Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 7 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Donald Trump : ‘डोक्यात आवाज ऐकू येत होते ट्रम्पला मारण्याचे…’, व्हाइट हाऊसजवळ शस्त्रांसह व्हेनेझुएलाचा नागरिक अटक

Donald Trump : ट्रम्प यांच्या हत्येचा कट रचल्याच्या आरोपावरून अमेरिकेत एका व्हेनेझुएलाच्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. व्हाईट हाऊसजवळ त्याच्या गाडीत तीन बंदुका आणि अनेक काडतुसे सापडली.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Nov 07, 2026 | 12:45 PM
Donald Trump Assassination Plot White House Security Breach

Donald Trump Assassination Plot White House Security Breach

Follow Us
Follow Us:
  • व्हाइट हाऊसजवळ संशयित पकडला
  • अग्निशस्त्रांचा मोठा साठा जप्त
  • डोक्यात आवाज येत असल्याचा दावा

अमेरिकेच्या राजकीय आणि सुरक्षा वर्तुळातून एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्या हत्येचा कट रचल्याच्या आरोपावरून वॉशिंग्टन डीसी येथील प्रतिष्ठित ‘व्हाइट हाऊस’च्या अत्यंत सुरक्षित परिसरातून एका व्हेनेझुएलाच्या नागरिकाला अटक करण्यात आली आहे. अमेरिकन सिक्रेट सर्व्हिस आणि सुरक्षा यंत्रणांनी गुरुवारी रात्रीच्या सुमारास ही धडक कारवाई करत संशयिताला ताब्यात घेतले. या अटकेमुळे अमेरिकेच्या सुरक्षेतील त्रुटी आणि राष्ट्राध्यक्षांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा पटलावर आला असून संपूर्ण जगभरात याची चर्चा सुरू झाली आहे.

 संशयिताची ओळख आणि गाडीतून जप्त झालेला दारूगोळा

अमेरिकेच्या होमलँड सिक्युरिटी विभागाने (DHS) दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, सिक्रेट सर्व्हिसच्या सतर्क अधिकाऱ्यांना गुरुवारी रात्री व्हाइट हाऊसजवळ उभ्या असलेल्या एका संशयित गाडीमध्ये हलचाली आढळल्या. अधिकाऱ्यांनी त्वरित कारवाई करत गाडीची आणि चालकाची झडती घेतली. अटकेत असलेल्या संशयित व्यक्तीची ओळख रॉनी योरड्रिक्स गुआनिपा चिरिनोस (Ronny Yordrix Guanipa Chirinos) अशी पटली आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : US Midterms : अमेरिकेत ट्रम्प यांना मोठा धक्का; पण पाकिस्तानचे राजकारण अडचणीत, असिम मुनीर यांना नेमकी भीती कशाची?

सुरक्षा यंत्रणांनी जेव्हा संशयिताच्या वाहनाची सखोल तपासणी केली, तेव्हा गाडीमध्ये तीन वेगवेगळ्या प्रकारच्या अत्यंत घातक बंदुका आणि प्रचंड प्रमाणात दारूगोळा (काडतुसे) जप्त करण्यात आला. इतकेच नाही तर, तपासादरम्यान ती गाडी चोरीची असल्याचे आणि तिच्या चोरीबाबत आधीच पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आल्याचे समोर आले आहे. चोरीच्या गाडीत इतका मोठा शस्त्रसाठा घेऊन हा व्यक्ती थेट व्हाइट हाऊसच्या उंबरठ्यापर्यंत कसा पोहोचला, यावर सुरक्षा यंत्रणा आता बारकाईने चौकशी करत आहेत.

“मला डोक्यात आवाज ऐकू येत होते”; संशयिताचा धक्कादायक दावा

चौकशीदरम्यान संशयित रॉनी चिरिनोस याने दिलेली माहिती ऐकून तपास अधिकाऱ्यांनाही मोठा धक्का बसला आहे. त्याने अधिकाऱ्यांना सांगितले की, गेल्या काही दिवसांपासून त्याच्या डोक्यात अद्भूत आणि अज्ञात आवाज ऐकू येत होते. हे आवाज त्याला वॉशिंग्टन येथे जाऊन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची हत्या करण्याचे निर्देश देत होते.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : US Midterms : अमेरिकेत तरुणाईचा मूड बदलला; अमेरिकेत डेमोक्रॅट्सच्या बाजूने नवे वारे, रिपब्लिकन पक्षाची धाकधूक वाढली

मानसिक अस्वस्थता किंवा गुप्त अजेंडा या दोन्ही कोनातून आता या दाव्याची शहानिशा केली जात आहे. संशयिताच्या या विधानानंतर त्याला तातडीने वैद्यकीय व मानसोपचार चाचणीसाठी आणि पुढील कायदेशीर कारवाईसाठी युएस मार्शल सर्व्हिसच्या (US Marshals Service) स्वाधीन करण्यात आले आहे.

