Student Career Tips

संबंधित बातम्या

TECH EXPLAINED: AI Voice Assistant म्हणजे काय? कसं करतं काम? वापरण्यापूर्वी वाचा सविस्तर
1

TECH EXPLAINED: AI Voice Assistant म्हणजे काय? कसं करतं काम? वापरण्यापूर्वी वाचा सविस्तर

Confer Launch: डेटा लीकची भीती संपली! Signal फाऊंडरने लाँच केला जगातील सर्वात सुरक्षित AI चॅटबोट, प्रायव्हसीवर असणार फोकस
2

Confer Launch: डेटा लीकची भीती संपली! Signal फाऊंडरने लाँच केला जगातील सर्वात सुरक्षित AI चॅटबोट, प्रायव्हसीवर असणार फोकस

पोस्ट मॅपिंगशिवाय संचमान्यता धोकादायक! पुरोगामी शिक्षक संघटनेचा इशारा
3

पोस्ट मॅपिंगशिवाय संचमान्यता धोकादायक! पुरोगामी शिक्षक संघटनेचा इशारा

Hyundai Union Protest: AI ह्युमनॉइड रोबोट्सला युनियनचा ठाम विरोध; 40,000 कामगारांमध्ये भीतीचे वातावरण
4

Hyundai Union Protest: AI ह्युमनॉइड रोबोट्सला युनियनचा ठाम विरोध; 40,000 कामगारांमध्ये भीतीचे वातावरण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.