
donald trump claims tehran attack iran military leaders killed 48 hour ultimatum 2026
US attack on Tehran April 2026 : जागतिक युद्धाची (US-Israel Iran War) ठिणगी आता वणव्यासारखी पसरली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी पुन्हा एकदा आपल्या आक्रमक भूमिकेने जगाला हादरवून सोडले आहे. शनिवारी रात्री इराणची राजधानी तेहरानमध्ये झालेल्या एका भीषण हवाई हल्ल्यात इराणचे अनेक दिग्गज लष्करी अधिकारी ठार झाल्याचा दावा ट्रम्प यांनी केला आहे. हा हल्ला केवळ लष्करी कारवाई नसून इराणच्या सत्तेचा कणा मोडण्याचा अमेरिकेचा प्रयत्न असल्याचे बोलले जात आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या ‘ट्रुथ सोशल’ या प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये एक व्हिडिओ आहे जो तेहरानमधील हल्ल्याचा असल्याचा दावा केला जात आहे. फुटेजमध्ये अंधार असून दृश्ये काहीशी अस्पष्ट आहेत, परंतु त्यातील आवाजांनी कोणाचेही काळीज धडधडेल. फायटर जेट्सचा चित्कार आणि त्यानंतर होणारे एकामागून एक भीषण स्फोट हे दर्शवतात की अमेरिकेने इराणच्या सर्वात सुरक्षित ठिकाणांना लक्ष्य केले आहे. ट्रम्प यांच्या मते, इराणचे “बेजबाबदार” नेतृत्व करणाऱ्या अनेक लष्करी अधिकाऱ्यांचा या हल्ल्यात अंत झाला आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Lawrence Bishnoi: ‘घरात घुसून कपाळात….’ लॉरेन्स बिश्नोई टोळीची पोस्ट VIRAL; कॅनडातील हल्ल्याची स्वीकारली जबाबदारी
ट्रम्प यांनी इराणला केवळ लष्करी दणकाच दिला नाही, तर एक कडक राजनैतिक अल्टिमेटमही दिला आहे. त्यांच्या मते, इराणकडे आता केवळ ४८ तास शिल्लक आहेत. या काळात इराणने एक तर शांतता करार करावा किंवा जागतिक व्यापारासाठी महत्त्वाची असलेली ‘होर्मुझची सामुद्रधुनी’ विनाअट खुली करावी. जर हे घडले नाही, तर पुढच्या १० दिवसांत इराणच्या उरल्यासुरल्या ऊर्जा पायाभूत सुविधा आणि वीज प्रकल्पही राखरांगोळी केले जातील, असा थेट इशारा व्हाईट हाऊसने दिला आहे.
US President Donald Trump posts on Truth Social, “Many of Iran’s Military Leaders, who have led them poorly and unwisely, are terminated, along with much else, with this massive strike in Tehran!” pic.twitter.com/LM0tXUDqpG — ANI (@ANI) April 4, 2026
credit – social media and Twitter
यापूर्वी २६ मार्च रोजी ट्रम्प यांनी इराणच्या विनंतीवरून हल्ले १० दिवसांसाठी पुढे ढकलले होते. त्यावेळी वाटाघाटी “खूप चांगल्या” सुरू असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, इराणने होर्मुझबाबत आपली भूमिका न बदलल्यामुळे ट्रम्प यांनी अचानक हा विध्वंसक पवित्रा घेतला आहे. सुरुवातीला पाच दिवसांची स्थगिती आणि आता थेट राजधानीवर हल्ला, यावरून हे स्पष्ट होते की अमेरिकेने आता इराणशी चर्चा करण्यापेक्षा कृती करण्याला प्राधान्य दिले आहे.
JUST IN – Trump posts a video of a missile attack and says that “Many of Iran’s Military Leaders” have been terminated, “with this massive strike in Tehran!” pic.twitter.com/CYCcVz1xJx — Disclose.tv (@disclosetv) April 4, 2026
credit – social media and Twitter
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Nuclear Energy: होर्मुझच्या समुद्रात नवा ‘पॉवर गेम’! ट्रम्पला बाजूला करून फ्रान्स-दक्षिण कोरिया एकत्र; ऊर्जा संकटातून काढणार मार्ग
तेहरानमधील स्थानिक सूत्रांनुसार, शहरात जोरदार लढाई सुरू असून अनेक इमारती आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या आहेत. मृतांची संख्या शेकडोंमध्ये असण्याची शक्यता आहे, मात्र इराण सरकारने अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. ट्रम्प यांनी दिलेल्या या ४८ तासांच्या मुदतीनंतर जगाचे लक्ष आता इराणच्या प्रतिसादाकडे लागले आहे. जर इराण झुकला नाही, तर आशिया खंडातील हा संघर्ष तिसऱ्या महायुद्धाकडे वळण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
Ans: ट्रम्प यांनी इराणला होर्मुझची सामुद्रधुनी खुली करण्यासाठी ४८ तासांचा आणि पूर्ण करारासाठी १० दिवसांचा अंतिम अल्टिमेटम दिला आहे.
Ans: ट्रम्प यांच्या दाव्यानुसार, इराणचे अनेक वरिष्ठ लष्करी अधिकारी ठार झाले असून राजधानीतील लष्करी तळांचे मोठे नुकसान झाले आहे.
Ans: जगातील तेलाच्या एकूण व्यापारापैकी २०% व्यापार याच मार्गाने होतो, त्यामुळे अमेरिकेसाठी हा मार्ग खुला असणे अत्यंत महत्त्वाचे आहे.