Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ट्रम्प यांची मोठी घोषणा! पुढील G-20 परिषदेत दक्षिण आफ्रिकेला आमंत्रण नाही; रामाफोसा यांनी दिली प्रतिक्रिया

G-20 Summit : डोनाल्ड ट्रम्प यांनी दक्षिण आफ्रिकेला पुढील जी-२० परिषदेचे आमंत्रण न देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या या निर्णयावर दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष सिरिल रामाफोसा यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Nov 29, 2025 | 04:23 PM
Donald Trump and Cyril Ramaphosa

Donald Trump and Cyril Ramaphosa

Follow Us
Follow Us:
  • पुढील G-20 परिषदेत दक्षिण आफ्रिकेला आमंत्रण नाही
  • डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयावर रामाफोसा यांनी दिली प्रतिक्रिया
  • जाणून घ्या काय म्हणाले अध्यक्ष रामाफोसा
Cyril Ramaphosa : नुकतेच २१ ते २३ नोव्हेंबर दरम्यान दक्षिण आफ्रिकेच्या जोहान्सबर्ग येथे G-20 परिषद पार पडली होती. या परिषदेत, भारतासह, कॅनडा, ब्राझील, ब्रिटन यासारख्या परिषदेच्या सदस्यांनी उपस्थिती दर्शवली होती. मात्र अमेरिका या परिषेदतून गायब होता. यामागचे कारण म्हणजे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी बहिष्कार टाकला होता.

G-20 चं ३९ पानी घोषणा पत्र जाहीर अन् डोनाल्ड ट्रम्प यांचा उफळला संताप, कारण काय?

दरम्यान ट्रम्प यांनी एक मोठी घोषणा केली आहे. ट्रम्प यांनी आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर या परिषदेला न जाण्याचे कारण स्पष्ट केले आहे. तसेच त्यांनी पुढील वर्षी दक्षिण आफ्रिकेला जी-२० चे आमंत्रण दिले जाणार नसल्याचे म्हटले आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष सिरिल रामाफोसा यांनी देखील यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

ट्रम्प यांनी काय म्हटले? 

डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्रुथवर घोषणा केली आहे की, प्रिटोरियाचे सरकार जी-२० च्या सदस्यत्वासाठी पात्र नाही. यामुळे पुढील वर्षी अमेरिकेत होणाऱ्या २०२६ च्या जी-२० परिषदेत दक्षिण आफ्रिकेला आमंत्रण नाही. ट्रम्प यांनी दक्षिण आफ्रिकेवर आरोप केला आहे की, त्यांचे सरकार तेथील आफ्रिकन आणि पोर्तुगीज, फ्रेंच आणि जर्मन वंशाच्या नागरिकांसोबत भेदभावपूर्ण वर्तणूक करतात. हे मानवी हक्कांचे गंभीर उल्लंघन असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे.

 

दक्षिण आफ्रिकेच्या अध्यक्षांची ट्रम्पच्या निर्णायवर प्रतिक्रिया 

दरम्यान ट्रम्प यांच्या निर्णयानर दक्षिण आफ्रिकेने अधिकृत निवदेन जारी केले आहे. दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष रामाफोसा यांनी म्हटले की, आम्ही अमेरिकेशी राजनैतिक संबंध प्रस्थापित करण्याचा आणि त्याचा सन्मान करण्याचा सतत प्रयत्न केला आहे. पण तरीही ट्रम्प चुकीची माहिती आणि खोटे तथ्य्यांच्या आधारे दक्षिण आफ्रिकेवर दंडात्मक कारवाई करत आहे. हे अत्यंत दु:ख आहे. दक्षिण आफ्रिकेतील तज्ज्ञांच्या मते, ट्रम्प यांचा हा निर्णय G-20 परंपरेचा उल्लंघन करणारे आणि दक्षिण आफ्रिकेला कमकुवत करण्याचा प्रयत्न करण्याचे असल्याचे म्हटले आहे. सध्या आंतरराष्ट्रीय स्तरावर या मुद्यांवर चर्चांणा उधाण आले आहे.

२०२६ चे जी-२० चे अध्यक्ष पद अमेरिकेकडे 

जी-२० परिषदेचे पुढील अध्यक्षपद हे अमेरिकेकडे हस्तांतरित करण्यात आले आहे. अमेरिकेत १ डिसेंबर २०२५ ते ३० नोव्हेंबर २०२६ पर्यंत अमेरिकेत जी-२० परिषद पार पडतील. यंदा २०२५ चे अध्यक्षपद हे दक्षिण आफ्रिकेला मिळाले होते. २० वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच आफ्रिका खंडात ही परिषद पार पडली होती. २०२३ मध्ये भारताने या परिषदेचे अध्यक्षपद भूषवले होते. याच वेळी भारताच्या प्रयत्नांमुळे दक्षिण आफ्रिकेला या परिषदेचे सदस्यत्व मिळाले होते.

Trump-Putin-Jinping… G20 परिषदेतून गायब; काय आहे यामागचं कारण?

Web Title: Donald trump big announcement south africa not invited to the next g 20 summit

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 29, 2025 | 04:23 PM

Topics:  

  • America
  • G-20 Summit
  • South Africa
  • World news

संबंधित बातम्या

Felix Finkbeiner : एका चॉकलेटने लावली 1 कोटी झाडे; जर्मनीतील ‘या’ शाळकरी मुलाने कशी घडवून आणली जगभरात वृक्षारोपणाची महाक्रांती?
1

Felix Finkbeiner : एका चॉकलेटने लावली 1 कोटी झाडे; जर्मनीतील ‘या’ शाळकरी मुलाने कशी घडवून आणली जगभरात वृक्षारोपणाची महाक्रांती?

Snake Island : समुद्राच्या मध्यभागी मृत्यूचं बेट! समुद्री चाच्यांच्या खजिन्याचे रक्षण करता चक्क हजारो विषारी साप; वाचा थरारक कहाणी
2

Snake Island : समुद्राच्या मध्यभागी मृत्यूचं बेट! समुद्री चाच्यांच्या खजिन्याचे रक्षण करता चक्क हजारो विषारी साप; वाचा थरारक कहाणी

FlyDubai FZ1073 : युएईमधील भारतीयांनी फ्लायदुबईचा हिरो स्मित मच्छरला केला सलाम; वाचा त्यांच्या आरोग्याबद्दल लेटेस्ट अपडेट
3

FlyDubai FZ1073 : युएईमधील भारतीयांनी फ्लायदुबईचा हिरो स्मित मच्छरला केला सलाम; वाचा त्यांच्या आरोग्याबद्दल लेटेस्ट अपडेट

Plague Alert: ‘हे एक बायोवेपण…’ रशियातील ‘त्या’ घटनेवर ट्रम्प यांचे मोठे विधान; WHO कडून स्पष्टीकरणाची मागणी
4

Plague Alert: ‘हे एक बायोवेपण…’ रशियातील ‘त्या’ घटनेवर ट्रम्प यांचे मोठे विधान; WHO कडून स्पष्टीकरणाची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.