Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मध्य पूर्वेत विनाशाचे चिन्ह? इराणने वाढवला युरेनियमचा साठा; संयुक्त राष्ट्रांच्या अणुउर्जा संस्थेचा दावा

संयुक्त राष्ट्रांच्या अणुउर्जा देखरेखीखालील आंतरराष्ट्रीय अणुउर्जा संस्था (IAEA)ने इराणने युरेनियमचा साठा वाढवला असल्याचा दावा केला आहे. इराण अण्वस्त्रे बनवण्यासाठी हा साठा वाढवत आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jun 01, 2025 | 03:21 PM
Destruction in Middle East Iran has increased its uranium stockpile, claim by Atomic Energy Agency

Destruction in Middle East Iran has increased its uranium stockpile, claim by Atomic Energy Agency

Follow Us
Close
Follow Us:

तेहरान: संयुक्त राष्ट्रांच्या अणुउर्जा देखरेखीखालील आंतरराष्ट्रीय अणुउर्जा संस्था (IAEA)ने इराणने युरेनियमचा साठा वाढवला असल्याचा दावा केला आहे. इराण अण्वस्त्रे बनवण्यासाठी हा साठा वाढवत आहे. तसेच इराण अण्वस्त्रे बनवण्याच्या अगदी जवळ पोहोचला आहे. या आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी (IAEA)च्या अहवालानुसार, इराणने युरेनियमचा ६०% शुद्ध साठा वाढवला आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

या आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी (IAEA)ने इराणला युरेनियमचा साठा न वाढवण्याचे आणि त्यांच्या अण्वस्त्र बनवण्याच्या धोरणात बदल करण्याचे आवाहन केले आहे. सध्या अमेरिका इराणसोबत अणुकरार चर्चा करण्याच्या प्रयत्नात आहे. याचदरम्यान हा धक्कादायक अहवाल समोर आला आहे. अमेरिका आणि इराणमध्ये ओमानच्या मध्यस्थीने चर्चा सुरु आहे, परंतु अद्याप कोणताही ठोस करार झालेला नाही.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- शेख हसीनांवर ‘मानवतेविरुद्धच्या’ गुन्ह्याखाली आरोपपत्र दाखल; बांगलादेशी न्यायालयात आज होणार सुनावणी

इस्रायल इराणवर हल्ला करण्याच्या तयारीत

याच दरम्यान इस्रायलने IAEAच्या अहवालातून इराण अण्वस्त्रे बनवण्यास पूर्णपणे तयार असल्याचे दिसत आहे, असे म्हटले आहे. इस्रायलने आंतरराष्ट्रीय समुदायाला इराणचे प्रयत्न थांबवण्याचे आवाहन केले आहे.

इस्रायल इराणवर हल्ला करण्याच्या तयारीत आहे. यासाठी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या अध्यक्षतेखाली एक योजना आखण्यात आली आहे. परंतु डोनाल्ड ट्रम्प नेतन्याहूंना इराणवर हल्ला करण्यापासून रोखत असल्याचे म्हटले जात आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांच्या मते, इराणच्या अणु कार्यक्रमावर राजनैतिक मार्गातून तोडगा निघू शकतो, परंतु इस्रायलला अमेरिका आणि इराणमध्ये चांगले संबंध नको आहेत. यामुळे इस्रायल इराणवर हल्ला करण्यासाठी ट्रम्प यांच्या इशाऱ्याची वाट पाहत आहेत.

युरेनियमच्या साठ्यात वाढ

आंतरराष्ट्रीय अणु एजन्सीच्या अहवालानुसार, १७ मे पर्यंत इराणने युरेनियमच्या साठ्यात ६०% शुद्धतेत वाढ केली आहे. फेब्रुवारीच्या तुलनेत हे प्रमाण अधिक असल्याचे अहवालात म्हटले आहे. युरेनियमचे अधिक शुद्धीकरण शस्त्रे बनवण्यासाठी योग्य आहे. या साठ्याची पातळी शस्त्रास्त्र-श्रेणीच्या ९०% शुद्धते एवढी आहे.

इराण अणु शस्त्रे बनवण्याच्या केवळ एक पाऊ मागे असल्याचे अहवालात म्हटले आहे. इराणने सुमारे ४२ किलो युरेनियमचे शुद्धीकरणे केले तर, त्यापासून अणुबॉम्ब बनवता येतील असे संयुक्त राष्ट्रांच्या आयएआएने म्हटले आहे. सध्या इराणकडे एकूण ९२७४.६ किलोग्रॅम युरेनियमचा समृद्ध साठा आहे.

इराणची प्रतिक्रिया

इराणच्या म्हणण्यानुसार, त्यांचा अणु कार्यक्रम अण्वस्त्रे तयार करण्यासाठी नव्हे, तर वीज निर्मितीसाठी तसेच औषध निर्मितीसाठी शांततापूर्ण हेतूने तयार केला जात आहे. इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाने आणि अणुउर्जा संघटनेने संयुक्त राष्ट्राच्या IEAE चा अहवाल चुकीचा आमि पक्षपाती असल्याचा दावा केला आहे. हा अहवाल राजकीय दबावाखाली तयार करण्यात आला असल्याचे इराणने म्हटले आहे.

 

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- कोण असेल NASAचा नवीन प्रमुख? ट्रम्प यांनी मस्कच्या जवळचे सहकारी आयझॅकमन यांना नेतृत्त्वातून हटवले

Web Title: Destruction in middle east iran has increased its uranium stockpile claim by atomic energy agency

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 01, 2025 | 03:21 PM

Topics:  

  • iran
  • Israel
  • World news

संबंधित बातम्या

ब्रिटनचे पंतप्रधान भारत दौऱ्यावर येणार; दोन्ही देशांच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान संबंधांना मिळणार नवी दिशा
1

ब्रिटनचे पंतप्रधान भारत दौऱ्यावर येणार; दोन्ही देशांच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान संबंधांना मिळणार नवी दिशा

नेपाळमध्ये मुसळधार पावसाचा इशारा जारी; भूस्खलनाच्या भीतीने काठमांडूत वाहतूकीवर बंदी
2

नेपाळमध्ये मुसळधार पावसाचा इशारा जारी; भूस्खलनाच्या भीतीने काठमांडूत वाहतूकीवर बंदी

Russia Ukraine War: महाभयंकर! रशियाने रेल्वे,बस काहीच सोडले नाही! Air Strike करत थेट…; 30 जखमी
3

Russia Ukraine War: महाभयंकर! रशियाने रेल्वे,बस काहीच सोडले नाही! Air Strike करत थेट…; 30 जखमी

ट्रम्पच्या शांतता योजनेवर फिरले पाणी; इस्रायलचा गाझावर जोरदार हवाई हल्ला, ६ जण ठार
4

ट्रम्पच्या शांतता योजनेवर फिरले पाणी; इस्रायलचा गाझावर जोरदार हवाई हल्ला, ६ जण ठार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.