अमेरिकेतील अणुउर्जा प्रकल्प सुरक्षितपणे आला पाडण्यात; कुलिंग टॉवर क्षणात धुळीस, VIDEO VIRAL (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
America News in Marathi : वॉशिंग्टन : अमेरिकेचा अणु प्रकल्पाचा कुलिंग टॉवर १८ सप्टेंबर रोजी पाडण्यात आला आहे. हा टॉवर अमेरिकेतील टेनेसीच्या हार्ट्सविलेमध्ये होता. याची उंची ५४ फूट होती. हा चॉवर स्फोटाच्या माध्यमातून पाडण्यात आला. यामध्ये ९० पाऊंडहून अधिक वजनाजी स्फोटके वापरण्यात आली होती. केवळ एक बटन दाबून केवळ १० सेंकदात कुलिंग टॉवर पाडण्याची प्रक्रिया पार पडली.
अमेरिकेचा हा टेनेसीच्या हार्ट्सविलेमधील अणु उर्जा प्रकल्प हा १९७० च्या दशकात बांधण्यात आला होता. यामध्ये चार न्यूक्लिर रिएक्टर बसवण्यात येणार होते. पण १९८४ मध्ये मायले आयलंड अपघातानंतर हा प्रकल्प थांबण्याक आला. यामुळे हा प्रकल्प पाडण्यात आला आहे.
हा टॉवर पाडण्यामाचे कारण म्हणजे भौगोलिक दृष्ट्या त्याची उंची अधिक होती, त्याची रचना खूप मोठी होती. तसेच हा प्रकल्प बंद झाला होता. पण याला पाडल्याने भविष्यात त्या जागेचा दुसऱ्या प्रकल्पासाठी किंवा सार्वजिनक कार्यासाठी वापर करता येईल असे अमेरिकन अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या टॉवरला सुरक्षितरित्य पाडण्यात आले आहे. तसेच याच्या कॉंक्रीटचा आणि स्टीलच्या भागांचा पुनर्वापर केला जाणार आहे. सध्या त्या जागेचा कसा उपयोग होईल याची माहिती स्पष्ट करण्यात आलेली नाही. परंतु Tennesse Valley Authority (TVA)याचा भविष्यात आर्थिक विकासाच्या किंवा उर्जेच्या कार्याबाबत वापर करेल असे सांगितले जात आहे.
With the push of a button, the 540’ cooling tower in Hartsville, TN, safely came down this morning. The iconic structure was removed to make the Hartsville site safer and ready for tomorrow’s potential opportunities. ⚡🏗️ pic.twitter.com/srxcuFCTyZ
— Tennessee Valley Authority (@TVAnews) September 18, 2025
सोशल मीडियावर प्रतिक्रिया
सध्या या टॉवर कुलिंगाचा काही सेकंदाच जमिनदोस्त झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. अनेकांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे. सोशल मीडियावर अनेकांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे. एका नेटकऱ्याने हा व्हिडिओ शेअर करत म्हणले आहे की, माझे कुटुंब गेल्या अनेक पिढ्यांपासून TVA मध्ये काम करत आहे. हे दृश्य पाहून मला दु:ख झाले आहे. एकाने हार्ट्सविलेमधील TVA कूलिंह टॉवर काही क्षणात नाहीसा झाला, बूम असे म्हटले आहे. त्याने हा व्हिडिओ आयफोनवरुन काढला असल्याचे म्हटले आहे.