Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 25 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

जेन-झी पुन्हा रस्त्यावर; सरकारविरोधात आवाज उठवत केली पंतप्रधानांच्या राजीनाम्याची मागणी

सरकार स्थापनेपूर्वी ज्या जेन-झी पिढीचा बालेन शाह यांना पाठिंबा होता, तीच तरुणाई आता त्यांच्या विरोधात आंदोलन करत आहे. भारतासोबतच्या सीमा वादावरूनही शाह यांना सातत्याने टीकेला सामोरे जावे लागले.

  • By कृपादान आवळे
Updated On: Aug 27, 2026 | 07:53 AM
जेन-झी पुन्हा रस्त्यावर; सरकारविरोधात आवाज उठवत केली पंतप्रधानांच्या राजीनाम्याची मागणी

जेन-झी पुन्हा रस्त्यावर; सरकारविरोधात आवाज उठवत केली पंतप्रधानांच्या राजीनाम्याची मागणी

Follow Us
Follow Us:

काठमांडू : नेपाळमध्ये बालेन शाह यांचे सरकार सत्तेत आणण्यासाठी ज्यांनी पुढाकार घेतला तीच जेन-झी पिढी आता सरकारविरोधात रस्त्यावर उतरली आहे. नव्या सरकारला अद्याप १५० दिवसही पूर्ण झालेले नसताना बालेन शाह यांना जनतेचा रोष, संसदेचा दबाव आणि पक्षातील नाराजीचा सामना करावा लागत आहे. बालेन शाह पंतप्रधान झाल्यानंतर अवघ्या दोन महिन्यांतच युवा आंदोलकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत काठमांडूतील मैतीघर मंडला येथे पुन्हा आंदोलन केले.

नेपाळमध्ये विरोधी पक्षाचे खासदारही बालेन शाह यांना घेरताना दिसत आहेत. संसदेत त्यांच्या वारंवार अनुपस्थितीवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. सभापती डोल प्रसाद अर्याल यांनी २६ ऑगस्ट रोजी शाह यांना संसदेत उपस्थित राहून खासदारांच्या प्रश्नांना उत्तरे देण्याचे निर्देश दिले आहेत. आतापर्यंत झालेल्या ३९ बैठकींपैकी बालेन शाह केवळ ५ बैठकांना उपस्थित राहिले आहेत. बालेन शाह यांनी २७ मार्च रोजी नेपाळच्या पंतप्रधानपदाची शपथ घेतली होती. मात्र, त्यांच्या आतापर्यंतच्या निर्णयांमुळे जनता पुन्हा एकदा रस्त्यावर उतरली आहे.

Nepal Flood Tragedy : भोटेकोशी नदीच्या रौद्ररुपाने नेपाळ हादरले; 400 पर्यटक बेपत्ता, 60 घरे अन् 300 वाहने गेली वाहून

सरकार स्थापनेपूर्वी ज्या जेन-झी पिढीचा बालेन शाह यांना पाठिंबा होता, तीच तरुणाई आता त्यांच्या विरोधात आंदोलन करत आहे. भारतासोबतच्या सीमा वादावरूनही शाह यांना सातत्याने टीकेला सामोरे जावे लागले. भारतीय हद्दीत नेपाळकडून झालेल्या अतिक्रमणासंदर्भातील त्यांच्या वक्तव्यामुळे विरोधक नाराज झाले.

भारतीय सैन्यात नेपाळी भरतीची मागणी

पोखरा येथे माजी गोरखा सैनिकांनी ‘अग्निपथ’ योजनेअंतर्गत भारतीय सैन्यात नेपाळी नागरिकांची रखडलेली भरती पुन्हा सुरू करण्याची मागणी कायम ठेवली आहे. या मुद्द्यांमुळे निर्माण झालेला तणाव आता आरएसपीमध्येही (राष्ट्रीय स्वतंत्र पक्ष) पोहोचला आहे. खासदार आणि वरिष्ठ नेत्यांनी पक्षाच्या संघटनात्मक रचनेपासून शाह यांचे वाढते अंतर आणि त्यांच्या एकतर्फी कामकाजाच्या पद्धतीवर प्रश्न उपस्थित केले आहेत.

नेपाळमध्ये मोठा जलप्रलय

दुसरीकडे, तिबेट सीमेजवळील नेपाळच्या रसुवा जिल्ह्यात बुधवारी सकाळी भोटेकोशी नदीला अचानक आलेल्या महापुरामुळे मोठी हानी झाली. या महापुराच्या तडाख्यात अनेक गावे आणि विविध प्रकल्पस्थळे वाहून गेल्याचे वृत्त असून, सुमारे १००० जण वाहून गेल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मात्र, या आकडेवारीला अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. या जलप्रलयात १३३ भारतीय पर्यटक बेपत्ता झाल्याचे वृत्त आहे.

Web Title: Demand for the resignation of nepals prime minister balen shah

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 27, 2026 | 07:53 AM

Topics:  

  • Balen Shah
  • Gen Z
  • international news

संबंधित बातम्या

Philippines Plane Crash: हवेतच झाला चक्काचूर! फिलीपिन्समध्ये 2 लष्करी प्रशिक्षण विमानांची एकमेकांना टक्कर; 4 वैमानिकांचा मृत्यू
1

Philippines Plane Crash: हवेतच झाला चक्काचूर! फिलीपिन्समध्ये 2 लष्करी प्रशिक्षण विमानांची एकमेकांना टक्कर; 4 वैमानिकांचा मृत्यू

Khashaba Jadhav Book : ऑलिम्पिकवीर खाशाबांच्या चरित्रातून मल्लांना प्रेरणा; संजय दुधाणे यांचे प्रतिपादन
2

Khashaba Jadhav Book : ऑलिम्पिकवीर खाशाबांच्या चरित्रातून मल्लांना प्रेरणा; संजय दुधाणे यांचे प्रतिपादन

Chernobyl : माणूस गेला अन् घोडे जगले! चेर्नोबिलच्या रेडिएशन क्षेत्रात 31 घोड्यांचा झाला भयानक प्रयोग; आजचे वास्तव काय?
3

Chernobyl : माणूस गेला अन् घोडे जगले! चेर्नोबिलच्या रेडिएशन क्षेत्रात 31 घोड्यांचा झाला भयानक प्रयोग; आजचे वास्तव काय?

तिबेटमध्ये महाविनाश! ७.० रिश्टर तीव्रतेच्या भूकंपाने हादरली धरणी; रात्रीच्या वेळेत ३०० घरे उद्ध्वस्त, १६ ठार तर ३२ जखमी
4

तिबेटमध्ये महाविनाश! ७.० रिश्टर तीव्रतेच्या भूकंपाने हादरली धरणी; रात्रीच्या वेळेत ३०० घरे उद्ध्वस्त, १६ ठार तर ३२ जखमी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.