
dassault aviation rafale india deal order backlog production issues
Dassault Aviation Rafale order backlog 2026 : भारतीय हवाई दलाची (Indian Air Force) ताकद वाढवण्यासाठी ११४ बहुउद्देशीय लढाऊ विमानांचा (MRFA) करार जागतिक संरक्षण बाजारात सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. फ्रेंच विमान निर्माता कंपनी डसॉल्ट एव्हिएशन (Dassault Aviation) या वर्षाच्या अखेरीस भारतासोबत या महाकरारावर स्वाक्षरी करण्यासाठी प्रचंड उत्सुक आहे. मात्र, कंपनीसमोर सर्वात मोठे संकट उभे राहिले आहे ते म्हणजे ‘उत्पादन क्षमतेचे’. डसॉल्टकडे सध्या विमानांच्या ऑर्डर्सचा डोंगर साचला असून, त्या वेळेत पूर्ण कशा करायच्या, या चिंतेत कंपनीचे व्यवस्थापन आहे.
डसॉल्टने प्रसिद्ध केलेल्या ताज्या वार्षिक अहवालानुसार, ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत कंपनीकडे २२० राफेल लढाऊ विमानांच्या ऑर्डर्स प्रलंबित (Backlog) आहेत. यापैकी १७५ विमाने ही भारत, इंडोनेशिया आणि मध्यपूर्वेतील देशांना निर्यात करायची आहेत, तर ४५ विमाने फ्रेंच हवाई दलासाठी राखीव आहेत. विशेष म्हणजे, कंपनीकडे एकूण ४६.६ अब्ज युरो (अंदाजे ४.२ लाख कोटी रुपये) किमतीच्या कामाचा बॅकलॉग आहे. उत्पादनाचा वेग मंद असल्याने ही विमाने ग्राहकांना वेळेत मिळतील का, यावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Strait Of Hormuz: ‘होर्मुझ आता इराणच्या बापाचं नाही!’ ट्रम्प यांचा डाव यशस्वी समुद्रात उतरवले नौदल; भारताचा तेल पुरवठा होणार ‘सेफ’
डसॉल्टचे सीईओ एरिक ट्रॅपियर यांनी ४ मार्च रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेत भारतासोबतच्या ११४ विमानांच्या करारावर भाष्य केले. ते म्हणाले, “आम्हाला खात्री करायची आहे की या वर्षी भारतासोबतच्या करारावर स्वाक्षरी होईल. पण हे खरंच शक्य होईल का? हे आपल्याला पुढच्या वर्षीच कळेल.” ट्रॅपियर यांच्या विधानावरून हे स्पष्ट होते की, कंपनी करारासाठी तयार असली तरी अंमलबजावणीसाठी अनेक तांत्रिक आणि प्रशासकीय अडथळे अद्याप कायम आहेत.
भारताने या करारासाठी एक कडक अट घातली आहे. ती म्हणजे ‘५०% स्वदेशी उत्पादन’. भारताला केवळ विमाने विकत घ्यायची नाहीत, तर त्यांचे उत्पादन भारतात व्हावे अशी मागणी आहे. यासाठी डसॉल्टने पाऊल उचलले असून, राफेलच्या फ्यूजलेज विभागासाठी त्यांनी ‘टाटा ॲडव्हान्स्ड सिस्टम्स’शी करार केला आहे. फ्रान्सच्या बाहेर लढाऊ विमानाचे महत्त्वाचे भाग तयार होण्याची ही पहिलीच वेळ असेल. या करारामुळे भारतात ‘फायनल असेंब्ली लाईन’ स्थापन करण्याचा मार्ग मोकळा होणार आहे, ज्यामुळे भारताच्या संरक्षण क्षेत्रात मोठी क्रांती होऊ शकते.
The photo of IAF Rafale BS021 is from the recent Vayu Shakti 2026 exercise—confirmed by multiple aviation trackers, Reddit OSINT threads, and X posts showing it flying with Indian markings. Pakistan claimed this exact tail (along with BS001/022/027) was downed in the May 2025… — Grok (@grok) March 3, 2026
credit – social media and Twitter
डसॉल्टच्या उत्पादन प्रक्रियेत सर्वात मोठा अडथळा फ्रेंच सरकारचा आहे. कंपनीने गेल्या वर्षी केवळ ११ विमाने फ्रेंच हवाई दलाला दिली. बजेटच्या अडचणींमुळे फ्रान्सने उत्पादनाचा दर सध्या खूप कमी ठेवला आहे. ट्रॅपियर यांनी स्पष्ट केले की, “उत्पादन वाढवायचे असेल तर रोख रक्कम (Cash Flow) आवश्यक आहे, जी सध्या मर्यादित आहे.” या वर्षी डसॉल्टने एकूण २८ राफेल विमाने तयार करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे, जे मागील वर्षीच्या तुलनेत केवळ दोनने जास्त आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Doomsday Missile: जगाच्या अंतासाठी एकच मिनिट पुरेसा! अमेरिकेने केली हिरोशिमा अणुबॉम्बपेक्षा 20 पट जास्त घातक क्षेपणास्त्र चाचणी
इतक्या समस्या असूनही डसॉल्टचा महसूल वाढला आहे. कंपनीने या वर्षी €७.४ अब्ज (अंदाजे ६.६ लाख कोटी रुपये) किमतीची विक्री केली आहे, ज्यापैकी €४.६ अब्ज केवळ संरक्षण क्षेत्रातून आले आहेत. संरक्षण क्षेत्रातील महसूल वाढला असला तरी, कंपनीच्या कागदपत्रांवरून स्पष्ट होते की, निर्यात बाजारातून येणाऱ्या ऑर्डर्स पूर्ण करण्यासाठी कंपनीवर प्रचंड दबाव आहे.
भारतासाठी हा करार केवळ संरक्षणच नव्हे तर ‘आत्मनिर्भर भारत’ अभियानासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. आता फ्रेंच सरकार या कराराला कधी गती देते, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.
Ans: भारताने किमान ५०% स्वदेशी उत्पादन आणि 'मेक इन इंडिया' अंतर्गत तंत्रज्ञान हस्तांतरणाची मुख्य अट ठेवली आहे.
Ans: कंपनीकडे २२० विमानांच्या ऑर्डर्स प्रलंबित आहेत आणि बजेटच्या कमतरतेमुळे उत्पादनाचा वेग वाढवता येत नाहीये, ही सर्वात मोठी समस्या आहे.
Ans: डसॉल्टने यासाठी टाटा ॲडव्हान्स्ड सिस्टम्स सोबत करार केला असून, राफेलचे फ्यूजलेज आणि इतर भाग भारतात तयार केले जातील.