 बेकायदेशीर घुसखोरी आणि ट्रम्प यांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न

होमलँड सिक्युरिटी विभागाने दिलेल्या अहवालानुसार, रॉनी चिरिनोस हा व्हेनेझुएलाचा नागरिक असून तो अमेरिकेत कोणत्याही कायदेशीर परवानगीशिवाय राहत होता. त्याने मार्च २०२४ मध्ये टेक्सास सीमेवरून बेकायदेशीरपणे अमेरिकेत प्रवेश केला होता. अमेरिकेत बेकायदेशीररीत्या राहून थेट देशाच्या सर्वोच्च नेत्याच्या निवासस्थानाजवळ शस्त्रांसह पोहोचल्यामुळे स्थलांतरित धोरणांवर आणि सीमा सुरक्षेवरही आता मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर आणि त्यांच्या कुटुंबावर यापूर्वीही अनेकदा जीवे मारण्याच्या धमक्या आणि हल्ल्यांचे प्रयत्न झाले आहेत. ट्रम्प राष्ट्राध्यक्षपदी पुन्हा विराजमान झाल्यापासून त्यांच्या सुरक्षेला असलेला धोका अधिक वाढला आहे. या घटनेनंतर व्हाइट हाऊस परिसरातील सुरक्षाव्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे. या प्रकरणी व्हाइट हाऊसने अद्याप कोणतेही अधिकृत राजकीय वक्तव्य जारी केले नसले तरी सुरक्षा यंत्रणांनी जनतेला या संदर्भातील कोणतीही माहिती असल्यास त्वरित संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: व्हाइट हाऊसजवळ कोणत्या संशयिताला अटक करण्यात आली आहे?

    Ans: व्हाईट हाऊसजवळ रॉनी योरड्रिक्स गुआनिपा चिरिनोस (Ronny Yordrix Guanipa Chirinos) या व्हेनेझुएलाच्या बेकायदेशीर स्थलांतरित नागरिकाला अटक करण्यात आली आहे.

  • Que: संशयिताच्या गाडीत काय सापडले?

    Ans: संशयिताच्या चोरीच्या गाडीत ३ वेगवेगळ्या प्रकारच्या बंदुका आणि मोठ्या प्रमाणात जिवंत काडतुसे (दारूगोळा) जप्त करण्यात आला.

  • Que: संशयिताने पोलिसांना काय कारण सांगितले?

    Ans: संशयिताने दाव केला की, त्याला डोक्यात अज्ञात आवाज ऐकू येत होते, जे त्याला वॉशिंग्टनला जाऊन अध्यक्ष ट्रम्प यांची हत्या करण्याचे निर्देश देत होते.

Web Title: Donald trump assassination plot venezuelan national arrested near white house hp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 07, 2026 | 12:45 PM

Topics:  

  • Donald Trump
  • Venezuela
  • World news

संबंधित बातम्या

World End : 1960मध्ये वर्तवली होती जगाच्या अंताची भविष्यवाणी; नोव्हेंबरमधील ‘या’ तारखेला का म्हटलंय जातंय विनाशाची सुरुवात?
1

World End : 1960मध्ये वर्तवली होती जगाच्या अंताची भविष्यवाणी; नोव्हेंबरमधील ‘या’ तारखेला का म्हटलंय जातंय विनाशाची सुरुवात?

White House :  कोण आहेत स्टीफन मिलर? निवडणूक हरल्यानंतर ट्रम्प यांनी का बनवले व्हाईट हाऊसचे चीफ ऑफ स्टाफ
2

White House : कोण आहेत स्टीफन मिलर? निवडणूक हरल्यानंतर ट्रम्प यांनी का बनवले व्हाईट हाऊसचे चीफ ऑफ स्टाफ

US Midterms : अमेरिकेत ट्रम्प यांना मोठा धक्का; पण पाकिस्तानचे राजकारण अडचणीत, असिम मुनीर यांना नेमकी भीती कशाची?
3

US Midterms : अमेरिकेत ट्रम्प यांना मोठा धक्का; पण पाकिस्तानचे राजकारण अडचणीत, असिम मुनीर यांना नेमकी भीती कशाची?

पद गेलं अन् नशिबी थेट नजर कैद! Santiago Pena यांच्यासोबत घडलं काय? निवासस्थानाभोवती कडेकोट…
4

पद गेलं अन् नशिबी थेट नजर कैद! Santiago Pena यांच्यासोबत घडलं काय? निवासस्थानाभोवती कडेकोट…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.