शेख हसीनांवर 'मानवतेविरुद्धच्या' गुन्ह्याखाली आरोपपत्र दाखल; बांगलादेशी न्यायालयात आज होणार सुनावणी (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
ढाका: बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या विरोधात मोहम्मद युनूस सरकारने आरोपपत्र दाखल केले आहे. आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरण (ICT) मध्ये आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. गेल्या वर्षा जुलै 2024 मध्ये विद्यार्थी आंदोलनांदरम्यान शेख हसीना यांच्यावर मानवतेविरूद्धच्या गुन्ह्यांचा आरोप करण्यात आला आहे. तसेच माजी गृहमंत्री असदुज्जमान खान कमाल आणि माजी आयजीपी चौधरी मामुन हे या प्रकरणात सह-आरोपी आहेत
या खटल्याचे बांगदलादेश टेलिव्हिजनवर थेट प्रक्षेपण केले जात आहे. दाखल करण्यात आलेल्या आरोपांमध्ये जुलै आणि ऑगस्टमध्ये बांगलादेशात झालेल्या सामुहिक हत्याकांडात हसीना यांना प्रमुख आरोपी ठरवण्यात आले आहे. रविवारी ( १ जून) खटला दाखल करताना मुख्य सरकारी वकिल मोहम्मद ताजुल इस्लाम आणि इतर वकिलांनी उपस्थिती दर्शवली. काही आठवड्यांपूर्वी, न्यायालयात तपासकर्त्यांनी एक अहवाल सादर केला होता. या अहवालात शेख हसीना यांनी हत्यांचे आदेश दिले होते अशी माहिती सादर करण्यात आली होती.
आयसीटीचे प्रमुख अभियोक्ता आणि मुख्य सराकारी वकिल ताजुल इस्लाम यांनी १२ मे, हसीना यांच्यावर किमान पाच आरोप असल्याचे सांगितले. यामध्ये जुलै २०२४ मध्ये झालेल्या निदर्शनांदरम्यान घडलेल्या सामूहिक हत्या रोखण्यात आलेले अपयश, चिथावणी, सहभाग आणि कट यांचा समावेश आहे.
याअतंर्गत चौकशीचा भाग म्हणून व्हिडिओ, फूटेज, ऑडिओ क्लिप्स, हसीना यांचे फोन कॉल्स, हेलिकॉप्टर आणि ड्रोन हालचालींचे रेकॉर्ड, तसेच पीडितांचे गवाही पूरव्यात सादर करण्यात आली आहेत. दरम्यान शेख हसीना यांनी हे आरोप फेटाळून लावले आहे. त्यांनी हे आरोप राजकीयदृष्ट्या प्रेरित असल्याचे म्हटले आहे.
आयसीटीने २५ मे रोजी मागील सरकाशी संबंधित पहिला खटला सुरु केला. यामध्ये ५ ऑगस्ट रोजी आंदोलनात सहा लोकांना ठार करण्यात आले होते. याविरोधात आठ अधिकाऱ्यांवर मानतेविरुद्धच्या गुन्ह्यांचा आरोप आहे. सध्या चार अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. तर इतर चार जणांच्या अनुपस्थितीत खटला सुरु आहे.
१९७१ मध्ये बांगलादेशच्या स्वातंत्र्ययुद्धादरम्यान पाकिस्तानी सैन्याने केलेल्या गुन्ह्यांच्या चौकशीसाठी शेख हसीना यांनी आयसीटीची स्थापना केली होती. २००९ मध्ये आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरण (ICT) ची स्थापना करण्यात आली होती.
गेल्या काही काळात बांगलादेशात अशांतता पसरलेली आहे. गेल्या वर्षी जुलै 2024 मध्ये विद्यार्थ्यांनी कोटाविरोधी आंदोलन सुरु केले होते. या आंदोलनानंतर शेख हसीना यांच्या सराकरचे सत्तापालट झाले. यानंतर देशात अनेक घटना घडून आल्या.