Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 7 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

White House : कोण आहेत स्टीफन मिलर? निवडणूक हरल्यानंतर ट्रम्प यांनी का बनवले व्हाईट हाऊसचे चीफ ऑफ स्टाफ

White House : मध्यावधी निवडणुकांमधील पराभवानंतर, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्टीफन मिलर यांची व्हाईट हाऊसचे नवे चीफ ऑफ स्टाफ म्हणून नियुक्ती केली. मिलर कोण आहेत आणि ते चर्चेत का आहेत, हे जाणून घ्या.'

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Nov 07, 2026 | 10:30 AM
Stephen Miller Chief of Staff Donald Trump midterms defeat 2026

Stephen Miller Chief of Staff Donald Trump midterms defeat 2026

Follow Us
Follow Us:
  • स्टीफन मिलर नवीन चीफ ऑफ स्टाफ
  • कठोर स्थलांतर धोरणाचे शिल्पकार
  • डेमोक्रॅट्सकडून तीव्र टीका

अमेरिकेच्या राजकारणात (White House) सध्या एका मोठ्या राजकीय घडामोडीमुळे खळबळ उडाली आहे. देशातील मध्यावधी निवडणुकांमध्ये रिपब्लिकन पक्षाला अपेक्षेप्रमाणे कामगिरी करता आलेली नाही, ज्यानंतर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या प्रशासनात मोठा फेरबदल केला आहे. ट्रम्प यांनी त्यांचे सर्वात विश्वासू, जुने आणि आक्रमक सल्लागार मानले गेलेले स्टीफन मिलर यांची व्हाईट हाऊसचे नवीन चीफ ऑफ स्टाफ म्हणून नियुक्ती केली आहे. मिलर हे आगामी ९ नोव्हेंबरपासून ही महत्त्वाची जबाबदारी हाती घेणार असून ते सुझी वाइल्स यांची जागा घेणार आहेत, ज्यांनी अलीकडेच आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

 स्टीफन मिलर कोण आहेत आणि त्यांचे महत्त्व काय?

अवघ्या ४१ वर्षांचे स्टीफन मिलर हे २०१६ मधील पहिल्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीपासून डोनाल्ड ट्रम्प यांचे अत्यंत विश्वासू रणनीतिकार आणि भाषणकार राहिले आहेत. ट्रम्प यांच्या प्रशासनात त्यांनी यापूर्वीही धोरणात्मक बाबींवर डेप्युटी चीफ ऑफ स्टाफ आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून काम पाहिले आहे. अमेरिकेच्या राजकारणात स्थलांतर (Immigration) संबंधीची अत्यंत कडक आणि कठोर धोरणे आखण्यामागे मिलर यांचाच सर्वात मोठा वाटा राहिला आहे. ट्रम्प यांच्या मते, मिलर हे सुरुवातीपासून त्यांच्या प्रत्येक अजेंड्याशी एकनिष्ठ राहिले आहेत आणि त्यांना राजकारणाची अत्यंत बारीक जाण आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : National Cancer Awareness Day : ‘उपचारापेक्षा प्रतिबंध उत्तम’ हा या दिवसाचा मूळ मंत्र; जाणून घ्या महत्त्व आणि इतिहास

सुझी वाइल्स यांच्या राजीनाम्याचे कारण आणि राजकीय घडामोडी

ट्रम्प यांच्या दुसऱ्या कार्यकाळाची सुरुवात यशस्वीरीत्या पार पाडण्यात आणि प्रशासनात शिस्त आणण्यात आतापर्यंत चीफ ऑफ स्टाफ असलेल्या सुझी वाइल्स यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. व्हाईट हाऊसचे हे सर्वोच्च पद भूषवणाऱ्या त्या पहिल्या महिला होत्या. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून त्या त्यांच्या प्रकृतीच्या समस्येशी लढा देत होत्या. मार्च २०२६ मध्ये त्यांना स्तनाचा कर्करोग (Breast Cancer) झाल्याचे उघड झाले होते. जरी त्यांनी उपचारांनंतर स्वतःला कर्करोगमुक्त घोषित केले असले, तरी आता ट्रम्प यांनी त्यांना प्रशासकीय रचनेतून बदलून पक्षाच्या राजकीय संघटनेच्या जबाबदारीवर सोपवले आहे आणि त्यांच्या जागी स्टीफन मिलर यांना आणले आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : World Medical Physics Day: मेरी क्युरी यांच्या जन्मदिवशीच का साजरा केला जातो वैद्यकीय भौतिकशास्त्र दिन? वाचा रंजक माहिती

विरोधकांचा कडा विरोध आणि ‘अमेरिका फर्स्ट’चा आक्रमक पवित्रा

मध्यावधी निवडणुकांमध्ये मतदारांनी वर्तवलेला असंतोष आणि पक्षाचा पराभव पाहता, ट्रम्प आपली धोरणे मवाळ करतील अशी अपेक्षा विरोधकांना होती. परंतु, स्टीफन मिलर यांच्यासारख्या अतिशय कडक आणि उजव्या विचारसरणीच्या नेत्याला चीफ of स्टाफ बनवून ट्रम्प यांनी आपण आपल्या ‘अमेरिका फर्स्ट’ या धोरणावरून मागे हटणार नसल्याचे स्पष्ट संदेश दिला आहे.

