Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Trump and Modi : डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा मोदींना म्हटले मित्र; पंतप्रधानांनीही दिले सकारात्मक उत्तर

Donald Trump and Narendra Modi : भारत आणि अमेरिका संबंधातील तणाव कमी होताना दिसत आहे. दोन्ही देशाच्या राष्ट्रप्रमुखांनी एकमेकांशी चर्चा करण्यास आणि व्यापारातील अडथले दूर करण्यास संवाद सुरु असल्याचे म्हटले आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Sep 10, 2025 | 12:07 PM
Donald Trump and Narendra Modi Friend Remarks between India and US

Donald Trump and Narendra Modi Friend Remarks between India and US

Follow Us
Close
Follow Us:
  • डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा मोदींना चांगले मित्र म्हटले
  • पंतप्रधान मोदींनी देखील दिले सकारात्मक उत्तर
  • दोन्ही देशात व्यापारीतल अडथळे दूर करण्यावर चर्चा सुरु

India US relations : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) आपला चांगला मित्र म्हणून संबोधले आहे. तसेच पंतप्रधान मोदींनी देखील यावर सकारात्मक उत्तर देत भारत आणि अमेरिका दोन्ही देशांची मैत्री चांगली असल्याचे म्हटले आहे. रशियाकडून तेल खरेदीच्या कारणावरुन दोन्ही देशात तणाव सुरु असताना दोन्ही नेत्यांनी हे विधान केले आहे. यामुळे भारत आणि अमेरिकेमध्ये पुन्हा एकदा मैत्री होताना दिसत आहे.

काय म्हणाले ट्रम्प? 

डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्रुथवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी ते पुन्हा संवाद साधणार असल्याचे म्हटले आहे. तसेच ट्रम्प यांनी भारत आणि अमेरिकेतील व्यापार अथडळ्यांवर चर्चा सुरु असल्याचे म्हटले आहे.

ट्रम्प यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, “मला हे कळवण्यास आनंद होत आहे की, भारत आणि अमेरिका व्यापारातील अडथळे दूर करण्यावर चर्चा करत आहे. येत्या काळात मी पंतप्रधान मोदींशी चर्चा करण्यास खूप उत्सुक आहे. मला विश्वास आहे की, भारत आणि अमेरिकेमध्ये सकाराम्तक निष्कर्षांपर्यंत पोहोचण्यात अडथळे येणार नाही.” ट्रम्प यांचे हे विधान अशा वेळी आहे जेव्हा अमेरिकेने रशियाकडून तेल खरेदी करण्यावर ५०% कर लागू केला आहे.

Explainer: डोनाल्ड ट्रम्प आणि PM मोदींमध्ये पुन्हा होणार का मैत्री? टॅरिफचे काय होणार, फोन कॉल करणार…

काय म्हणाले पंतप्रधान मोदी? 

दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टवर उत्तर दिले आहे. पतंप्रधान मोदींनी भारत आणि अमेरिका केवळ चांगले मित्र नसून उत्तम भागीदारीक देश असल्याचे म्हटले आहे.

पंतप्रधान मोदींनी सोशल मीडियावरील आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, “भारत आणि अमेरिका हे जवळचे मित्र आहेत आणि नैसर्गिक भागीदार आहेत. मला विश्वास आहे की, दोन्ही देशातील व्यापार चर्चेमुळे भारत आणि अमेरिका भागीदारीचा अमर्याद शक्यतांचा मार्ग मोकळ होईल. दोन्ही देशांची टीम शक्य तितक्या लवकर चर्चा करण्यासाठी काम करत आहे. मी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्याशी चर्चा करण्यास उत्सुक आहे. आम्ही दोन्ही देशांच्या उज्जव आणि समृद्ध भविष्यासाठी एकत्र काम करु”

India and the US are close friends and natural partners. I am confident that our trade negotiations will pave the way for unlocking the limitless potential of the India-US partnership. Our teams are working to conclude these discussions at the earliest. I am also looking forward… pic.twitter.com/3K9hlJxWcl — Narendra Modi (@narendramodi) September 10, 2025

यापूर्वी देखील केले होते सकारात्मक विधान

यापूर्वी शनिवारी ०६ सप्टेंबर रोजी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारत अमेरिका संबंधावर भाष्य केले होते. त्यांनी दोन्ही देशांतील संबंध महत्त्वपूर्ण असल्याचे म्हटले होते. त्यांनी म्हटले होते की, मी नेहमीच पंतप्रधान मोदींचा मित्र राहीन. भारतासोबतच संबंध पुन्हा रीसेट करण्यास मी तयार आहे.” पण ट्रम्प यांनी रशियाकडून तेल खरेदीवरुन अजूनही भारतावर नाराज असल्याचे म्हटले आहे. त्यांनी म्हटले आहे की, भारताचे पंतप्रधान मोदींचे काही निर्णय त्यांना पटलेले नाही.

FAQs (संबंधित प्रश्न)

भारत अमेरिकेत का आहे तणाव? 

रशियाकडून तेल व्यापार खरेदीच्या कारणावरुन डोनाल्ड ट्रम्प भारतावर नाराजा आहे, यामुळे गेल्या काही काळात अमेरिका आणि भारतामध्ये व्यापार तणाव आहे. ट्रम्प यांच्या मते, भारत रशियाला युक्रेनविरुद्ध आर्थिक मदत करत आहे.

ट्रम्प यांनी भारतावर काय म्हटले? 

डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आणि अमेरिकेत व्यापारातील अडथळे दूर करण्यासाची चर्चा सुरु असल्याचे म्हटले. तसेच पंतप्रधान नेरंद्र मोदींना चांगले मित्र संबोधत त्यांच्या बोलण्यास उत्सुक असल्याचेही म्हटले.

पंतप्रधान मोदींनी काय दिले उत्तर? 

याच वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील सकारात्मक उत्तर देत भारत अमेरिका केवळ मित्र देश नसून नैसर्गिक भागीदार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच त्यांनी देखील ट्रम्प यांच्याशी चर्चा करण्यास उत्सुकता दर्शवली.

ट्रम्पचा संदेश, मोदींचे सकारात्मक उत्तर… भारत आणि अमेरिका व्यापारातील मतभेद संपणार का? जाणून घ्या काय सांगतात तज्ज्ञ

Web Title: Donald trump and narendra modi friend remarks between india and us

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 10, 2025 | 12:03 PM

Topics:  

  • Donald Trump
  • narendra modi
  • World news

संबंधित बातम्या

Explainer: दोन महासत्तांमध्ये १०० मिनिटांची “भव्य बैठक”, ट्रम्प यांनी शी जिनपिंग यांच्याबरोबर कोणते करार? वाचा सविस्तर
1

Explainer: दोन महासत्तांमध्ये १०० मिनिटांची “भव्य बैठक”, ट्रम्प यांनी शी जिनपिंग यांच्याबरोबर कोणते करार? वाचा सविस्तर

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केले पंतप्रधान मोदींचे कौतुक; कारण काय तर…
2

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केले पंतप्रधान मोदींचे कौतुक; कारण काय तर…

6 वर्षांनी जिनपिंगला भेटले ट्रम्प, केली मोठी घोषणा; अमेरिका-चीनमधील टॅरिफचा प्रश्न सुटला?
3

6 वर्षांनी जिनपिंगला भेटले ट्रम्प, केली मोठी घोषणा; अमेरिका-चीनमधील टॅरिफचा प्रश्न सुटला?

बापरे! Gaza मध्ये मृतदेहांचा खच! Israel चा हमासवर विनाशकारी हल्ला; 46 मुलांसह…
4

बापरे! Gaza मध्ये मृतदेहांचा खच! Israel चा हमासवर विनाशकारी हल्ला; 46 मुलांसह…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.