Cyber attack on European Airport
Cyber attack on European Airport : युरोपमधील तीन प्रमुख आंतरराष्ट्रीय विमानतळांवर सायबर अटॅक करण्यात आला. यामध्ये लंडनचे हीथ्रो विमानतळ, जर्मनीचे बर्लिन आणि बेल्जिमयमचे ब्रुसेल्स विमानतळाचा समावेश आहे. यामुळे तिन्ही विमानातळावर चेक-इन आणि बोर्डिंग सिस्टीम विस्कळीत झाली होती. शनिवारी (२० सप्टेंबर) अचानक झालेल्या सायबर ॲटकमुळे अनेक उड्डाणांना उशिर झाला, तसेच काही रद्दही करावी लागली.
मिळालेल्या माहितीनुसार, चेक-इन आणि बोर्डिंग सिस्टीमध्ये अडथळा आल्यामुळे प्रवाशांना मॅन्युओली चेक-इन करावे लागले. यामुळे विमाने वेळेत उड्डाण घेऊ शकली नाहीत. या याबर हल्ल्यामुळे लंडनच्या हीथ्रो विमानतळावर १४० हून अधिक उड्डाणांना उशीर झाला, तर बेल्जियमच्या ब्रुसेल विमानतळावर १०० हून अधिक विमने आणि बर्लिनमधील ६० विमानांच्या उड्डाणांवर परिणाम झाला. बेल्जियमच्या विमानतळ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (१९ सप्टेंबर) रात्री अचानक चेक-इन आणि बोर्डिंग सिस्टीमवर सायबर हल्ला झाला होता.
अमेरिकेतील अणुउर्जा प्रकल्प सुरक्षितपणे आला पाडण्यात; कुलिंग टॉवर क्षणात धुळीस, VIDEO VIRAL
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हॅकर्सने कॉलिन्स एरोस्पेसच्या सिस्टीमन्साना लक्ष्य केले होते. या एरोस्पेसच्या प्रणालीमुळे विमानतळांवर चेक-इन आणि बोर्डिंग सिस्टीम कार्य करते. याच वेळी कॉलिन्स एरोस्पेसच्या कंपनीने सांगितले की, सध्या समस्या सोडवण्यासाठी कार्य सुरु आहे. फ्रॅंकफर्ट आणि झुरिच या विमानतळांवरील सायबर हल्ले रोखण्यात आले परंतु इतर तीन विमानळांवरील हल्ले थांबवण्याचे काम अजूनही सुरु आहे.
A cyberattack on a provider of check-in and boarding systems disrupted operations at several major European airports including London’s Heathrow, the continent’s busiest, causing flight delays and cancelations https://t.co/k67HU1aRcK pic.twitter.com/66Zaalw4yp
— Reuters (@Reuters) September 20, 2025
शुक्रवारी (१९ सप्टेंबर) अमेरिकेच्या डलासमध्ये दोन विमानतळांवर अचानक टेलीकॉम सीस्टीममध्ये तांत्रिक बिघाड झाला होता. यामुळे १८०० हून अधिक उड्डाणांना विलंब झाला. यामुळे अमेरिकेच्या फेडरल एव्हिएशन ॲडमिनिस्ट्रेशन (AFPP) ने ग्रॉऊंड स्टॉप जारी केली. मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिकन एअरलाइन्सला २०० हून अधिक उड्डाणे रद्द करावी लागली, तर ५०० हून अधिक उड्डाणे उशिराने गेली. तर साउथ वेस्ट एअरलाइन्सची १,१०० हून अधिक उड्डाणांना विलंब झाला.
युरोपमधील विमानतळ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या हल्ले थांबवण्याचे आणि सर्व सेवा सुरळित करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. मात्र हल्ला कोणी का केला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पण यामुळे हीथ्रो, बर्लिन आणि ब्रुसेल्स या तिनी विमानतळांवर मोठा गोंधळ उडाला होता.
युरोपमध्ये कोणत्या विमानतळांवर झाला सायबर अटॅक?
युरोपमधील लंडनचे हीथ्रो विमानतळ, जर्मनीचे बर्लिन आणि बेल्जिमयमचे ब्रुसेल्स विमानतळावर सायबर हल्ला करण्यात आला आहे.
सायबर हल्ल्यामुळे किती विमान झाली रद्द?
या विमानतळावरील सायबर हल्ल्यामुळे शेकडो विमाने रद्द झाली, शेकडो उड्डाणांना विलंब झाला.