या नियुक्तीवर डेमोक्रॅटिक पक्षाच्या नेत्यांनी कडाडून टीका केली आहे. काँग्रेसमन रॉबर्ट गार्सिया आणि भारतीय-अमेरिकन काँग्रेसमन रो खन्ना यांच्यासह कॅलिफोर्नियाचे गव्हर्नर गॅविन न्यूसम यांनीही या पदोन्नतीचा निषेध केला आहे. त्यांच्या मते, निवडणुकीच्या निकालांमधून जनतेचा कौल समजून घेण्याऐवजी ट्रम्प प्रशासनाने स्थलांतरित समुदायांविरोधात अधिक आक्रमक आणि ध्रुवीकरणाचे पाऊल उचलले आहे. येत्या काळात व्हाईट हाऊसचे हे निर्णय अमेरिकेच्या राजकारणात आणखी मोठी उलथापालथ घडवून आणण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: स्टीफन मिलर कोण आहेत?

    Ans: स्टीफन मिलर हे डोनाल्ड ट्रम्प यांचे अत्यंत जवळचे सहकारी, रणनीतिकार आणि अमेरिकेच्या कडक स्थलांतर धोरणांचे मुख्य शिल्पकार आहेत, ज्यांची ट्रम्प यांनी नवीन चीफ ऑफ स्टाफ म्हणून नियुक्ती केली आहे.

  • Que: सुझी वाइल्स यांनी व्हाईट हाऊसचा राजीनामा का दिला?

    Ans: प्रकृतीच्या समस्या (स्तनाचा कर्करोग) आणि मध्यावधी निवडणुकांमधील पक्षाच्या पराभवानंतर ट्रम्प प्रशासनातील अंतर्गत बदलांमुळे सुझी वाइल्स यांनी पद सोडले असून आता त्या ट्रम्प यांच्या राजकीय संघटनेत काम पाहणार आहेत.

  • Que: स्टीफन मिलर यांच्या नियुक्तीमुळे अमेरिकेच्या राजकारणावर काय परिणाम होईल?

    Ans: या नियुक्तीमुळे ट्रम्प प्रशासन आगामी काळात स्थलांतर आणि कार्यकारी अधिकारांच्या वापरावर अधिक आक्रमक आणि कठोर भूमिका घेईल असे मानले जात आहे, ज्याला विरोधी डेमोक्रॅटिक पक्षाने कडाडून विरोध केला आहे.

Web Title: Stephen miller white house chief of staff donald trump hp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 07, 2026 | 10:30 AM

Topics:  

  • America
  • Donald Trump
  • World news

संबंधित बातम्या

US Midterms : अमेरिकेत ट्रम्प यांना मोठा धक्का; पण पाकिस्तानचे राजकारण अडचणीत, असिम मुनीर यांना नेमकी भीती कशाची?
1

US Midterms : अमेरिकेत ट्रम्प यांना मोठा धक्का; पण पाकिस्तानचे राजकारण अडचणीत, असिम मुनीर यांना नेमकी भीती कशाची?

पद गेलं अन् नशिबी थेट नजर कैद! Santiago Pena यांच्यासोबत घडलं काय? निवासस्थानाभोवती कडेकोट…
2

पद गेलं अन् नशिबी थेट नजर कैद! Santiago Pena यांच्यासोबत घडलं काय? निवासस्थानाभोवती कडेकोट…

Paraguay News : पॅराग्वेमध्ये राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्ष सॅंटियागो पेना यांच्या महाभियोगाची सिनेटमध्ये सुनावणी सुरू
3

Paraguay News : पॅराग्वेमध्ये राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्ष सॅंटियागो पेना यांच्या महाभियोगाची सिनेटमध्ये सुनावणी सुरू

USA News :डेमोक्रॅट्सच्या हाती काँग्रेसची सत्ता जाण्याची शक्यता; ट्रम्प यांचा ‘मिस्टर व्हेटो’ बनण्याचा इशारा
4

USA News :डेमोक्रॅट्सच्या हाती काँग्रेसची सत्ता जाण्याची शक्यता; ट्रम्प यांचा ‘मिस्टर व्हेटो’ बनण्याचा इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.