Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

व्हाईट हाऊसमध्ये ट्रम्प आणि जो बायडेन यांची भेट; दोन्ही नेत्यांमध्ये शांततेत सत्ता हस्तांतरणाचे आश्वासन

अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन आणि डोनाल्ड ट्र्म्प यांची आज व्हाईटहाऊसमध्ये भेट झाली. यावेळी 2024 च्या राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत डोनाल्ड ट्र्म्प यांचा विजय झाला. या विजयाबद्दल बायडेन यांनी ट्रम्प यांचे औपचारिक अभिनंदन केले.

  • By स्वराली शहा
Updated On: Nov 14, 2024 | 12:21 PM
व्हाईट हाऊसमध्ये ट्रम्प आणि जो बायडेन यांची भेट; दोन्ही नेत्यांमध्ये शांततेत सत्ता हस्तांतरणाचे आश्वासन
Follow Us
Close
Follow Us:

वॉश्गिंटन: अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन आणि डोनाल्ड ट्र्म्प यांची आज व्हाईटहाऊसमध्ये भेट झाली. यावेळी 2024 च्या राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत डोनाल्ड ट्र्म्प यांचा विजय झाला. या विजयाबद्दल बायडेन यांनी ट्रम्प यांचे औपचारिक अभिनंदन केले. विषेश म्हणजे डोनाल्ड ट्रम्प चार वर्षानंकर पुन्हा व्हाईट हाऊसमध्ये परतले. दोन्ही नेत्यांनी ओव्हल ऑफिसमध्ये प्रमाने भेट देभन हस्तांदोलन केले. दोन्ही नेत्यांनी एकमेकांसोबत संवाद साधला. 20 जानेवारी रोजी दोन्ही नेत्यांनी शांततेत सत्ता हस्तांतरणचे आश्वासन दिले.

शांततापूर्वक सत्ता हस्तांतरणाचे आश्वासन

या बैठकीत बायडेन यांनी ट्रम्प 20 जानेवारी रोजी शांततेत सत्ता हस्तांतरणासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. बायडेन यांनी म्हटले की,“तुमच्या सुविधा आणि आरामासाठी आमची टीम सर्वतोपरी प्रयत्न करेल.” यावर उत्तर देताना ट्रम्प म्हणाले की, “राजकारण कठीण आहे; हे जग नेहमीच आदर्श नसते. पण आजचा दिवस चांगला आहे.” ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसचे चीफ ऑफ स्टाफ जेफ झिएंट्स आणि नव्या चीफ ऑफ स्टाफ सुझी यांचेही कौतुक केले.

हे देखील वाचा- ब्राझीलच्या सर्वोच्च न्यायालयाबाहेर आत्मघाती हल्ला; स्फोटकांसह अज्ञात व्यक्तीचा न्यायालयात घुसण्याचा प्रयत्न

गेल्या काही टर्ममध्ये ट्रम्प यांनी बायडेन यांना भेट देण्यास नकार दिला होता

ही भेट शांततापूर्ण सत्ता हस्तांतरणाची परंपरा पुढे नेत आहे. मात्र मागील टर्ममध्ये ट्रम्प यांनी बायडेन यांना अशाच पारंपारिक बैठकीत भेट देण्यास नकार दिला होता. त्यामुळे यावेळी त्यांची भेट विशेष महत्त्वाची मानली जात आहे. व्हाईट हाऊसच्या ऐतिहासिक फायरप्लेससमोर पिवळ्या खुर्च्यांवर बसलेल्या दोन्ही नेत्यांनी एकमेकांच्या भावना आदरपूर्वक स्वीकारल्या आणि पुढील वर्षी 20 जानेवारी रोजी सत्तेचे शांततापूर्ण हस्तांतरण करण्याची इच्छा व्यक्त केली.

#WATCH | Washington, DC, USA: President Joe Biden and President-elect Donald Trump meet at the White House after US presidential polls (Source: US Network Pool/Reuters) pic.twitter.com/c16I3lSohB — ANI (@ANI) November 13, 2024


अमेरिकेच्या नव्या अध्यायाची सुरूवात

या बैठकीला अमेरिकेतील राजकीय परंपरेत विशेष स्थान दिले जात आहे, कारण एका नव्या अध्यायाची सुरुवात म्हणून हे सत्ता हस्तांतरण पाहिले जाते. दोन्ही नेत्यांनी भविष्यकाळातील सहकार्याबाबत सकारात्मक संकेत दिले. यामुळे अमेरिकी राजकारणातील तणाव निवळण्याची शक्यता आहे.

ट्रम्प प्रशासन

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांनी विजय मिळवला आहे. आता अमेरिकेचे नवचर्चित राष्ट्राध्यक्ष ट्रम्प आपल्या प्रशासनासाठी नवीन टीम बांधण्यात व्यस्त आहे. ट्रम्प यांनी आपल्या नवीन प्रशासनात इमिग्रेशन धोरणाचे उपप्रमुख म्हणून स्टीफन मिलर यांची निवड करण्यात आली आहे. तर ट्रम्प यांनी माईक वॉल्ट्झ यांची राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) म्हणून नियुक्ती केली आहे. दुसरीकडे टॉम होमन यांना “बॉर्डर झार” म्हणून नियुक्त केले आहे. याशिवाय ही अनेक पदाच्या नियुक्त्या त्यांनी केल्या आहेत.

हे देखील वाचा- Israel-Hamas War: इस्त्रायलचे गाझावर विनाशकारी हल्ले; 24 तासांत 46 जणांचा मृत्यू

Web Title: Donald trump and joe biden visit at the white house

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 14, 2024 | 12:20 PM

Topics:  

  • Donald Trump
  • Joe Biden
  • US
  • US President

संबंधित बातम्या

Trump Threatens Iran: अमेरिका हल्ला करण्यास तयार! ट्रम्प यांची ‘ती’ पोस्ट आणि इराणमधील झाला आंदोलनाचा भडका
1

Trump Threatens Iran: अमेरिका हल्ला करण्यास तयार! ट्रम्प यांची ‘ती’ पोस्ट आणि इराणमधील झाला आंदोलनाचा भडका

Trump Travel Ban : जशास तसे उत्तर! अमेरिकेच्या ‘ट्रॅव्हल बॅन’ला भीक न घालता ‘या’ दोन देशांनीही घातली US citizensवर बंदी
2

Trump Travel Ban : जशास तसे उत्तर! अमेरिकेच्या ‘ट्रॅव्हल बॅन’ला भीक न घालता ‘या’ दोन देशांनीही घातली US citizensवर बंदी

नवीन वर्षाच्या सुरुवातीला अमेरिकेत लोकशाहीचा विजय; ट्रम्प यांनी नॅशनल गार्ड तैनाती हटवली
3

नवीन वर्षाच्या सुरुवातीला अमेरिकेत लोकशाहीचा विजय; ट्रम्प यांनी नॅशनल गार्ड तैनाती हटवली

ट्रम्पनंतर चीन बनला पाकिस्तानचा पाठीराखा; भारत-पाक संघर्ष थांबवल्याचा केला दावा, सत्य काय?
4

ट्रम्पनंतर चीन बनला पाकिस्तानचा पाठीराखा; भारत-पाक संघर्ष थांबवल्याचा केला दावा, सत्य काय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.