कोण असेल NASAचा नवीन प्रमुख? ट्रम्प यांनी मस्कच्या जवळचे सहकारी आयझॅकमन यांना हटवले (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
वॉशिंग्टन: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नॅशनल एरोनॉटिक्स ॲंड स्पेस ॲडमनिस्ट्रेशन (NASA) च्या नेतृत्वासाठी नवीन उमेदवाराची लवकरच नवनी उमेदवाराची घोषण करतील. तसेच यासाठी एलॉन मस्क यांचे जवळचे सहकारी जेरेड आयझॅकमन यांना नासाच्या प्रमुखपदी निवडण्यात येणार होते. परंतु त्यांचे नाव मागे घेण्यात आले आहे. सोशल मीडियाद्वारे ट्रम्प यांनी ही माहिती दिली. याबाबत अद्याप कोणतेही अधिकृत कारण देण्यात आलेले नाही. पण सिनेटमध्ये आयझॅकमन यांचे नामांकन मत होण्यापुर्वी करण्यात आले होते.
ट्रम्प यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉटर्म ट्रुथवर पोस्ट करत याची माहिती दिली. त्यांनी म्हटले की, “मी मागील संबंधांचा सखोल आढावा घेतला आहे, यानतर मी नासाच्या प्रमुखपदासाठी जेरेड आयझॅकमन यांचे नाव मागे घेत आहे.” मी लकरच एक नवीन उमेदवाराची घोषणा करेन, नवीन उमेदवार हा अमेरिका फर्स्ट धोरणाशी संबंधित असेल, जो अमेरिकेला अंतराळ क्षेत्रात पुढे नेईल.
ट्रम्प यांनी डिसेंबर 2024 मध्ये जेरेड आयझॅकमन यांनी अंतराळ संस्थेचे पुढील प्रशासक म्हणून निवड केली होती. जेरेड आयझ2कमन हे मस्क यांचे जवळचे सहकारी मानले जातात. सिनेटच्या वाणिज्य, विज्ञान आणि वाहतूक समितीने एप्रिलमध्ये जेरेड आयझॅकमन यांच्या नामांकनाला मान्यता दिली होती. त्यानंतर लवकरच मतदान होणार होते. त्यांच्या नामांकनावर नासाच्या अंतराळ समुदायाने आश्चर्य व्यक्त केले होते.
ट्रम्प यांच्या या निर्णयानंतर एलॉन मस्क यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ट्रम्प यांच्या या घोषनेनंतर मस्क यांनी इस्टाग्रामवर पोस्ट करत आपले दु:ख व्यक्त केले. त्यांनी म्हटले की, “इतका सक्षम आणि चांगल्या मनाचा माणूस मिळणे कठीण आहे.”
सेमाफोर वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, एलॉन मस्क यांच्या प्रशासनातून बाहेर पडल्यानंतर आयझॅकमननच्या समर्थकांमध्ये त्यांचे नामांकन धोक्यात आल्याची भीती होती. यामागे व्हाईट हाऊस योजना आखत असल्याचे समोर आले होती.
राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि उद्योगपती मस्क यांच्यात गेल्या काही काळापासूनतणावाटे वातावरण आहे.ट्रम्प प्रशासनापासून दूर ठेवण्याचा निर्णय मस्क यांनी घेतला आहे. अलीकडेच त्यांनी सरकारी कार्यक्षमता विभाग (DOGE)च्या प्रमुख पदाचा राजीनामा दिला आहे. सरकारचा खर्च कमी करण्यासाठी ट्रम्प यांनी DOGE च्या प्रमुखुदी मस्क यांची निवज केली होती.
दरम्यान मस्क यांनी ट्रम्प यांच्या बिग ब्यूटीफूल या विधेयकावर टीका केली होती.यामुळे ट्रम्प नाराज असल्याचे मानले जात आहे. या टीकेनंतरच मस्क यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता.