Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nidal Malik Hasan: ‘अल्लाहू अकबर’ म्हणत 13 जणांची हत्या, 30 हून अधिक जखमी; ट्रम्प यांची निदाल हसनच्या फाशीला मंजुरी

Nidal Malik Hasan: 2009 मध्ये टेक्सासमधील फोर्ट हूड येथे गोळीबार करून 13 जणांची हत्या आणि 30 हून अधिक जणांना जखमी केल्याप्रकरणी दोषी ठरलेल्या माजी आर्मी मेजर निदाल मलिक हसनच्या मृत्युदंडाच्या शिक्षेला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मंजुरी दिली आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Oct 06, 2026 | 12:26 PM
‘अल्लाहू अकबर’ म्हणत 13 जणांची हत्या, 30 हून अधिक जखमी; ट्रम्प यांची निदाल हसनच्या फाशीला मंजुरी

‘अल्लाहू अकबर’ म्हणत 13 जणांची हत्या, 30 हून अधिक जखमी; ट्रम्प यांची निदाल हसनच्या फाशीला मंजुरी

Follow Us
Follow Us:
  • 13 जणांचा जीव घेणाऱ्या निदाल हसनला मृत्युदंड
  • अमेरिकेत 65 वर्षांनंतर होणार अशी शिक्षा?
  • फोर्ट हूड हत्याकांडातील दोषीला फाशीची शिक्षा
Nidal Malik Hasan: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 2009 मधील टेक्सासच्या फोर्ट हूड गोळीबार प्रकरणातील दोषी माजी आर्मी मेजर निदाल मलिक हसनच्या मृत्युदंडाच्या शिक्षेला अखेर मंजुरी दिली आहे. अमेरिकन लष्कराने 1961 नंतर मृत्युदंडाची अंमलबजावणी केलेली नसल्याने या निर्णयाची विशेष चर्चा होत आहे.

पेंटागनचे प्रवक्ते सीन पार्नेल यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’वर यासंदर्भात माहिती दिली. हसनच्या मृत्युदंडाची अंमलबजावणी नेमकी कधी आणि कुठे केली जाईल, याबाबत संबंधित लष्करी अधिकारी निर्णय घेतील, असे त्यांनी म्हटले आहे. ट्रम्प यांच्या मंजुरीनंतर शिक्षेच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक कायदेशीर आणि प्रशासकीय प्रक्रिया पुढे जाणार आहेत.

World News : तेल बाजारातील अस्थिरता अनेक वर्षे कायम राहण्याची शक्यता; अधिकाऱ्यांचा इशारा

काय घडले होते फोर्ट हूडमध्ये?

निदाल मलिक हसन हा अमेरिकी सैन्यातील माजी मेजर आणि मानसोपचारतज्ज्ञ आहे, जो टेक्सासमधील फोर्ट हूड लष्करी तळावर ५ नोव्हेंबर २००९ रोजी झालेल्या सामूहिक गोळीबाराचा सूत्रधार म्हणून ओळखला जातो. या हल्ल्यात १३ जणांचा मृत्यू झाला आणि ३० हून अधिक जण जखमी झाले.

2009 मध्ये अमेरिकेच्या टेक्सासमधील फोर्ट हूड लष्करी तळावर हसनने गोळीबार केला होता. हसन हा अमेरिकन लष्करात मानसोपचारतज्ज्ञ म्हणून कार्यरत होता. सैनिकांची वैद्यकीय तपासणी सुरू असलेल्या इमारतीत त्याने गोळीबार केल्याने 13 जणांचा मृत्यू झाला, तर 30 हून अधिक जण जखमी झाले. या हल्ल्यामागील आपली भूमिका स्पष्ट करताना हसनने अफगाणिस्तानात जाणाऱ्या अमेरिकी सैनिकांना रोखण्याच्या उद्देशाने आपण हे कृत्य केल्याचे म्हटले होते. खटल्यादरम्यान त्याने स्वतःचा बचाव करण्यासाठी फारसा प्रयत्न केला नसल्याचेही माहिती समोर आली.

मृत्युदंडाला अजूनही होऊ शकतो विलंब

राष्ट्राध्यक्षांची मंजुरी मिळाली असली तरी हसनला तातडीने मृत्युदंड दिला जाईलच असे नाही. त्याच्याकडे संघीय नागरी न्यायालयात ‘हॅबियस कॉर्पस’ याचिकेसह अन्य कायदेशीर पर्याय उपलब्ध असू शकतात. त्यामुळे प्रत्यक्ष शिक्षेची अंमलबजावणी अनेक वर्षे लांबण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अमेरिकेच्या लष्करी न्यायव्यवस्थेत मृत्युदंड अत्यंत दुर्मीळ आहे. यापूर्वी 1961 मध्ये प्रायव्हेट जॉन बेनेट याला मृत्युदंड देण्यात आला होता. त्यामुळे हसनच्या प्रकरणातील पुढील कायदेशीर प्रक्रिया आणि प्रत्यक्ष शिक्षेच्या अंमलबजावणीकडे आता लक्ष लागले आहे.

Yemen News : येमेनमध्ये हुथींविरोधात मोठी कारवाई; सरकारी दलांचा बाब-अल-मंदेबकडे जोरदार पलटवार

Web Title: Donald trump approves death penalty for fort hood shooter nidal hasan after 13 killed sz

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 06, 2026 | 12:26 PM

Topics:  

  • America
  • Donald Trump
  • US

संबंधित बातम्या

Elon Musk: ‘इन्स्टाग्रामवरील टिप्पणी, जोडीदारांशी ब्रेकअप आणि कामाच्या ठिकाणचे वाद…’; एलॉन मस्क यांच्या वैयक्तिक आयुष्यात वादळ
1

Elon Musk: ‘इन्स्टाग्रामवरील टिप्पणी, जोडीदारांशी ब्रेकअप आणि कामाच्या ठिकाणचे वाद…’; एलॉन मस्क यांच्या वैयक्तिक आयुष्यात वादळ

Donald Trump : कुठल्या जगात जगतात ट्रम्प? ब्राझीलऐवजी घेतले भारताचे नाव आणि सोशल मीडियावर ट्रोलिंगचा पाऊस
2

Donald Trump : कुठल्या जगात जगतात ट्रम्प? ब्राझीलऐवजी घेतले भारताचे नाव आणि सोशल मीडियावर ट्रोलिंगचा पाऊस

Trump SIF: AI महासंग्रामाला सुरुवात! एआय वर्चस्वासाठी ट्रम्प यांनी स्थापन केली ‘सुपर इंटेलिजन्स फोर्स’; झाला ‘हा’ मोठा करार
3

Trump SIF: AI महासंग्रामाला सुरुवात! एआय वर्चस्वासाठी ट्रम्प यांनी स्थापन केली ‘सुपर इंटेलिजन्स फोर्स’; झाला ‘हा’ मोठा करार

World News : ट्रम्प यांचा मोठा निर्णय; जॉन कोएल यांची बंधक प्रकरणांसाठी विशेष दूत म्हणून निवड
4

World News : ट्रम्प यांचा मोठा निर्णय; जॉन कोएल यांची बंधक प्रकरणांसाठी विशेष दूत म्हणून निवड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.