
India Post Recruitment (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
India Post Driver Recruitment 2026: सरकारी नोकरी शोधताय का? मग तुमच्यासाठी एक भारी बातमी आहे. भारतीय पोस्ट खात्यात ड्रायव्हर पदांसाठी भरती निघाली आहे. तामिळनाडू सर्कल, चेन्नईच्या मेल मोटर सर्व्हिसमध्ये ही भरती होत आहे. एकूण 24 जागा आहेत, स्टाफ कार ड्रायव्हर पदासाठी. फक्त 10वी पास असाल आणि तुमच्याकडे लायसन्स असेल तर तुम्ही अर्ज करू शकता. अर्ज फक्त स्पीड पोस्टने पाठवायचा आहे आणि शेवटची तारीख आहे 30 नोव्हेंबर 2026 संध्याकाळी 5 वाजेपर्यंत. India Post Recruitment 2026:
यासाठी फार मोठं शिक्षण नकोय. मान्यताप्राप्त बोर्डातून 10वी पास असाल तर बस. तुमच्याकडे वैध LMV किंवा HMV लायसन्स असायला हवं. म्हणजे हलकी किंवा जड गाडी चालवायचा परवाना. कमीत कमी 3 वर्ष गाडी चालवल्याचा अनुभव पण लागेल. गाडीतला छोटा-मोठा बिघाड ओळखता आला पाहिजे आणि दुरुस्त पण करता आला पाहिजे. होमगार्ड किंवा सिव्हिल व्हॉलेंटियर म्हणून 3 वर्ष काम केलं असेल तरी पण तुम्ही अर्ज करू शकता.
एकूण 24 जागा आहेत.
UR आणि EWS वाल्यांसाठी वय 18 ते 27 वर्ष असावं, 30 नोव्हेंबर 2026 ला.
SC/ST वाल्यांना 5 वर्ष सूट आहे, म्हणजे 32 पर्यंत चालेल. OBC वाल्यांना 3 वर्ष सूट, म्हणजे 30 पर्यंत. माजी सैनिक आणि सरकारी कर्मचाऱ्यांना पण नियमानुसार सूट मिळेल. फी फक्त 100 रुपये आहे. पण महिला, SC, ST उमेदवारांना फी माफ आहे, त्यांना पैसे द्यायची गरज नाही. ज्यांना फी भरायची आहे त्यांनी पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन ई-पेमेंट करायचं आहे. चलन फॉर्म भरून संगणकीकृत पोस्ट ऑफिसमध्ये पैसे भरा. E-Biller चं नाव – Senior Manager, MMS Chennai, CPMG Tamil Nadu Circle, E-Biller ID 1000099022 असं टाकायचं आहे. पावतीची मूळ कॉपी अर्जासोबत जोडायची आहे. दुसऱ्या कोणत्याही पद्धतीने पैसे भरले तर चालणार नाही.
नोकरी लागली तर पगार पण चांगला आहे. 7 व्या वेतन आयोगानुसार Level 2 चा पगार मिळेल. 19,900 ते 63,200 रुपये महिना. त्यावर अजून भत्ते वेगळे मिळतील.
लक्षात ठेवा, हाताने किंवा कुरियरने अर्ज चालणार नाही, फक्त स्पीड पोस्टनेच पाठवायचा आहे. उशीर करू नका, 30 तारखेच्या आत पाठवा.
Ans: एकूण 24 स्टाफ कार ड्रायव्हर पदांसाठी भरती होणार आहे.
Ans: उमेदवार मान्यताप्राप्त बोर्डातून किमान दहावी पास असणे आवश्यक आहे.
Ans: 30 नोव्हेंबर 2026 रोजी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत अर्ज पाठवता येईल.